PM Narendra modi Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. १२ जानेवारी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने आजचा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. नाशिकमध्ये सुद्धा याच निमित्ताने मोदींच्या उपस्थितीत तरुणांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात भाषण करताना मोदींनी भारतीयांनी तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे विशेष कौतुक केले. “भारत हा तरुणांचा देश आहे. आणि युवा हे कधीच मागे पडत नाहीत ते नेहमी नेतृत्व करतात. भारत आता टेक्नलॉजीच्या क्षेत्रातही नेतृत्व करत आहे. चांद्रयान, आदित्य एल १ सारख्या मोहिमा याचे उदाहरण आहेत.”, असे मोदी म्हणाले. भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे काही अंशी श्रेय देशातील स्वस्त इंटरनेट सेवांना देत मोदी पुढे म्हणाले की, “जगातील लोकांना भारतातील स्वस्त इंटरनेट सुविधांचे अप्रूप वाटते. बाहेरच्या देशांमध्ये लोक इंटरनेट डेटा वापरण्याआधी विचार करतात पण आपल्याकडे अगदी कमी किमतीत इंटरनेट सेवा उपलब्ध आहेत.”

मोदींच्या या विधानाला विचारात घेता खरोखरच भारतातील इंटरनेटचे दर जगात सर्वात कमी आहेत का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आज आपण २०२४ पर्यंत जगातील काही प्रमुख देशांमधील इंटरनेट सेवांचे दर पाहणार आहोत. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू या वेबसाईटवर जगातील विविध देशांमध्ये लोक महिन्याला इंटरनेटसाठी किती खर्च करतात याचे तपशील दिलेले आहेत.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन

सर्वात महाग इंटरनेट सुविधा देणारे देश

जगात नेटसाठी सर्वाधिक दर युएई मध्ये आकारले जातात, आकडेवारीनुसार या देशातील लोकांना अंदाजे ९८. ८४ डॉलर प्रतिमहिना म्हणजेच भारतीय चलनानुसार ८,१९३ रुपये इंटरनेटसाठी मोजावे लागतात. यापाठोपाठ कतार मध्ये ९२. ०४ डॉलर (७,६२९ रुपये), ओमान मध्ये ७६.९९ डॉलर (६,३८२ रुपये), होंडुरास ७२.२८ डॉलर (५९९१ रुपये), सौदी अरेबिया ७०.७५ डॉलर म्हणजेच (५,८६२ रुपये) मोजले जातात. इंटरनेट सेवांच्या किमतीत यूएस ६७.५७ डॉलर (५,६०१ रुपये) सह सहाव्या क्रमांकावर आहे.

सर्वात स्वस्त इंटरनेट देणारे देश

दुसरीकडे जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट कोणत्या देशातील आहे, हे पाहायचे झाल्यास या वेबसाईटनुसार, युक्रेनमध्ये महिन्याकाठी इंटरनेटसाठी साधारण ५.६२ डॉलर म्हणजेच ४६५ रुपये मोजावे लागतात. यापाठोपाठ स्वस्त इंटरनेट असणाऱ्या देशांपैकी रशियामध्ये ८.१७ डॉलर (६७७ रुपये), रोमानिया मध्ये ८.२५ डॉलर (६८३ रुपये), तुर्की मध्ये ८. ७७ डॉलर (७२७ रुपये),मोल्दोव्हा मध्ये ९. १४ डॉलर (७५७ रुपये) मोजावे लागतात.

हे ही वाचा<< १ लिटरच्या बॉटलमधील पाण्यात किती प्लास्टिकचे तुकडे असतात जाणून विश्वासच बसणार नाही! संशोधक सांगतात..

भारतात इंटरनेटसाठी महिन्याला खर्च किती?

भारत व श्रीलंकेमध्ये इंटरनेट सेवांसाठी महिन्याला साधारण ९.४८ डॉलर मोजावे लागतात. भारतीय चलनानुसार नागरिकांना प्रत्येक महिन्याला ७८५ रुपये म्हणजेच प्रत्येक एमबीपीएससाठी १६ रुपये दरात इंटरनेट उपलब्ध होते.

Story img Loader