Shreemant Dagdusheth Halwai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा चांगलाच चर्चेत आहे. पुण्यात येताच त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी दगडूशेठ हलवाई यांचा उल्लेख केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील प्राचीन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर हे प्रसिद्ध श्रद्धास्थान आहे. दरदिवशी हजारो भाविक या मंदिरात येतात. पण, ज्यांच्या नावावरून हे मंदिर ओळखले जाते, त्या दगडूशेठ हलवाई यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.

हेही वाचा : हेही वाचा : Cyber Crime : रॅनसमवेअर ‘अकीरा’ व्हायरसची सगळीकडे दहशत; CERT-In ने दिल्या सतर्क राहण्याच्या सूचना; वाचा काय आहे प्रकरण ….

कोण होते दगडूशेठ हलवाई ?

अठराव्या शतकातील ही गोष्ट. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई नावाचे प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी राहायचे. त्यांची मिठाई सर्वत्र प्रसिद्ध होती. पुण्यातल्या बुधवार पेठ भागात ते राहायचे. सर्व व्यवस्थित सुरू होतं.
तुम्हाला माहीत असेल, अठराव्या शतकात पुण्यात प्लेगच्या साथीमुळे हजारो लोकं दगावली होती. त्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचा मुलगासुद्धा होता. प्लेगच्या साथीने त्यांच्या मुलाचे निधन झाले.

हेही वाचा : Twitter Logo : एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो का बदलला? वाचा, काय आहे कारण?

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना कशी झाली ?

हलवाई आणि त्यांच्या पत्नीसाठी हा अत्यंत वाईट काळ होता. त्यावेळी माधवनाथ नावाचे महाराज राहायचे. त्यांनी हलवाई यांना सांगितले, तुम्ही एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा आणि त्याची नियमित पूजा करा. या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते करण्यात आली होती.
पुढे १८९६ मध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली. जेव्हा या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली, तेव्हा १९६८ मध्ये सुवर्णयुग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार शिल्पी यांच्याकडून आधीच्या मूर्तीसारखी हूबेहूब एक नवीन मूर्ती बनवली. त्याकाळी ही मूर्ती बनविण्यासाठी ११२५ रुपये खर्च आला होता.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune news who is shreemant dagdusheth halwai and how dagdusheth ganpati temple established read history ndj
Show comments