सरकार विविध योजनांची अंमलबजावणी करीत असते. या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्याची योग्य माहिती असणे आवश्यक आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पीएम इंटर्नशिप योजने(PM Internship Scheme)चा समावेश केला होता. युवा पिढीला कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी ही योजना आहे. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते. ही योजना नक्की काय आहे? याचे काय फायदे होणार आहेत आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे, हे आपण जाणून घेऊ.

या इंटर्नशिपमध्ये तेल, वायू, ऊर्जा, पर्यटन, ऑटोमोटिव्ह व बँकिंग आणि वित्तीय सेवांसह २४ क्षेत्रे आहेत. या योजनेद्वारे भारतातील तरुणांना रोजगाराच्या बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांसह सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाता यावे यासाठी कुशल कामगार तयार करणे हे या योजनेचे लक्ष्य आहे.

Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी
IDBI Bank Recruitment 2024: Registration Underway For 1000 Vacancies; Apply By November 16
युवकांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी; आयडीबीआय बँकेत भरती; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
Job Opportunity Recruitment in Territorial Army Units career news
नोकरीची संधी: टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये भरती
prime minister internship scheme
‘PM Internship Scheme’ काय आहे? योजनेसाठी पात्रता काय? बेरोजगार तरुणांना या योजनेचा कसा मिळणार लाभ?

योजनेचा उद्देश

टॉप कंपनीत नोकरीची संधी शोधणाऱ्यांना वास्तविक अनुभव या योजनेद्वारे मिळणार आहे.

नोंदणी करण्याचा कालावधी

१२ ऑक्टोबर २०२४ पासून नोंदणी करण्यास सुरुवात झाली असून, नोंदणीची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२४ ही आहे.

नोंदणीसाठी शुल्क किती?

या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

लाभार्थींसाठी नियम काय?

१. अर्जदार भारतीय नागरिक असावा.

२. अर्जदाराचे वय २१ ते २४ यादरम्यान असले पाहिजे.

३. अर्जदार पूर्ण वेळ रोजगार किंवा पूर्णवेळ शिक्षण घेणारा नसावा. ऑनलाइन कोर्सेस किंवा दूरस्थ शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण घेणाऱ्या युवा व्यक्ती अर्ज करू शकतात.

४. इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्जदारांनी त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे. तसेच आयटीआयचे प्रमाणपत्र, पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून डिप्लोमा पूर्ण केलेला असायला हवा. किंवा बीए, बीएससी, बीकॉम, बीसीए, बीबीए किंवा पदवी असणे आवश्यक आहे.

येत्या पाच वर्षांत एक कोटी युवकांना पीएम इंटर्नशिप योजनेंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सरकारकडून ४,५०० रुपये, तर कंपनीकडून ५०० रुपये एका प्रशिक्षणार्थीला मिळणार आहेत.

हेही वाचा: Neetu David : ॲलिस्टर कूकसह टी-२० विश्वचषकाच्या फायनलला उपस्थित राहणाऱ्या, कोण आहेत नीतू डेव्हिड?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या वर्षीच्या बजेटमध्ये या योजनेचा समावेश केला आहे. आता सरकारने जे पोर्टल तयार केले आहे, त्यामध्ये ज्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी ज्या पदासाठी जागा रिक्त असतील, त्याची माहिती त्या कंपन्यांकडून देण्यात येणार आहे. १२ ऑक्टोबरपासून या पोर्टलवर युवा विविध कंपन्यांमध्ये अर्ज करू शकतात. १२ महिने या कंपनीत काम करण्याची संधी मिळणार आहे.

कोणती कागदपत्रे लागतील?

इंटर्नशिपसाठी अर्ज करताना काही कागदपत्रे आवश्यक आहेत. उदाहरणार्थ- आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आयडी, मोबाईल नंबर या गोष्टी आवश्यक आहेत.