PM Awas Yojana: मोदी सरकारने पहिल्यांदा सत्तेत आल्यावर काही योजनांची घोषणा केली होती. त्यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान आवास योजना होय. २५ जून २०१५ पासून पंतप्रधान आवास योजनेची सुरुवात झाली. या योजनेची मुदत आधी २०२२ पर्यंत होती, नंतर तिची मुदत वाढवण्यात आली. नागरी व ग्रामीण अशा दोन भागात ही योजना विभागण्यात आली आहे.

स्वतःचं हक्काचं एक घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र, प्रत्येकालाच ते स्वप्न पूर्ण करता येत नाही. स्वतःचे घर नसलेल्या लोकांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना आणली. या योजनेंतर्गत, भारत सरकार स्वतःचे घर नसलेल्या लोकांना आर्थिक मदत करते, जेणेकरून त्यांना घर मिळू शकेल. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक कुटुंबाला घर उपलब्ध करून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेबाबत लोकांच्या मनात बरेच प्रश्न असात. त्यापैकी एक असा की प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत किती जागेवर घर बांधता येतं. त्याचं उत्तर जाणून घेऊयात.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
ayushman bharat scheme for 70 above (1)
आयुष्मान योजनेसाठी तुमच्या आई-वडिलांची नोंदणी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
CJI Chandrachud
CJI Chandrachud : “सरकारविरोधात निकाल देणं म्हणजे…”, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी सरन्यायाधीशांचं परखड मत

हेही वाचा – पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता काय? ऑनलाइन अन् ऑफलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

सरकारने पीएम आवास योजनेंतर्गत घरं बांधण्यासाठी चार कॅटेगरी ठेवल्या आहेत. त्या ईडब्ल्यूएस, लो इन्कम ग्रुप, मिडल इन्कम ग्रुप आणि मिडल इन्कम ग्रुप-II आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत ईडब्ल्यूएस कॅटेगरीत अर्ज करणारे ३० चौरस मीटर जागेवर घर बांधू शकतात.

लो इन्कम ग्रुप अर्ज करणारे ६० चौरस मीटर जागेत आपले घर बांधू शकतात. मिडल इन्कम ग्रुपमध्ये अर्ज करणारे अर्जदार १६० चौरस मीटर जागेत आणि मिडल इन्कम ग्रुप-II कॅटेगरीत अर्ज करणारे २०० चौरस मीटर जागेवर घर बांधू शकतात. एबीपी लाइव्हने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा – ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी पात्रता काय? अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? जाणून घ्या

पीएम आवास योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी –

पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

  • वेबसाइटवर गेल्यावर होम पेज उघडेल.
  • तिथे असलेल्या ऑनलाइन अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता या अर्जामध्ये मागितलेली माहिती अचूक भरा.
  • त्यानंतर तिथे सांगितलेली आवश्यक कागदपत्रं स्कॅन करून अपलोड करा.
  • यानंतर तुम्हाला फायनल सबमिट हा पर्याय दिसेल.
  • तुम्ही अर्ज नीट भरल्यावर फायनल सबमिट या पर्यायावर क्लिक करा.

या स्टेप्स फॉलो करून तुम्ही पीएम आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

Story img Loader