Blue City Of India : भारत विविधतेने नटलेला देश आहे. इथे प्रत्येक धर्माचे लोक राहतात. भारतातील प्रत्येक राज्यात तुम्हाला वेगवेगळी संस्कृती पाहायला मिळेल. जसं जयपूरला भारताची ‘पिंक सिटी’ म्हणून ओळखलं जातं. पण आज आम्ही तुम्हाला भारताची ब्लू सिटी म्हणून नावाजलेल्या शहराबाबत सांगणार आहोत. हे शहर सौंदर्याने बहरलेलं आहे. येथील सौंदर्याचा नजारा पाहण्यासारखा आहे. विशेषत: सकाळी आणि सायंकाळी हे शहर निळ्याशार रंगाने सजलेलं दिसतं. या शहराबाबत खूप कमी लोकांना माहित आहे. जर तुम्हालाही माहित नसेल की भारताचा कोणता शहर ब्लू सिटी म्हणून लोकप्रिय आहे, तर जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
ब्लू सिटी ऑफ इंडिया, जोधपूर
भारताची पिंक सिटी जयपूर राजस्थान राज्यात आहे. परंतु, भारताची ब्लू सिटी म्हणून नावाजलेलं शहरही याच राज्यात आहे. या शहराचं नाव जोधपूर आहे. जोधपूरला भारताची ब्लू सिटी म्हटलं जातं. जोधपूर राजस्थानचा एक सुंदर शहर आहे. हे शहर त्याच्या रंगामुळे खूप लोकप्रिय आहे. सकाळी आणि सायंकाळी या शहराचं सौंदर्य फुलतं. ज्यावेळी सू्र्योदय आणि सूर्यास्त असतो, त्यावेळी या शहराचा सुंदर नजारा पाहण्यासारखा असतो. जोधपूरला सूर्यनगरीच्या नावानेही ओळखलं जातं. कारण सूर्य देशाच्या इतर भागांच्या तुलनेत याठिकाणी जास्त काळ राहतो.
५५० वर्षांपेक्षा जास्त जुनं शहर
निळ्या शहराच्या नावाने ओळखणारं हे सुंदर शहर जवळपास ५५८ वर्षांपूर्वी पहिल्यांदा राव जोधा यांनी बांधलं होतं. राव जोधा राठोड समाजाच्या प्रमुख व्यक्ती होत्या आणि वर्ष १४५९ मध्ये त्यांनी या शहराचा शोध लावला. राव जोधा जोधपूरचे १५ वे राजा होते.
ब्लू सिटी का म्हणतात?
जोधपूरला ब्लू सिटी म्हणण्यामागचं कारण येथील घरे आहेत. या शहरात असेलल्या सर्वच घरे निळ्या रंगांने रंगवले आहेत. तसंच महलांनाही निळ्या रंगाचे दगड लावण्यात आले आहेत. वाळवंटाच्या मधोमध वसलेलं हे शहर याआधी मारवाड नावानेही ओळखलं जायचं.
निळ्या रंगामागे नेमकं कारण काय?
तज्ज्ञ सांगतात की, घरांना निळा रंग असण्याचं मुख्य कारण या वाळवंटाच्या शहरात होणारी गरमी. तापलेल्या वातावरणापासून बचाव करण्यासाठी येथील घरांना निळा रंग लावण्यात आला आहे. दूरवरून पाहिल्यावर हे शहर असं दिसतं की, या शहराने जणूकाही निळ्या रंगाने आंघोळच केली आहे.