भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पण त्यापुढील सर्वात मोठे आव्हान नवीन रोजगार निर्माण करणे आहे. त्यासाठी देशाने कौशल्य विकासाकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे, असे मध्यंतरी भारतीय रिजर्व बँक (आरबीआयचे) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले होते. गेल्या काही दिवसांपासून रघुराम राजन हे त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल केलेल्या विधानांमुळे चर्चेत आहेत.
नुकतंच त्यांनी एका मुलाखतीमध्ये आरबीआयच्या गव्हर्नरचा पगार किती असतो? त्यांना नेमक्या कोणत्या कोणत्या सुविधा मिळतात? इतकंच नव्हे तर त्यांना राहण्यासाठी दिलेल्या बंगल्याची किंमत साधारण किती असू शकते याबद्दलही रघुराम राजन यांनी खुलासा केला आहे. नुकतंच यूट्यूबर राज शमामी याच्या पॉडकास्ट शोमध्ये रघुराम राजन यांनी हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं.
आणखी वाचा : विमान उतरवताना पायलट बाहेरचं तापमान का सांगतो? प्रवाशांसाठी हवामानाबाबतची माहिती का गरजेची असते?
आरबीआयचे फसलेले निर्णय, डीमॉनीटायजेशनचे परिणाम, चांगले अर्थमंत्री कोण अशा वेगवेगळ्या गोष्टींवर रघुराम राजन यांनी त्यांचं मत मांडलं. यावेळी त्यांना आरबीआरच्या गव्हर्नरचा पगार किती असतो याबद्दल विचारणा झाली तेव्हा ते म्हणाले, “मला सध्याच्या गव्हर्नरचा पगार ठाऊक नाही, पण मी जेव्हा त्या पदावर होतो तेव्हा मला वर्षाला फक्त ४ लाख रुपये पगार होता. गव्हर्नरला मिळणारी सर्वात मोठी सुविधा म्हणजे त्यांचं घर. मुंबईच्या मलबार हील परिसरातील धीरूभाई अंबानी यांच्या घराच्या जवळच तुम्हाला राहायला घर दिलं जातं.”
पुढे या घराची किंमत नेमकी काय असू शकते याचा अंदाज लावण्यासाठी रघुराम राजन यांनी काही आकडेमोड केली तेव्हा त्यांच्यासमोर आलेली किंमत ऐकून खरंच तुम्हालाही धक्काच बसेल. याविषयी बोलताना रघुराम राजन म्हणाले, “मध्यंतरी मी काही आकडेमोड केली, गव्हर्नरला मिळणारं घर हे लॉन्ग टर्म लीजवर घेतलं जातं, पण ते घर समजा आज विकलं तर त्याची किंमत ४५० कोटींच्या आसपास असेल. खरंच ते घर प्रचंड आलीशान आणि सुख सुविधांनी परिपूर्ण असतं.” याबरोबरच गव्हर्नर यांना वैद्यकीय सेवा आणि घरातील स्टाफ यादेखील सुविधा मिळतात. फक्त इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आरबीआयच्या गव्हर्नरला पेन्शन मिळत नसल्याचंही रघुराम राजन यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.