टाटा समुहाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष रतन टाटा यांनी काही आठवड्यांपूर्वीच देशामधील करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा मदतनिधी देण्याची घोषणा केली. त्यानंतर काही तासांमध्येच ‘टाटा सन्स’नेही करोनाविरुद्धच्या लढाईसाठी एक हजार कोटींची मदत जाहीर केली. याचबरोबर टाटा ग्रुपच्या माध्यमातून देशासमोरील करोना संकटावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली जात आहे. अगदी डॉक्टरांसाठी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यापासून ते अन्नाची पाकिटे पुरवण्यापर्यंत अनेक माध्यमांमधून टाटा ग्रुप करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये उतरल्याचे चित्र दिसत आहे. मात्र आपल्या समाजकार्यासाठी ओळखले जाणारे रतन टाटा हे नेहमीच शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित कार्यासाठी निधी देत असतात. अशावेळेस अनेकांना प्रश्न पडतो की रतन टाटा यांची नक्की संपत्ती आहे तरी किती?, त्यांच्या घराची किंमत किती आहे? त्यांच्याकडे कोणत्या गाड्या आहेत असे अनेक प्रश्न अनेकदा गुगल सर्च केले जातात. या लेखामध्ये रतन टाटा यांच्या संपत्तीबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

रतन टाटा ज्या टाटा ग्रुपचे अध्यक्ष आहेत त्या टाटा ग्रुपच्या अंतर्गत १०० हून अधिक वेगवेगळ्या कंपन्या अस्तित्वात आहेत. या कंपन्या जगभरातील सहा खंडांमध्ये पसरलेल्या आहेत. भारतामधील वाहनक्षेत्रामध्ये क्रांती आणणाऱ्या आणि जागतिक स्तरावर वाहन उद्योगामध्ये भारताचे नाव सातासमुद्रापार पोहचवणाऱ्या मोजक्या भारतीय उद्योजकांमध्ये रतन टाटा यांचा समावेश होतो. २००७ साली फॉर्चून मॅग्झीनने जारी केलेल्या जगभरातील उद्योग क्षेत्रातील सर्वात २५ शक्तीशाली व्यक्तींच्या यादीमध्ये रतन टाटा यांचा समावेश होता. एवढा मोठा आवाका असणाऱ्या टाटा ग्रुपच्या अध्यक्ष स्थानी असणाऱ्या रतन टाटा यांची एकूण संपत्ती २०२० च्या सुरुवातील एक बिलियन डॉलर म्हणजेच सात हजार १६४ कोटी इतकी आहे. यासंदर्भात ‘हेडलाइन्स ऑफ टुडे’ या वेबसाईटने नुकताच एक लेख प्रकाशित केला आहे.

Hindenburg on Madhabi Puri Buch
‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांना संसदेच्या लोकलेखा समितीचे समन्स; हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी होणार?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Salil Ankola Former Indian Cricketer Mother Found Dead in Pune Flat Wound Marks Found on Neck
Salil Ankola: माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू, गळ्यांवर जखमांच्या खूणा
ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”
Ikra predicts that banks will raise funds through bonds as growth in bank deposits slows
बँकांची रोख्यांवर मदार, ठेवीतील वाढ मंदावल्याने पाऊल; १.३ लाख कोटींच्या निधी उभारणीचा इक्राचा अंदाज
“मीसुद्धा २० तास काम करायचो”, ईवाय कंपनीतील तरुणीच्या मृत्यूनंतर इतर कंपन्यांमधील माजी कर्मचाऱ्यांनी सांगितला अनुभव!
Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
america parents punished for kids crime,
विश्लेषण: अल्पवयीन मुलांच्या गंभीर गुन्ह्यांसाठी पालकांनाच अटक? अमेरिकेतील दोन राज्यांचा अनोखा पायंडा… भारतात काय स्थिती?

रतन टाटांचे प्रोफाइल

एकूण संपत्ती: ७ हजार १६४ कोटी ६२ लाख (एक बिलियन अमेरिकन डॉलर) (२०२०)

संपूर्ण नाव: रतन नवल टाटा

जन्म: २८ डिसेंबर १९३७

वय: ८२ वर्षे

जन्म ठिकाण: बॉम्बे, ब्रिटीश इंडियामधील बॉम्बे प्रांत

हुद्दा: टाटा सन्स आणि टाटा ग्रुपचे अध्यक्ष

नागरिकत्व: भारतीय

उंची: ५ फूट १० इंच (१७८ सेमी)

वजन: ८० किलो

रतन टाटा यांची संपत्ती किती?

रतन टाटा मुंबईमधील बॉम्बे हाऊसमध्ये राहतात. या इमारतीला ऐतिहासिक महत्व असून एकेकाळी या इमारतीमध्ये टाटा समुहाचे मुख्यलय होतं. सध्या ही संपूर्ण इमारत रतन टाटांच्या मालकीची आहे. या घराची किंमत १५० कोटी रुपये इतकी असून त्यांनी ते २०१५ साली विकत घेतले आहे. कुलाबा पोस्ट ऑफिसच्या समोर असलेल्या त्यांचा बंगल्यामधून समुद्र दिसतो. या बंगल्याचे सात मुख्य भाग आहेत.

