Ratan Tata : उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ वर्षी निधन झालं आहे, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. रतन टाटा हे जेवढे मोठे उद्योगपती होते तेवढेच ते एक महान समाजसेवक होते. टाटा समूहाला मोठ्या उंचीवर नेण्यात रतन टाटा यांची सर्वात मोठी भूमिका होती. त्यांच्या व्यावसायिक आणि सामाजिक कार्यासह ते सोशल मीडियावरही विविध गोष्ट शेअर करायचे. त्यामुळे सोशल इन्स्टाग्रामवरही त्यांचे मिलियन युजर्स फॉलो होते. रतन टाटा स्वत: सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसले तरी देशभरातील जवळपास सर्व स्तरातील लोकं त्यांना फॉलो करायचे. यामुळे रतन टाटा सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोवर्स असलेले भारतीय उद्योगपती ठरले होते. रतन टाटा यांच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोवर्सची संख्या आज जवळपास ८.५ मिलियन इतकी आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांचे इन्स्टाग्रामवर एवढे फॉलोवर्स असतानाही ते फक्त एकाच खास अकाउंटला फॉलो करत होते. त्यामुळे रतन टाटा इन्स्टाग्रामवर फॉलो करत असलेली तो खास युजर कोण होता, जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रतन टाटा हे भारतातील सर्वात नामवंत उद्योगपती म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या टाटा ट्रस्टची गोष्ट अनेकांना माहितचं असेल. जमशेदजी टाटा यांनी उभा केलेला टाटा उद्योग समूह आता रतन टाटा यांनी भारतासह जगभरात पोहोचवला, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे रतन टाटा यांचे विचार, कर्तृत्व अनेकांना प्रेरणादायी ठरले. रतन टाटा त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी इन्स्टाग्रामवर शेअर करायचे. त्यांच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स यायचे. पण तुम्हाला माहित आहे का, इन्स्टाग्रामवर ८.५ मिलियन फॉलोवर्स असलेले रतन टाटा हे टाटा ट्रस्ट या धर्मादाय संस्थेलाच फॉलो करायचे.

आठवडय़ाची मुलाखत : ‘टाटा ट्रस्ट’ला ‘टाटा सन्स’कडून मिळणारा लाभांश हेच उत्पन्न

टाटा ट्रस्ट ही रतन टाटा यांच्या मालकीची आहे. या संस्थेची स्थापना १९१९ मध्ये झाली. टाटा ट्रस्ट हे भारतातील सर्वात जुने एंडॉवमेंट फाउंडेशन आहे. कल्याणकारी कामांसाठी निधीची कमतरता भासू नये म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली. टाटा समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटा सन्स ही प्रमुख गुंतवणूकदार आहे. तिचा ६६ टक्के हिस्सा हा टाटा ट्रस्टकडे आहे. या शेअरचा लाभांश टाटा ट्रस्टला येतो जेणेकरून धर्मादाय निधीची कमतरता भासू नये.टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रात काम केले जात आहे.

रतन टाटांनी तीन वर्षांपूर्वी आपलं इन्स्टाग्राम अकाउंट ओपन केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या फॉलोवर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. इन्स्टावरील त्यांचे फोटो, व्हिडीओ अनेकदा चर्चेचा विषय ठरायचे. रतन टाटा कधी बालपणाचे, कधी तरुण वयातील तर कधी आपल्या आयुष्यातील एचिव्हमेंट्सबद्दल अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत होते. तर कधी चाहत्यांसोबतच्या आठवणी, गोष्टी शेअर करायचे. केव्हा तरी त्यांच्या आवडीचा मेसेज, कोट्स देखील ते शेअर करायचे.

अलीकडे त्यांचा तरुण वयातील एक फोटो खूप व्हायरल झाला होता, ज्याला १० लाखांच्यावर लाईक्स आणि शेअर्स होते. तर मध्यंतरी त्यांनी भावासोबतचाही एक फोटो शेअर केला होता ज्यावर लाईक्सचा पूर आला होता. त्यांच्या प्रत्येक फोटोंना लाखोंचा घरात लाईक्स असायचे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratan tata follow only 1 profile or account on instagram tata trust sjr