PM Narendra modi Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. १२ जानेवारी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने आजचा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. नाशिकमध्ये सुद्धा याच निमित्ताने मोदींच्या उपस्थितीत तरुणांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात भाषण करताना मोदींनी भारतीयांनी तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे विशेष कौतुक केले. “भारत हा तरुणांचा देश आहे. आणि युवा हे कधीच मागे पडत नाहीत ते नेहमी नेतृत्व करतात. भारत आता टेक्नलॉजीच्या क्षेत्रातही नेतृत्व करत आहे. चांद्रयान, आदित्य एल १ सारख्या मोहिमा याचे उदाहरण आहेत.”, असे मोदी म्हणाले. भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे काही अंशी श्रेय देशातील स्वस्त इंटरनेट सेवांना देत मोदी पुढे म्हणाले की, “जगातील लोकांना भारतातील स्वस्त इंटरनेट सुविधांचे अप्रूप वाटते. बाहेरच्या देशांमध्ये लोक इंटरनेट डेटा वापरण्याआधी विचार करतात पण आपल्याकडे अगदी कमी किमतीत इंटरनेट सेवा उपलब्ध आहेत.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा