Propose Day 2023: काल व्हॅलेन्टाइन विकची सुरुवात झाली. प्रेमी युगुलांसाठी व्हॅलेन्टाइनचा काळ खूप जास्त महत्त्वपूर्ण असतो. आपल्या जिवलग व्यक्तीबरोबर व्हॅलेन्टाइन साजरा करण्यामध्ये ही मंडळी गुंतलेली असतात. ‘प्रपोझ डे’ हा या आठवड्यातला एक प्रमुख दिवस असतो. या दिवशी लोक आपल्या मनातील भावना व्यक्त करत असतात. आवडत्या व्यक्तीला प्रामुख्याने ‘आय लव्ह यू’ म्हणत प्रपोझ करतात. यातील ‘लव्ह’ हा शब्द दुसऱ्या भाषेमधून इंग्रजीमध्ये आला असल्याची माहिती फार कमी लोकांना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लव्ह’ शब्द नेमका कुठून आला?

इंटरनॅशनल स्कूल ऑफ एज्युकेशन नावाच्या वेबसाईटवर लव्ह शब्दाबद्दलची विस्तृत माहिती दिली आहे. त्या वेबसाईटवरील एका रिपोर्टनुसार, लव्ह शब्द ‘लुफु’ या शब्दापासून तयार झाला आहे. लुफुचा अर्थ एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारी आसक्ती किंवा स्नेहभाव होतो असे म्हटले जाते. ‘लुवे’ या पर्शियन शब्दापासून किंवा ‘लुबा’ या जर्मन शब्दापासून लुफुचा वापर सुरु झाला असा अंदाज लावला जातो. यानुसार लव्ह पर्शियन किंवा जर्मन भाषेमधून आला असल्याचा तर्क लावता येतो.

आणखी वाचा – Valentines day चॉइस तर आपलाच : कसे करून घ्याल जोडीदाराकडून लाड?

‘लव्ह’ शब्दाच्या वापर कधी सुरु झाला?

मिळालेल्या ऐतिहासिक कागदपत्रांनुसार, सन १४२३ च्या आसपास लोक इतरांप्रती व्यक्त करण्यासाठी ‘लव्हसिक’ या शब्दाचा वापर करत होते. पुढे १९१९ सालापर्यंत त्यांच्या बोलण्यामध्ये ‘लव्ह लाईफ’ अशा शब्दांचे प्रमाण वाढले.

आणखी वाचा – Propose Day: स्वत:च्या हातांनी रेड व्हेलवेट केक बनवून करा प्रपोझ, जाणून घ्या सोपी रेसिपी

गुडघ्यावर बसण्याच्या आयकॉनिक प्रथेची सुरुवात कधी झाली?

सर्वसाधारणपणे मुलं एका गुडघ्यावर बसून मुलींना प्रपोझ करतात. काही वेळेस मुलीही त्याच पद्धतीने मुलांसमोर व्यक्त होत असतात. ही पद्धत नेमकी कशी सुरु झाली याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही आहे. पण १९२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सेव्हन चान्सेस’ या चित्रपटामध्ये नायकाने गुडघ्यावर बसून नायिकेसमोर प्रेमाची कबूली दिली होती. असं म्हटले जातं की, या चित्रपटामुळे प्रपोझ करायची ही फॅशन संपूर्ण युरोपामध्ये पसरली.