Sachet App पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये सचेत अॅपचा उल्लेख केला. त्यानंतर या अॅपचा पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच एनडीएमए यांनी हे अॅप विकसीत केले आहे. या अॅपचा लोकांना जागरुक करण्यासाठी उपयोग होणार आहे. काय आहे सचेत अॅप? पूर, चक्रीवादळ, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे साधन ‘सचेत’ या मोबाईल अॅपचा वापर करण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन केलं आहे.

काय आहे सचेत अॅप?

नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सतत प्रयत्न केले जात आहेत. लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी आणि आगाऊ इशारा समजण्यासाठी प्राधिकरणाने एक पोर्टल आणि मोबाइल App सुरू केले आहे. ज्याद्वारे लोकांना आपत्तींबद्दल पूर्वसूचना मिळू शकणार आहेत. या पोर्टल आणि अॅपद्वारे सामान्य जनतेला त्यांच्या मोबाईल फोनवर आपत्तीशी संबंधित माहितीचे इशारे आणि सूचना मिळतील. याच अॅपला सतेज असे नाव देण्यात आले आहे.

NDMA हे App लाँच केलं आहे

एनडीएमएने हे राष्ट्रीय आपत्ती इशारा पोर्टल आणि सचेत मोबाईल अॅप लाँच केलं आहे. हे पोर्टल आपत्ती विभागाच्या प्रसाराशी संबंधित पूर्वसूचना प्राप्त करण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे. कोणत्याही आपत्तीमध्ये होणाऱ्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानाचा अंदाज लावता येत नाही. आपत्तीला रोखताही येत नाही. परंतु खबरदारी घेतल्यास आणि आपत्तीची पूर्वकल्पना मिळाल्यास मोठे नुकसान टाळता येतं. हे लक्षात घेऊन एनडीएमएने सचेत हे पोर्टल आणि मोबाईल अॅप लाँच केलं आहे.

सचेत अॅपद्वारे स्थानिक हवामान, तापमान या सगळ्याची माहिती मिळणार आहे

सचेत या मोबाइल अॅपद्वारे स्थानिक हवामान, तापमान, पाऊस, प्रदूषण पातळी, वीजेचा इशारा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींमध्ये काय करावे आणि काय करू नये याची माहिती देण्यात येणार आहे. सचेत मोबाईल अॅप नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये Sachet App डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सामान्य लोकांमध्ये Sachet मोबाईल अॅपचा जास्तीत जास्त प्रचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हे अ‍ॅप गुगल प्ले आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर अँड्रॉइड आणि आयओएस आवृत्त्यांमध्ये उपलब्ध आहे.