Pink Color : अजित पवारांची जनसन्मान यात्रा सध्या चर्चेत आहे. याची दोन कारणं आहेत, पहिलं कारण आहे अजित पवारांनी प्रचाराचा नारळ या यात्रेतून फोडला आहे. दुसरं कारण आहे गुलाबी रंग. गुलाबी रंग ( Pink Color ) म्हटलं की कुणालाही ट्रेंड असलेलं गुलाबी साडी हे गाणंही आठवेल. अजित पवारांनी गुलाबी रंग त्यांना आवडला म्हणून निवडला असं नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं होतं. यामागे महिला मतदारांना आकर्षित करण्याचा काही भाग नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. पण गुलाबी रंग ( Pink Color ) हा आधी पुरुषांचा रंग होता. विश्वास बसत नसला तरीही हे वास्तव आहे. तर निळा रंग हा महिलांचा होता. अशात ही अदलाबदल कशी झाली? गुलाबी रंग ( Pink Color ) हा महिलांशी कसा जोडला गेला? याचे काही रंजक किस्से आहेत.

गुलाबी रंग होता मर्दानीचं प्रतीक

गुलाबी रंगाकडे ( Pink Color ) २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत Masculine म्हणजे मर्दानी रंग म्हणून पाहिलं जात होतं. स्त्रिया किंवा मुली हा रंग वापरतच नसत असं नाही. पण तो त्यांचाच रंग अशी ठसठशीत ओळख झालेली नव्हती. उलट निळा रंग हा शांत आणि सोबर असल्याने तो रंग महिलांचा असं ढोबळ वर्गीकरण करण्यात आलं होतं. मात्र दुसऱ्या महायुद्धात हिटलरने गुलाबी रंग अशा कैद्यांना दिला जे कैदी समलैंगिक होते. समलिंगी कैद्यांची बरीच वागणूक स्त्री सुलभ असे त्यामुळे हा रंग स्त्रियांचा झाल्याचं सांगितलं जातं.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Orange Peel Theory What is the Orange Peel Theory Why is this theory trending in 2024
Orange Peel Theory : ऑरेंज पील थेअरी काय आहे? २०२४मध्ये का ट्रेंड होत आहे ही थेअरी?
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
dance of women on Zapukzhupuk
‘आरारारा खतरनाक…’ चाळीतल्या महिलांचा झापुक झुपूक गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
markadwadi women angry
Markadwadi : “मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा पेटला पाहिजे”, शरद पवारांसमोरच महिलांनी एल्गार पुकारला!

हे पण वाचा- Sanjay Raut : “अजित पवार गुलाबी झालेत, आता म्हणे ते बारामती…”, संजय राऊतांची टोलेबाजी!

हिटलरने नेमकं काय केलं?

हिटलरने ज्यांना कैदी म्हणून तुरुंगात डांबलं होतं त्यापैकी जे समलिंगी कैदी होते त्यांच्या ड्रेसवर त्याने गुलाबी रंगाचा त्रिकोण काढण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे त्यांच्या तुरुंगांवरही गुलाबी रंगाचा त्रिकोण असे. यामुळे गुलाबी रंग ( Pink Color ) हा स्त्रियांचा रंग असं होण्यास सुरुवात झाली. फेसबुकवरील ‘का व कसे काय?’ या पेजवर ही माहिती देण्यात आली आहे.

मुलींची खेळणी आणि कपडे गुलाबी होऊ लागले

याच कालावधीत म्हणजेच १९४० ते १९५० च्या दशकात गुलाबी रंगाचे ( Pink Color ) अनेक कपडे, खेळणी ही मुलींच्या खेळण्यांशी जोडली गेली. तर निळ्या रंगाची खेळणी, कपडे हे मुलांशी जोडले गेले. साधारण सतराव्या शतकाच्या शेवटी द बॉय अँड द पिंकी नावाचं एक पेंटिंग प्रसिद्ध झालं होतं. ज्यातला मुलगा निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये तर मुलगी गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये उभी होती. त्याचा हा प्रभाव पुढे पडत गेलेला दिसून आल्याचंही सांगितलं जातं. १९६० च्या दशकात आलेली बार्बी ही डॉलही गुलाबी रंगांच्या ( Pink Color ) कपड्यांमध्येच होती. त्यामुळे हा ट्रेंड तोपर्यंत चांगलाच प्रचलित झाला की गुलाबी रंग हा मुलींचा आणि निळा रंग मुलांचा. असाच एक आणखी रंजक किस्सा गुलाबी रंगाबाबत सांगितला जातो.

