प्रत्येक गाडीत एक फ्यूल सिस्टम असते. यातील काही गाड्या पेट्रोलवर चालतात तर काही डिझेलवर चालतात. पण आता इलेक्ट्रॉनिक्स गाड्यांच्या जमान्यात विजेवर चालणाऱ्या गाड्या बाजारात लाँच होत आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, जर पेट्रोल गाडीत डिझेल भरले तर काय होईल आणि डिझेल गाडीत जर पेट्रोल भरले तर काय होईल? याने तुमची गाडी चालू शकते का? बहुतेकांना याचे उत्तर माहीतही असेल. पेट्रोल पंपावर अनेकदा अशी चूक होऊ शकते की, डिझेल गाडीत चुकून पेट्रल भरले जाते, ही एक सामान्य चूक आहे. पण असे झाल्यास काय करावे? आणि त्याचा गाडीवर काय परिणाम होतो जाणून घेऊ…
डिझेल इंजिनमध्ये पेट्रोल भरल्यास काय होईल?
डिझेलच्या गाडीत पेट्रोल टाकले तर काय परिणाम होईल याबद्दल जाणून घेण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेल गाड्यांमध्ये काय फरक आहे हे आधी जाणून घेऊ. अनेक ऑटोमोबाइल्सशी संबंधित रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, डिझेल कारमध्ये पेट्रोल भरल्यास ते डिझेलमध्ये मिसळते आणि नंतर ते सॉल्व्हेंट म्हणून काम करते आणि याचा विपरीत परिणाम गाडीच्या इंजिनवर होतो.
डिझेल अन्य पार्ट्ससाठी एक लुब्रिकंट म्हणून देखील काम करते पण या पार्ट्समध्ये पेट्रोल गेल्यास त्यांच्यातील घर्षण वाढते आणि याचा थेट परिणाम इंजिनवर होतो. डिझेल गाडी पेट्रोल भरून गाडी चालवली तर इंजिन खराब होण्याची भीती असते काही वेळी इंजिन लगेच खराब देखील होते.
पेट्रोल गाडीत डिझेल भरले तर काय होईल?
पेट्रोल गाडीमध्ये डिझेल जास्त काळ काम करू शकत नाही यामुळे गाडीमध्येच थांबते. डिझेल पेट्रोलप्रमाणे स्पार्क देऊ शकत नसल्याने गाडी सुरू करण्यात अडचणी येतात. यामुळे इंजिनचे जास्त नुकसान होत नाही, परंतु असे करणे हानीकारक आहे. पेट्रोल इंजिनमध्ये स्पार्क वेगळा असतो आणि डिझेल इंजिनमध्ये अशा प्रकारचा कोणताही स्पार्क नसतो.