आजकाल अनेक जण त्यांच्या आवडीनुसार घरात विविध प्राणी पाळतात. कुत्रा, मांजर आदी प्राण्यांना घरी आणल्यानंतर ते आपल्या कुटुंबाचा एक भाग बनतात. मग त्यांना योग्य ते अन्न देणे, त्यांची स्वच्छता राखणे यांसह त्यांची योग्य ती काळजीही वारंवार घ्यावी लागते. सहलीच्या वेळी किंवा परदेशात फिरायला जाताना बऱ्याचदा अनेक लोक आपले पाळीव प्राणीसुद्धा बरोबर नेत असतात. पण, हा प्रवास त्यांच्यासाठी शिक्षा ठरणार नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. आपल्यासोबत पाळीव प्राण्याला परदेशात फिरायला नेण्यासाठी आपल्याला पेट पासपोर्टबाबतची (Pet Passport) माहिती असणे आवश्यक आहे. कारण- त्याशिवाय तुम्ही पाळीव प्राण्यांना तुमच्याबरोबर परदेशात घेऊन जाऊ शकणार नाही. चला तर मग प्रवासादरम्यान पाळीव प्राणी नेताना काय काय लक्षात ठेवले पाहिजे, याबद्दल आपण जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पेट पासपोर्ट म्हणजे काय?

तुम्हाला तुमच्या पाळीव प्राण्याला परदेशात घेऊन जायचे असेल, तर तुमच्याकडे पाळीव प्राण्यांचे पासपोर्ट म्हणजेच पेट पासपोर्ट असणे आवश्यक आहे. या कागदपत्रामध्ये पाळीव प्राण्याबद्दलची सर्व माहिती दिली असते. प्राण्यांचा दोन देशांदरम्यानचा प्रवास सुलभ करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. काही देशांना प्राण्यांसाठी अधिकृत पासपोर्टची आवश्यकता नसते; परंतु त्यांनी संबंधित देशाला त्यांच्या पाळीव प्राण्याबद्दल संपूर्ण माहिती देणे आणि संबंधित कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक आहे. पाळीव प्राण्याला रेबीजचे इंजेक्शन केव्हा आणि किती दिवसांपूर्वी दिले होते, याचीही नोंद पासपोर्टमध्ये केलेली असते.

पेट पासपोर्टसाठी महत्त्वाच्या अटी

आपल्या पाळीव प्राण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास करताना गंतव्य देशात प्रवेश करण्यासाठी आवश्यक गोष्टी खालीलप्रमाणे :

  • पेट पासपोर्ट बनविण्याची पहिली अट म्हणजे मायक्रोचिप बसविणे; जी प्राण्याची मुख्य ओळख असते.
  • रेबीज लसीकरणाची तारीख आणि रेबीज अँटीबॉडी चाचणी अहवाल.
  • कीटकांसंबंधी आवश्यक ते उपचार केले असल्याचे प्रमाणपत्र.
  • प्राण्याला कोणताही आजार नसल्याची पशुवैद्यकीय खात्री करणे.

जवळजवळ सर्व युरोपियन संघीय देशांमध्ये पाळीव प्राण्यांच्या प्रवासासाठी समान आवश्यकता असताना, ऑस्ट्रेलियासारख्या काही देशांमध्ये तुम्हाला तुमच्या पाळीव प्राण्याला किमान १० दिवस अलग ठेवणे आवश्यक आहे. थायलंड, फिलिपिन्स, कॅनडा व जर्मनी हे देश प्रवासासाठी पाळीव प्राण्यांच्या मालकांची पहिली पसंती आहेत.