नक्की वाचा >> वयाच्या ८२ व्या वर्षी रतन टाटांनी त्या गोष्टीबद्दल व्यक्त केली खंत, म्हणाले…

सर्वात वरच्या भागामध्ये इन्फिनीटी पूल, सन डेक आणि बार आहे. तर बंगल्याच्या तळाला १० ते १२ गाड्या पार्क करता येईल एवढी मोठी पार्किंग आणि नोकर आणि कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची सोय आहे. या घराचे एकूण श्रेत्रफळ १३ हजार ३५० स्वेअर फूट इतके असून घरातील व्हाइट हाऊसच्या खिडकीमधून समोर अथांग समुद्र दिसतो. याशिवाय देशभरात तसेच परदेशामध्येही रतन टाटा यांची बऱ्याच ठिकाणी संपत्ती आहे.

रतन टाटा यांना गाड्यांची विशेष आवड आहे. अनेक लक्झरी गाड्या त्यांच्याकडे आहेत. रतन टाटा यांच्याकडे स्वत:चे खासगी दसॉल्ट फाल्कन २००० जेट विमान आहे. या विमानाची किंमत २२ मिलियन अमेरिकन डॉलर (१६८ कोटींहून अधिक) आहे. रतन टाटांकडे अनेक गाड्या आहेत मात्र त्यापैकी काही खास गाड्यांची यादी पुढील प्रमाणे…

> मासेराती क्वाट्रोपोर्टे (Maserati Quattroporte)
> फेरारी कॅलिफोर्निया (Ferrari California)
> कॅडिलॅक एक्सएलआर (Cadillac XLR)
> जग्वार एफ- टाइप (Jaguar F-Type)
> लँड रोव्हर फ्रीलँडर (Land Rover Freelander)
> क्रिस्लर सेब्रिंग (Chrysler Sebring)
> मर्सिडीज बेंझ ५०० एसएल (Mercedes Benz 500 SL)
> मर्सिडीज बेंझ एस-क्लास (Mercedes Benz S-Class)
> होंडा सिव्हिक (Honda Civic)

रतन टाटा यांनी कष्ट आणि श्रम करुन ही संपत्ती कमावली आहे. त्यांनी टाटा कंपनीचा आवाका आणि व्याप्ती वाढवण्यामध्ये रतन टाटा यांचा मोलाचा वाटा आहे. रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. रतन टाटा यांनी आपले आठवी इयत्तेपर्यंतचे शालेय शिक्षणक कॅम्पियन स्कूलमध्ये केले. त्यानंतर त्यांनी शिमला येथून पुढील शिक्षण पूर्ण केलं. न्यूयॉर्कमधील रिव्हरडेल कंट्री स्कूल येथून रतन टाटा यांनी १९५५ साली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठमधील बिझनेस स्कूलमध्ये सात आठवड्यांचा अ‍ॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर १९५९ साली त्यांनी स्थापत्यशास्त्रामध्ये कॉर्नेल विद्यापीठातून पदवी संपादन केली.

१९६२ साली त्यांनी आयबीएम या मोठ्या कंपनीतील नोकरीला नकार देत भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी जेआरडी टाटा यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी टाटा ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. रतन टाटा यांनी जमशेदपूर येथील कारखान्यामध्ये वरिष्ठ कर्मचाऱ्यांबरोबर काम करण्यासाठी पाठवण्यात आलं. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालीच टाटा कंपन्यांचा नफा महसूलाच्या ५० टक्क्यांपर्यंत आणि २१ वर्षात एकंदरीत ४० टक्क्यांनी वाढला.

१९७१ साली रतन टाटा यांची नॅल्कोच्या (नॅशनल रेडीओ अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमीटेड) प्रभारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. रतन टाटा यांची नियुक्ती झाली तेव्हा घरगुती वापराच्या इलेक्ट्रीक वस्तुंचे उत्पादन करणाऱ्या नॅल्कोचा बाजारपेठेतील वाटा हा केवळ दोन टक्के इतका होता. नॅल्कोला ४० टक्के तोटा सहन करावा लागत होता. मात्र पुढील चार वर्षामध्ये रतन टाटांच्या मार्गदर्शनाखाली नॅल्कोने केळव तोटाच भरून काढला नाही तर २० टक्के बाजारपेठही काबीज केली.

नक्की वाचा >> २७ वर्षाच्या तरुणाला रतन टाटांनी दिली जॉब ऑफर आणि…

रतन टाटा यांच्याकडे १९७७ साली एम्प्रेस मिल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापड गिरणीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. टाटा कंपनीच्या मालकीच्या या मिलमधील कारभार रतन टाटा यांनी आपल्या हुशार व्यवसाय कौशल्यने असा काही नव्याने उभा केला की बंद पडण्याच्या मार्गावर आलेल्या या गिरणीतील कामगारांना डिव्हीडंट मिळू लागला.

