Which ear should be used when talking on a mobile phone: स्मार्टफोन ही अशी वस्तू झाली आहे, जिच्याशिवाय आता कोणीच राहू शकत नाही. मोबाईल दिसला नाही की, खूप जणांची चिडचिड होऊ लागते. पूर्वी मोबाईल हा फक्त मोठ्या माणसांसाठी कामाची अशी वस्तू होती. पण आता ती अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठीच जीवनावश्यक वस्तू बनून गेली आहे. आजच्या सोशल मीडिया लाईफमध्ये स्मार्टफोन प्रत्येकासाठी खूप महत्वाचा झाला आहे. देशात मोबाईलच्या वापरात खूप झपाट्याने वाढ झाली आहे. मुलांच्या शिक्षणापासून ते ऑफिसची सर्व कामे मोबाईलच्या माध्यमातून हाताळली जात आहेत. तर दुसरीकडे, मनोरंजनाचे साधन म्हणूनही मोबाईलचा वापर वाढला आहे.
स्मार्टफोनच्या वापराबाबत गेल्या काही वर्षांत अनेक प्रकारचे अभ्यास समोर आले आहेत. काही अभ्यावरुन असं सांगण्यात आलं आहे की, स्मार्टफोनचा जास्त वापर केल्याने कर्करोग होऊ शकतो, तर काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की, त्याच्या रेडिएशनमुळे माणसांसह पशु-पक्ष्यांना मोठा धोका आहे. मोबाईल जास्त बघितल्याने डोळे खराब होतात हे माहिती आहेच. पण मोबाईलवरुन बोलण्यानेही आपल्या आरोग्याला हानी पोहचू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का..? मोबाईलच्या वापरात डोळ्यांसोबतच बोलण्यासाठी मोठ्या प्रमाणात कानांचाही वापर होतो. कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल पण जगातील काही संशोधक फोनवरुन बोलण्यासाठी कोणत्या बाजुच्या कानाचा वापर करावा, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
(हे ही वाचा : गुलाब जामुनमध्ये ‘गुलाब’ नाही, ‘जामुन’चाही पत्ता नाही, मग असं नाव का पडलं? इंग्रजीत याला काय म्हणतात? )
अनेक लोकं मोबाईलवर बोलताना ‘या’ कानाचा वापर करतात
शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनानुसार, सामान्यतः लोक फोनवर बोलताना उजव्या कानाचा वापर करतात. एका संशोधनानुसार, उजव्या कानाने फोनवरुन ऐकण्याने थेट मेंदूवर परिणाम होतो, ज्यामुळे व्यक्ती छोट्या-छोट्या गोष्टींवर नाराज होऊ शकतो. जेव्हा आपण फोनवर बोलण्यासाठी उजव्या कानाचा वापर करतो तेव्हा त्यातून निघणाऱ्या रेडिएशनचा मेंदूवर जास्त परिणाम होतो. त्यामुळे फोनवर बोलताना डाव्या कानाचाही वापर करावा, असेही संशोधनातून सांगण्यात आलं आहे.
तथापि, फोनवर बोलण्यासाठी डावा कान की उजवा कान वापरणे सुरक्षित आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. फिनलँड सायंटिस्ट आणि न्यूक्लियर सेफ्टी अथॉरिटीने केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, जेव्हा आपल्या पेशी फोनच्या संपर्कात येतात तेव्हा ते रक्त-मेंदूच्या अडथळ्याला हानी पोहोचवते. ब्लड-ब्रेन बॅरियरला नुकसान पोहोचवतात. ब्लड-ब्रेन बॅरियरला सेफ्टी बॅरियर म्हणूनही ओळखले जाते. हे रक्तातील धोकादायक पदार्थांना मेंदूमध्ये जाण्यापासून रोखते. मात्र, फोनवर बोलताना कोणता कान वापरावा, हे या अभ्यासातून अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
मोबाईलवर बोलताना कोणता कान वापरावा?
अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, सुमारे ८० टक्के लोक फोनवर बोलताना उजव्या कानाचा वापर करतात, कारण आपल्या मेंदूची डावी बाजू अधिक सक्रिय असते. परंतु फोनवर बोलत असताना एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत फोन बदलत राहणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळेच फोनवर बोलण्यासाठी नेहमी दोन्ही कान वापरा, असे संशोधकांचे म्हणणे आहे.