Pizza day 2024 : वाढदिवसाची पार्टी आहे, जेवण बनवायचा कंटाळा आलाय किंवा एखादा सिनेमा पाहायची इच्छा झाली, तर अशा वेळेस खण्यासाठी आपण आपल्या फोनवरून झटपट मस्त चिजी पिझ्झाची ऑर्डर देतो. कोणत्याही वेळेस आपली भूक भागवण्यासाठी टोमॅटो, ऑलिव्ह्स, मशरूम, पेपरोनी, मक्याचे दाणे, चिकन असे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिंग घातलेला हा पिझ्झा हजर असतो. चवीला अतिशय स्वादिष्ट आणि प्रचंड चिजी पिझ्झा सर्वात पहिले कुणी आणि कुठे बरं बनवला हे तुम्हाला माहीत आहे का?

खरंतर ‘पिझ्झा हा पदार्थ मुळचा कोणत्या देशातला आहे?’ हा सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न आहे. मात्र, याचे उत्तर वाटते तेवढे सोपे नाही. ‘साधारण १८८९ साली राणी ‘मार्गारिटा’ ही युरोपातील इटली या देशातील नेपल्स शहरात भेट देण्यासाठी आली होती. तेव्हा एका पिझ्झेरिया ब्रँडीमधील शेफ, ‘राफेल एस्पोसिटो’ नावाच्या व्यक्तीने सर्वात पहिला पिझ्झा बनवला असे समजले जाते. तसेच राणी मार्गारिटाच्या नावावरूनच त्या शेफने बनवलेल्या पिझ्झाला ‘मार्गारिटा’ असे नाव दिले होते’, अशी पिझ्झाच्या निर्मितीबद्दलची कहाणी नेपल्समध्ये चांगलीच प्रसिद्ध असल्याचे ‘कर्ली टेल’च्या एका लेखावरून समजते.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल

हेही वाचा : आमटी, कालवण अन् रस्सा; कोल्हापुरातील प्रसिद्ध ‘पांढऱ्या रश्श्याचा’ जाणून घ्या रंजक किस्सा…

इतकेच नाही, तर इटली या देशाचा झेंडा लाल, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचा आहे. आता मार्गारिटा पिझ्झादेखील लाल रंगाचा टोमॅटो सॉस, पांढऱ्या रंगाचे चीज आणि हिरव्या रंगाच्या बेसिल पानांचा वापर करून बनवला असल्याने ही कहाणी देशप्रेमाच्या किंवा देशभक्तीच्या दृष्टीनेदेखील सांगितली जाते, अशी माहिती समजते. मात्र, सर्वात पहिला पिझ्झा कुणी बनवला या प्रश्नावर अनेकदा ग्रीस आणि मध्यपूर्व भागाचेही नाव घेतले जाते. असे का ते पाहा.

आता आपण इतिहासात साल १८८० पेक्षाही मागे जाऊ. खरंतर पिझ्झासाठी बनवला जाणारा पातळ जाडीचा ब्रेड हा ग्रीस आणि मध्यपूर्व भागांमध्ये पूर्वापार बनवला जात आहे. विशेषशतः इजिप्तमध्ये. इजिप्तमध्ये तूप, कणिक आणि इतर पदार्थांचा वापर करून ‘फितीर’ [fiteer] नावाचा पिझ्झासारखाच एक ब्रेडचा प्रकार बनवला जात असे. एवढेच नाही तर रोममध्ये अगदी पिझ्झाप्रमाणेच वर्णन असलेल्या एका पदार्थाबद्दलचा पुरावा ‘Aeneid by Virgil: In Book VII’ या पुस्तकामध्ये दिला असल्याचेही समजते.

हेही वाचा : पिझ्झाचे आगळेवेगळे Fusion पाहिलेत का? रेसिपी अन् प्रमाण पाहून घरी बनवा हा ‘पिझ्झा पराठा’….

मात्र, ज्या पिझ्झावर लाल रंगाचा सॉस नाही त्यांना पिझ्झा कसे काय म्हटले जाऊ शकते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, पिझ्झाचेदेखील अनेक प्रकार असतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे बियान्का [Bianca]. या प्रकारच्या पिझ्झामध्ये लाल रंगाच्या पिझ्झा सॉसचा वापर होत नाही. काही ठिकाणी तर या प्रकाराला पाय [pie] म्हणूनही ओळखले जाते.

त्यामुळे आपल्या लाडक्या आणि सर्वांच्या आवडत्या पिझ्झाची अनेक रूपं आणि रंग आहेत. तसेच जर विचार केला तर विविध ठिकाणी विविध प्रकारे पिझ्झा हा बनवला जातो असे समजते.

Story img Loader