How Much Teeth does Rat Have: पृथ्वीवर अनेक प्रकारच्या प्रजाती आढळतात. त्यापैकी एक म्हणजे उंदीर; जो एक लहान, चपळ व बुद्धिमान प्राणी आहे, जो जवळजवळ सर्वत्र असतो. उंदीर गोष्टी कुरतडतात हे तर सगळ्यांना माहीतच आहे. ते अन्नपदार्थ, कपडे आणि अगदी लाकूडही
सहजपणे दातांनी चावू शकतात. पण, जर आम्ही तुम्हाला विचारलं की, उंदराला किती दात असतात, तर त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल का?

उंदराला किती दात असतात?

अनेकदा घराच्या खिडकीतून किंवा दरवाजातून एखादा उंदीर घरात शिरतो. आणि अशा प्रकारे घरामध्ये एकाहून अधिक उंदरांचा सुळसुळाटही वाढत जातो. या उंदरांमुळे कधी कधी खूप मोठे नुकसान होते. उंदरांच्या बाबतीत आपल्याला अनेक प्रश्न पडले असतील. पण, तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की, उंदराला नेमके दात किती असतात.

उंदराच्या दातांची संख्या जर तुम्ही ऐकली, तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. लहानशा दिसणाऱ्या या उंदराला खरे तर १६ दात असतात. या १६ दातांनी ते अनेक गोष्टी कुरतडतात, त्यांना चावे घेतात आणि आपल्या चांगल्या वस्तूंची नासधूस करतात.

रस्ता लक्षात ठेवतात

उंदरांकडे जसे १६ दात असतात, तशीच उंदरांची अनेक वैशिष्टेदेखील आहेत. उंदरांना एकदा रस्ता कळला की, तो रस्ता त्यांना सहजपणे लक्षात राहतो. तसेच ते धावण्यातही वेगवान आहेत. त्यांच्यात चपळताही खूप आहे. विजेच्या तारा आणि अरुंद जागा यांवर उंदीर चालू शकतात. त्यामुळे तुमच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. उंदीर हे अंधाऱ्या आणि उबदार जागेत लपतात. त्यांना धान्याच्या गोदामांमध्ये आणि जमिनीच्या आत बीळ बनवून राहायला आवडते.

आता या सगळ्यानंतर जर उंदराच्या वयाबद्दल बोलायचं झालं, तर उंदीर कठीण परिस्थितीतही जगू शकतात. त्यांचे आयुष्य सुमारे एक ते तीन वर्षे असू शकते.