तुम्हाला पर्पल रंग आवडतो का? हा रंग अनेकांचा आवडता आहे. जाहिरातीच्या अनेक उत्पादनांपासून लग्नकार्यापर्यंत सर्वत्र हा रंग वापरला जातो. पण, हा रंग अस्तित्वात नाही असे तुम्हाला कोणी सांगितले तर? तुमचा विश्वास बसणार नाही, पण शास्त्रज्ञांनी पर्पल रंगाबद्दल एक आश्चर्यकारक शोध लावला आहे. पर्पल रंग हा तांत्रिकदृष्ट्या अस्तित्वात नाही, असे त्यांचे मत आहे. एका नवीन अभ्यासाने रंग चक्रांबद्दल विचार करण्याचा पूर्ण दृष्टिकोनच बदलला आहे आणि असे उघड झाले आहे की, “पर्पल रंग वर्णक्रमीय (Spectral) अर्थाने “खरा” रंग नाही.

लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा आणि जांभळा (Violet) रंग हे मूळ रंग आहेत, जे प्रकाशाच्या विशिष्ट तरंगलांबीशी संबंधित आहेत. पण पर्पल रंग खास आहे, कारण इतर रंगांप्रमाणे त्याची स्वत:ची प्रकाशाशी संबधित विशिष्ट तरंग लांबी नसते. त्याऐवजी लाल आणि निळा प्रकाश मिसळून आपला मेंदू पर्पल रंग तयार करतो. हा असा एक सर्जनशील उपाय आहे, जे आपल्या मेंदूने विशिष्ट प्रकाश मिश्रणाचा अर्थ लावण्यासाठी शोधला आहे.

जेव्हा विज्ञान आणि भ्रम एकत्र येतात तेव्हा (When Science Met Illusion)

जेव्हा विज्ञान आणि भ्रम एकत्र येतात तेव्हा (When Science Met Illusion) पर्पल रंग हे मेंदूने तयार केलेला भ्रम (Illusion) आहे, पण हे कसे घडते ते समजून घेऊया. जेव्हा लाल आणि निळा प्रकाश एकाच वेळी आपल्या डोळ्यांना दिसतो तेव्हा ते आपल्या मेंदूसाठी एक कोडे असते. हे दोन्ही रंग प्रकाश स्पेक्ट्रमच्या विरुद्ध बाजूस असतात, म्हणून आपला मेंदू त्यांना एकत्र करून पर्पल रंग तयार करतो. लाल आणि निळे हे रंगाच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांसारखे आहेत, जे प्रकाशाच्या रेषीय क्रमात कधीही मिसळू शकत नाहीत. या असामान्य रंग मिश्रणाचा अर्थ लावण्यासाठी आपला मेंदू वापरत असलेली ही एक अनोखी युक्ती आहे.

आपला मेंदू पर्पल रंग तयार करून लाल आणि निळ्या प्रकाशाचे कोडे हुशारीने सोडवतो. हा रंग प्रत्यक्षात प्रकाशात अस्तित्वात नसून, आपल्या मेंदूने त्या रंगाच्या मिश्रणाचे स्पष्टीकरण दिले आहे, म्हणून जेव्हा आपण पर्पल रंग पाहतो, तेव्हा तो आपल्या मेंदूचा परस्परविरोधी रंगांचा अर्थ लावण्याचा मार्ग असतो. हा असा रंग नाही जो प्रकाश स्वत: निर्माण करू शकत नाही, तर तो असा रंग आहे केवळ मानवी मनाच्या गूढ कोपऱ्यात अस्तित्वात आहे.

पर्पल रंग हा भ्रम का निर्माण होतो?

पर्पल रंग हा भ्रम का निर्माण होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला डोळ्यांचे जीवशास्त्र समजून घ्यावे लागेल. आपल्या डोळ्यांमध्ये तीन प्रकारचे शंकू पेशी असतात – प्रत्येक शंकू अनुक्रमे निळ्या, हिरव्या आणि लाल प्रकाशाशी संबंधित लहान, मध्यम किंवा लांब तरंगलांबीशी जुळलेले असतात. हे शंकू ऑप्टिक नर्व्हद्वारे मेंदूला माहिती पाठवतात, जिथे थॅलेमस आणि व्हिज्युअल कॉर्टेक्स कोणते शंकू सक्रिय झाले आणि किती प्रमाणात ते शोधतात.

ही गुंतागुंतीची प्रणाली आपल्याला केवळ मूलभूत रंगच नाही तर दहा लाखांहून अधिक छटांची अविश्वसनीय श्रेणी पाहण्यास मदत करते. टील, मॅजेन्टा, पीच (Teal, magenta, peach) प्रत्येक अनेक शंकूंमधून येणाऱ्या रंगांचे मिश्रण आहे, परंतु पर्पल रंग या प्रणालीमध्ये व्यत्यय निर्माण करतो. जेव्हा लहान (निळा/जांभळ्या रंगाची (Violet)) तरंगलांबी आणि लांब (लाल रंगाची) तरंगलांबी दोन्ही शंकू एकाच वेळी दिसतात, त्यांच्यामध्ये कोणतीही संबंधित स्पेक्ट्ररल तरंगलांबी (spectral wavelength ) नसते, तेव्हा मेंदू एक कार्यकारी निर्णय घेतो, तो एक नवीन रंग शोधतो.

पर्पल रंग – आपल्याला फसवण्याची मेंदुची युक्ती

पर्पल रंग हा एक न्यूरोलॉजिकल बनावट (neurological fabrication,) असूनही, तो शतकानुशतके मानवी संस्कृतीला मोहित करत आहे. प्राचीन रोममध्ये हा रंग शक्ती आणि संपत्तीचे प्रतीक होते, आध्यात्मिक परंपरांमध्ये गूढवादाला प्रेरणा देत होता आणि कॅडबरी चॉकलेटपासून ते प्रिन्सच्या पॉप राजघराण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी एक ओळख किंवा प्रतिक बनला आहे.

पण आता, जेव्हा जेव्हा तुम्ही डेअरी मिल्कचा चॉकलेट पाहता तेव्हा हे लक्षात ठेवा, तुम्हाला खरतर पर्पल रंग दिसत नाही. हे मेंदूचे चातुर्य आहे. एक आश्चर्यकारक, अवचेतन ऑप्टिकल ट्रिक( subconscious optical trick) जी आपल्याला पिढ्यानपिढ्या मूर्ख बनवत आहे.

तुम्हालाही पर्पल रंग दिसत असेल तर काळजी करू नका, तुम्ही भ्रमात नाही आहात. गोंधळातून सौंदर्य निर्माण करण्यास सक्षम मेंदू तुमच्याकडे आहे हे तुमचे भाग्य आहे.