पुण्यातील ससून रुग्णालय हे सर्वांच्याच परिचयाचे आहे. ससून रुग्णालय म्हणजे पुण्याचे भूषण, गरिबांचे आशास्थान, पुण्यामध्ये तसे पाहिले, तर अनेक रुग्णालये आहेत; पण त्यातील सर्वांत जुने आणि बी. जे. मेडिकल कॉलेजशी संलग्न असलेले मोठे रुग्णालय ससून हेच आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे रुग्णालय नेहमीच चर्चेत असते. पुणे रेल्वेस्थानकाजवळील हे एक प्रसिद्ध रुग्णालय आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील नागरिक उपचारासाठी या रुग्णालयात येत असतात. ससून रुग्णालयाबरोबर वैद्यकीय महाविद्यालयदेखील आहे. रुग्णालयाची वास्तू एकोणविसाव्या शतकातील इंग्रजकालीन आहे. तिचा स्वतःचा असा इतिहास आहे. ही ‘ससून’ नावाची व्यक्ती कोण होती? या रुग्णालयाला त्यांचे नाव का देण्यात आले? चला तर मग आपण आज तेच जाणून घेऊ…

पुण्यातील नागरिकांकरिता सार्वजनिक रुग्णालय बांधायचे, असे इंग्रजांनी ठरविले. त्याकरिता पुणे रेल्वेस्थानकाजवळील जागा निवडण्यात आली. या कामासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता भासली तेव्हा मूळचा बगदादच्या; पण स्थलांतर करून मुंबईचा रहिवासी झालेल्या एका धनिक ज्यूधर्मीय व्यापाऱ्याने रुग्णालयासाठी मोठी देणगी देऊ केली. त्या परोपकारी व्यक्तीचे नाव होते सर डेव्हिड ससून. त्यांनी रुग्णालयाच्या बांधकामासाठी दोन लाख १३ हजार रुपये दान केले. बांधकामाचा एकूण खर्च तीन लाख १० हजार ६० रुपये आला होता. ७ ऑक्टोबर १८६३ मध्ये सुरू झालेले ‘ससून’चे बांधकाम १८६७ मध्ये पूर्ण झाले. या इमारतीचा आराखडा कॅप्टन एच. एस. क्लेअर विल्किन्स या अभियंत्याने तयार केला होता. वास्तूची पायाभरणी ब्रिटिश राजवटीतील मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांनी केली. डेव्हिड ससून यांच्या मदतीने हे रुग्णालय उभारण्यात आल्याने या रुग्णालयाला ससून हे नाव देण्यात आले.

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Increase in the number of people obtaining international driving licenses pune news
पुणे: आंतरराष्ट्रीय वाहनचालक परवाने काढणाऱ्यांमध्ये वाढ
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
Rescuer brother runs away by leaving mentally ill sister but nandadeep foundation save her life
रक्षणकर्ता भाऊ मनोरुग्ण बहिणीला बेवारस सोडून पळाला… नंददीप फाऊंडेशनने मात्र…

(हे ही वाचा : वेगाने रेल्वे धावत असताना अचानक ब्रेक दाबल्यास गाडी रुळावरुन खाली घसरते? जाणून घ्या सत्य…)

त्याचप्रमाणे डेव्हिड ससून आणि बयरामजी जीजीभाॅय यांच्या अथक प्रयत्नातून पुण्यात पहिले वैद्यकीय महाविद्यालय ससून रुग्णालयाच्या आवारात १८७८ साली बांधण्यात आले. या महाविद्यालयाला बयरामजी जीजीभाॅय असे नाव देण्यात आले असून, त्या नावाच्या संक्षिप्त रूपान बी. जे. मेडिकल काॅलेज ओळखले जाते.

मूळ इमारतीत पहिल्या मजल्यावर जाताना कोनशिला बसविली आहे. पुण्यातील गरीब रुग्णांना लाभ मिळावा म्हणून हे रुग्णालय बांधण्यात आले, असा उल्लेख त्यात आहे. कोनशिलेवरील माहिती मराठी, इंग्रजी व हिब्रू या तीन भाषांत आहे. रुग्णालयाच्या अतिरिक्त बांधकामाकरिता डेव्हिड ससून यांचा नातलग जेकब ससून याने १९०५-०६ दरम्यान दोन लाखांची देणगी दिली आणि ‘जेकब ससून हॉस्पिटल’ या नावे येथील आवारात नवीन दगडी इमारत उभी राहिली.

Story img Loader