Port Blair Andaman and Nicobar Capital Name Changed : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (१३ सप्टेंबर) एक मोठी घोषणा केली. केंद्रातील मोदी सरकारने अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. पोर्ट ब्लेअर बंदर आता ‘श्री विजयपुरम’ या नावाने ओळखलं जाणार आहे. दरम्यान, अंदमान निकोबारच्या राजधानीचं नाव पोर्ट ब्लेअर असं कोणी व कशावरून ठेवलं होतं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भारतावर इंग्रजांचं राज्य असताना इंग्रजांनी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांना, वास्तूंना त्यांना हवी असलेली नावं दिली होती. यामध्ये पोर्ट ब्लेअरचाही समावेश होता. १७८९ साली ईस्ट इंडिया कंपनीने आर्चीबाल्ड ब्लेअर (Archibald Blair) या इंग्रज अधिकाऱ्याच्या सन्मानार्थ त्यांनी या बेटाचं नाव पोर्ट ब्लेअर असं ठेवलं होतं, जे आता मोदी सरकारने बदललं आहे.

आर्चीबाल्ड ब्लेअर हे ईस्ट इंडिया कंपनीत नौदल अधिकारी होते. त्यांनी खातौर, चागोस व अंदमान ही बेटं शोधली व त्यांचं सर्वक्षण केलं होतं. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने अंदमानमधील एका बेटाला पोर्ट ब्लेअर असं नाव दिलं. हे बेट पुढे अंदमान व निकोबारची राजधानी झालं. आर्चीबाल्ड ब्लेअर यांचा जन्म १७५२ साली झाला होता, १८१५ साली त्यांचं निधन झालं.

What is narco test Explained Marathi
What is Narco Test: नार्को टेस्ट कशी घेतली जाते? या टेस्टमुळे आरोपी खरं बोलतो?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Port Blair Centre renames amit shah
Port Blair : मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान-निकोबारच्या राजधानीचं नाव बदललं, पोर्ट ब्लेअर ‘या’ नावाने ओळखलं जाणार
Ayushman Bharat Health Insurance for Senior Citizens
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजनेचा कसा मिळणार लाभ? ‘या’ योजनेसाठी पात्र कोण? मोफत आरोग्य विमा किती रुपयांचा मिळणार? जाणून घ्या सर्वकाही
Why Do Planes Dim The Cabin Lights During Takeoff And Landing?
टेकऑफ आणि लँडिंगदरम्यान विमानातील केबिनचे दिवे का मंद केले जातात? जाणून घ्या…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
eknath khadse devendra fadnavis
Eknath Khadse : “फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन मला आश्वासन दिलेलं की…”, एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”

हे ही वाचा >> Lady Macbeth: ममता बॅनर्जींना ‘लेडी मॅकबेथ’ची उपमा; कोण होती ही व्यक्ती? ‘लेडी मॅकबेथ इफेक्ट’ काय आहे?

आर्चीबाल्ड ब्लेअर यांचे वडील स्कॉटलंडच्या सरकरमध्ये मंत्री होते

आर्चीबाल्ड ब्लेअर हे १७७१ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबई नौदलात दाखल झाले. ते लेफ्टनंट या हुद्द्यावर कार्यरत होते. त्यांचे वडील Rev. Archibald Blair हे स्कॉटलंड सरकारमध्ये मंत्री होते. पोर्ट ब्लेअर बेट शोधल्यानंतर त्यांनी स्वतः या बेटाला स्वतःचं नाव दिलं होतं. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने त्या नावावर शिक्कामोर्तब केलं. मुंबई, दक्षिण भारत व अंदमानमध्ये काम केल्यानंतर १७९५ साली आर्चीबाल्ड ब्लेअर इंग्लंडला परत गेले. १७९९ मध्ये ‘रॉयल सोसायटी फेलो’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. १८०० साली ते नौदलातून निवृत्त झाले. त्यानंतर ते व्यवसाय करू लागले.

हे ही वाचा >> भारतातील ‘या’ मार्केटमध्ये चालतं केवळ ‘महिला राज’, तब्बल पाच हजार दुकानांची मालकी आहे महिलांकडे; अनोखे मार्केट आहे कुठे? घ्या जाणून

…म्हणून पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं; अमित शाहांची एक्सवर पोस्ट

अमित शाह यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की “देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. या संकल्पापासून प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचं नाव ‘श्री विजयपुरम’ असं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यामधील अंदमान निकोबरचं योगदान दर्शवत राहील. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि इतिहासात या बेटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चोल सम्राटांनी या बेटांवरच त्यांच्या नौदलाचे तळ उभारले होते. हे बेट भारताच्या सुरक्षेला व विकासाला गती देण्यासाठी सज्ज झालं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या बेटावर भारताचा तिरंगा फडकवला होता. वीर सावरकर व इतर स्वातंत्र्यसैनिकांनी भारतमातेला गुलामीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठीचा मोठा लढा इथेही उभारला होता. हे बेट त्या स्वातंत्र्यलढ्याची साक्ष देत आहे”.