पॅरीसमध्ये सुरु झाला होता गुलाबी रंगाचा ट्रेंड

साधारण १९४० च्या दशकात पॅरीस या ठिकाणी फॅशन इंडस्ट्री सुरु झाली आहे. पॅरीस ही फ्रान्सची राजधानी आहे. या ठिकाणी असलेल्या आयफेल टॉवरला भेट देण्यासाठी जगभरातून लोक येत असत. १९४० च्या दशकात या ठिकाणी येणारे पर्यटक, खास करुन महिला गुलाबी रंगाचे कपडे खरेदी करत. पॅरीसमध्ये मग गुलाबी रंगाचे ( Pink Color ) कपडे मुली किंवा महिलांसाठी आणि निळ्या रंगाचे कपडे मुलांसाठी किंवा पुरुषांसाठी तयार केले जाऊ लागले. पॅरीसचं हे अनुकरण जगाने उचललं आणि तिथून गुलाबी रंग हा मुलींचा किंवा महिलांचा झाला असं सांगितलं जातं.

समानतेचा मुद्दा आणि चळवळ

१९ व्या शतकात स्त्रियांची एक चळवळ झाली. त्यात त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा उपस्थित केला होता. गुलाबी रंग पुरुषांचाच का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनीही गुलाबी रंग वापरणार असल्याचं जाहीर केलं. मुलीही मुलांपेक्षा कमी नाहीत, हे त्यांनी म्हटलं. त्यानंतरही हा रंग हळूहळू मुलींशी आणि महिलांशी जोडला गेला.

१७ व्या शतकात काय घडलं?

१७ व्या शतकातील पाश्चिमात्य संस्कृतीचा अभ्यास केला तर लक्षात येतं की युरोपातले अनेक दिग्गज मग ते स्त्री असो किंवा पुरुष फिक्कट रंग वापरणं हे आपल्या प्रतिष्ठेचं लक्षण मानत. त्यामुळे त्यांचे कपडे, त्यांच्या वस्तू या खासकरुन फिकट रंगांच्या असत. त्या काळातही गुलाबी रंग हा मुलींचा किंवा महिलांचा रंग म्हणून प्रचलित नव्हता. त्या काळात युरोपातल्या सैन्याच्या गणवेशात या रंगाचा समावेश होता. ताकदीचं, बळाचं, मर्दानीचं प्रतीक म्हणून गुलाबी रंगाकडे पाहिलं जात असे. CNN ने हे वृत्त दिलं आहे.

१९ व्या आणि २० व्या शतकात गुलाबी रंग हळूहळू मुलींकडे येत गेला

१९ व्या २० व्या शतकाच्या सुरुवातीला गुलाबी रंगाच्या ( Pink Color ) या संकल्पना बदलत गेल्याचं दिसून येतं. हळूहळू तो रंग मुलींकडे आला आणि मुलींचा झाला. गुलाबी रंग म्हणजे मुलींचा रंग हे इतकं ठसलं गेलं की आजही मुलींच्या वस्तू उदाहरणार्थ दप्तर, सॅक, पर्स, वॉटर बॉटल, मोबाइलचे कव्हर हे सगळे गुलाबी रंगांमध्येच दिसतात. इतकंच काय काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता ज्यात एकट्या राहणाऱ्या मुलींना समाजात कशा प्रकारच्या अन्यायाला सामोरं जावं लागू शकतं? यावर परखड भाष्य होतं. त्या सिनेमाचं नावही होतं पिंक! त्यामुळे गुलाबी रंगाचा हा महीमा खूप मोठा आहे. गुलाबी साडी आणि लाली लाल हे गाणं ट्रेंड होण्यामागचं कारणही त्यातला पहिले दोन शब्द गुलाबी साडी हेच आहेत.

Story img Loader