Pivali Jogeshwari Temple History: सध्या शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवानिमित्त अनेक भक्त आवर्जून देवीच्या मंदिरात जातात आणि तिची पूजा करतात. पुण्यामध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत, जिथे देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवादरम्यान भक्तांची रांग लागते. पुणे शहरातील सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिर, ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी, काळी जोगेश्वरी मंदिर येथे अनेक भक्त आवर्जून भेट देतात. पण, तुम्हाला पुण्यातील श्री पिवळी जोगेश्वरी मंदिराचा इतिहास माहिती आहे का? या जोगेश्वरीला पिवळी जोगेश्वरी का म्हणतात, माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊ या….

पिवळी जोगेश्वरी मंदिराचा इतिहास

श्री पिवळी जोगेश्वरी मंदिर साधारणपणे ३०० वर्षांपूर्वीचे असून १९९६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. शुक्रवार पेठेतील पिवळी जोगेश्वरी मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी होते. अशी आख्यायिका आहे की, ज्या तरुण- तरुणींचे लग्न जमत नाही, त्यांनी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतल्यास त्यांचे लग्न ठरते असे म्हणतात.

Navratri 2024: Jijabai
Navratri 2024: जिजामातेच्या जन्मकथेचा संबंध रेणुकादेवीशी कसा जोडला गेला; ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Chaitanya Parva of Navratri begins in Kolhapur
कोल्हापुरात नवरात्रीच्या चैतन्यपर्वास प्रारंभ
pune bopdev ghat gangrape
पुणे: कोंढव्यातील बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार
gold-plated prabhawal offered to Mahalakshmi
कोल्हापूर : सोन्याचा मुलामा दिलेली प्रभावळ महालक्ष्मीला अर्पण
Siddhivinayak Temple
Siddhivinayak Temple : प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदरांची पिल्ले? व्हायरल VIDEO वर मंदिर प्रशासनाचं स्पष्टीकरण काय?
animal meet tirupati laddu marathi news
तिरुपतीमधील लाडू वाद चिघळला
kasba ganapati
कसबा गणपतीला पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचे स्थान कसे मिळाले? जाणून घ्या काय आहे इतिहास….

हेही वाचा – ‘AI’च्या प्रणेत्याला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर; कोण आहेत जेफ्री हिंटन?

हेही वाचा –पुरुष साडी घालून गरबा का खेळत आहेत? काय आहे २०० वर्ष जुनी शेरी गरबा परंपरा?

“पिवळी जोगेश्वरी नाव आणि मंदिराचा इतिहास याबद्दल विश्वस्त दिनेश कुलकर्णी यांनी ‘पुण्याची मालिका’दरम्यान लोकसत्ताला माहिती दिली. कुलकर्णी यांनी सांगितले की, पिवळी जोगेश्वरी मंदिर हे महाजन कुटुंबाचं खासगी मंदिर आहे. पिवळी जोगेश्वरी देवीची मूर्ती ही अष्टभुजा स्वरुपातील आहे. या मूर्तीजवळ गणपती आणि तांदळा स्वरुपातील देवी विराजमान आहे. नवरात्रीचे नऊ दिवस मोर, हत्ती, घोडा, गरुड, सिंह, नंदी अशा विविध वाहनांवर देवी विराजमान होते.

हेही वाचा – Navratri 2024 : नवरात्रीत गरबा आणि दांडिया का खेळला जातो? नेमका फरक काय?

या देवीला पिवळी जोगेश्वरी का म्हणतात?

ज्या तरुण -तरुणींचे लग्न होत नाही, त्यांनी देवीचे दर्शन घेतलं तर त्यांच्या अंगाला लवकर हळद लागते असे मानले जाते; त्यामुळे देवीला ‘पिवळी जोगेश्वरी’ म्हणतात. तसेच देवीचे डोळे पिवळ्या स्फटिकांचे असल्यानेही देवीला ‘पिवळी जोगेश्वरी’ म्हटले जाते.