सरकार विविध योजनांची अंमलबजावणी करत असते. या योजनांच लाभ मिळवण्यासाठी त्याची योग्य माहिती असणे, आवश्यक आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पीएम इंटर्नशीप योजनेचा समावेश केला होता. युवा पीढीला कौशल्यापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी ही योजना आहे. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते. ही योजना नक्की काय आहे? याचे काय फायदे होणार आहेत आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे, हे जाणून घेऊयात.

या इंटर्नशिपमध्ये तेल, वायू, ऊर्जा, पर्यटन, ऑटोमोटिव्ह आणि बँकिंग आणि वित्तीय सेवांसह २४ क्षेत्रे आहेत. या योजनेद्वारे, भारतातील तरुणांना रोजगाराच्या बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांसह सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार असलेल्या कुशल कामगार तयार करणे हे या योजनेचे लक्ष्य आहे.

योजनेचा उद्देश

टॉप कंपनीत नोकरीची संधी शोधणाऱ्यांना वास्तविक अनुभव या योजनेद्वारे मिळणार आहे.

रजिस्ट्रेशन करण्याचा कालावधी

१२ ऑक्टोबर २०२४ पासून रजिस्ट्रेशन करण्याचा मुदत सुरू झाली असून शेवटची तारिख २५ ऑक्टोबर २०२४ ही आहे.

रजिस्ट्रेशन करण्यासाठी किती फी भरावी लागेल?

या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी काय आहेत नियम?

१. अर्जदार भारतीय नागरिक असावा.

२. अर्जदार वय २१ ते २४ यादरम्यान असले पाहिजे.

३. अर्जदार पूर्ण वेळ रोजगार किंवा पूर्णवेळ शिक्षण घेत नसला पाहिजे. ऑनलाइन कोर्सेस किंवा दूरस्त शिक्षणपद्धतीने शिक्षण घेत असलेले युवा अर्ज करू शकतात.

४. इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्जदारांनी त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण किंवा हायस्कूल पूर्ण केलेले असले पाहिजे, तसेच आयटीआयचे प्रमाणपत्र, पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून डिप्लोमा पूर्ण केलेला असायला हवा. किंवा बीए, बीएससी, बीकॉम, बीसीए, बीबीए किंवा पदवी असणे आवश्यक आहे.

येत्या पाच वर्षात एक कोटी युवकांना पीएम इंटर्नशीप योजनेतंर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सरकारकडून ४५०० रुपये तर कंपनीकडून ५०० रुपये एका प्रशिक्षणार्थीला मिळणार आहेत.

हेही वाचा: Neetu David : ॲलिस्टर कूकसह टी-२० विश्वचषकाच्या फायनलला उपस्थित राहणाऱ्या, कोण आहेत नीतू डेव्हिड?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या वर्षीच्या बजेटमध्ये या योजनेचा समावेश केला आहे. आता सरकारने जे पोर्टल तयार केले आहे. त्यामध्ये ज्या कंपन्यामध्ये इंटर्नशीपसाठी ज्या पदासाठी जागा रिक्त असेल, त्याची माहिती कंपनी देणार आहे. १२ ऑक्टोबर पासून या पोर्टलवर युवा विविध कंपनीमध्ये अर्ज करू शकतात. १२ महिने या कंपनीत काम करण्याची संधी मिळणार आहे.

कोणती कागदपत्रे लागतील?

इंटर्नशिपसाठी अर्ज करताना काही कागदपत्रे आवश्यक आहेत. उदाहरणार्थ, आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आयडी, मोबाईल नंबर या गोष्टी आवश्यक आहेत.