Pradhan Mantri Suraksha Bima Yojana(PMSBY) : मोदी सरकारने २०१४-१९ या आपल्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक नवनव्या योजानांची सुरूवात केली होती. दुसऱ्या कार्यकाळातही मोदी सरकारनं नव्या योजनांचा पाऊस पाडला आहे. मोदी सरकारनं लॉन्च केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना देशांतील गरिबांसाठी फायदाची ठरली आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला फक्त १२ रूपयांची गुंतवणूक केल्यानंतर दोन लाख रूपयांचं कव्हर मिळत आहे. म्हणजेच वर्षाला फक्त १२ रूपये भरल्यास तुम्हाला दोन लाख रुपयांपर्यतच आरोग्य विम्याच कवच मिळणार आहे. एखादा व्यक्ती फक्त महिन्याला एक रूपया या योजनेत भरून दोन लाखांपर्यंतच्या विम्याचा लाभ घेऊ शकतो.
प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजनेचा फॉर्म ऑनलाईन किंवा बॅंकेत जाऊन तुम्ही भरू शकता. कोणत्याही बँकेत हा फॉर्म तुम्हाला मिळेल. देशातील सार्वजनिक तसेच खासगी बँकांनी आपल्या वेबसाईटवर यासंदर्भात माहिती दिली आहे.
अर्जदाराचे वय १८ ते ७० वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. जर तुम्ही १८ वर्षांचे असाल तर ७० वर्षे वयापर्यंत तुम्हाला केवळ ६२४ रुपयेच द्यावे लागणार आहे. तसेच तुम्हाला दोन लाखांचा अपघात विमा मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे स्वत:चं बँक खातं असणं गरजेचं आहे. या विम्याची रक्कम थेट बँक खात्यामधून डेबिट होणार आहे. यासाठी तुम्हाला बँकेत आधार केवायसी करणं गरजेचं आहे. www.jansuraksha.gov.in या संकेतस्थळावरून फॉर्म डाऊनलोड करुन रक्कम बॅंकेत जमा करु शकता.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
१८ ते ७० वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी ही अपघात विमा योजना आहे. वर्षांतून एकदा हप्ता भरायचा. अपघात झाल्यास एक लाख रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला दोन लाख रुपये मिळणार. फेब्रुवारी २०१६ पर्यंत १ कोटी २४ लाख नागरिक या योजनेत सहभागी झाल्याची माहिती आहे.