१९८१ साली रतन टाटा यांची नियुक्ती टाटा कंपनीच्या संचालक पदी करण्यात आली. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजेच १९९१ साली रतन टाटा यांनी जे. आर. डी. टाटा यांच्याकडून टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

रतन टाटा यांच्याच नेतृत्वाखाली टाटा ग्रुपने खालील गोष्टीमध्ये यश मिळवले

> टाटा मोटर्सची नोंद एनवायएस (न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज) मध्ये झाली.
> टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सार्वजनिक झाली,
> टाटा चहा कंपनीने टेटली ही जगप्रसिद्ध कंपनी विकत घेतली
> जॅग्वॉर लँड रोव्हर घेण्याचे धाडस टाटा मोटर्सने रतन टाटा यांच्यामुळेच दाखवले.
> टाटा स्टील कोरस ही युके आणि नेदर्लँण्डमधील कंपनी विकत घेण्याच्या मार्गावर
> कंपन्यांच्या कामकाजामधून (ऑप्रेशन्समधून) मिळणारा महसूल ६५ टक्क्यांपर्यंत
> १०० पेक्षा जास्त देशांमध्ये होते कंपनीच्या प्रोडक्टची विक्री

२०१५ साली रतन टाटा यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये एक मुलाखत दिली होती. ‘क्रिएटींग इमर्जींग मार्केट्स’ म्हणजेच नव्या बाजारपेठा निर्माण करणे असा या मुलाखतीचा विषय होता. या मुलाखतीदरम्यान बोलताना रतन टाटा यांनी टाट नॅनोमुळे कसा फायदा झाला याबद्दल आपले विचार व्यक्त केले. त्यावेळी बोलतना त्यांनी टाटा नॅनोमुळे गाड्यांच्या किंमती भारतामधील सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आणणारी बाजारपेठ उभी करता आली असं मत नोंदवलं.

पुरस्कार…

> रतन टाटा भारतातील विविध संस्थांमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

> २६ जानेवारी २००० साली त्यांना भारताच्या ५० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त पदम्भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

नक्की वाचा >> ‘रतन टाटांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या’; ऑनलाइन याचिकेला लाखो नेटकऱ्यांचा पाठिंबा

> २६ जानेवारी २००८ साली त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं.

> सिंगापूर सरकारने २९ ऑगस्ट २००८ रोजी रतन टाटा यांना मानद नागरिकत्व प्रदान केले. सिंगापूरमधील उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील वाढीसाठी रतन टाटा यांनी केलेले भरीव योगदान आणि भारताबरोबर असणारे व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यामध्ये रतन टाटा यांनी मोलाचा हातभार लावल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं.

मानद डॉक्टरेट…

> जगभरातील वेगवगेळ्या विद्यापिठांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. त्यापैकी काही खालीलप्रमाणे

> ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीकडून बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेनशमध्ये मानद डॉक्टरेट

> बँकॉकमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने तंत्रज्ञान क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी दिली.

> वारवीक युनिव्हर्सिटीने विज्ञानामधीन मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली.

> केंब्रिज युनिव्हर्सिटीने कायदा या विषयातील मानद डॉरक्टरेट रतन टाटा यांना प्रदान केली आहे.

भारतामधील सर्वात दानशूर व्यक्तींपैकी एक म्हणून रतन टाटा यांच्याकडे पाहिले जाते. रतन टाटा यांची टाटा ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या नावे टाटा सन्समधील ६६ टक्के समभाग आहेत. रतन टाटा हे कंपनीचे चेअरमन होते तेव्हा ते स्वत: टाटा ट्रस्टचे नेतृत्व करायचे. टाटा ट्रस्टने वेगवेगळ्या समाजकार्यासाठी ८०० मिलीयन अमेरिकन डॉलर (६०० कोटींहून अधिक) निधी दिला आहे.

टाटा कंपनीने मुंबईमधील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबईला) ९५० दशलक्ष रुपये निधी दिला होता. या पैशांचा वापर टाटा सेंटर फॉर टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड डिझाइन या संस्थेनच्या उभारणीसाठी करण्यात आला.

खास गोष्टी

> रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समुहाने काही मोठ्या कंपन्या विकत घेऊन जगभरामध्ये आपला विस्तार केला. यामध्ये टाटा टीने कंपनीने टेटली ही ब्रिटीश कंपनी विकत घेतली. टाटा मोटर्सने लँड रोव्हर जग्वार कंपनी विकत घेतली तर टाटा स्टील्सने कोरस ही कंपनी विकत घेतली. या कंपन्या विकत घेतल्याने टाटा उद्योग समूह जगभरातील १०० हून अधिक देशामध्ये पोहचला.

> रतन टाटा यांचे वडील नवल टाटा हे नवाजबाई टाटा आणि रतनजी टाटा यांचे दत्तक पूत्र होते. रतन टाटा हे अवघे १० वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर १९४० पासून रतन टाटा यांच्या आजीनेच त्यांचा संभाळ केला.

> टाटा स्टील्समध्ये रतन टाटा यांना पहिल्यांना नोकरी मिळाली तेव्हा चुनखडी आणि स्फोट भट्टीची जबाबदारी देण्यात आली होती. १९६१ साली त्यांनी टाटा कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

> हार्वर्ड बिझिनेस स्कूलमधील एका इमारतीला रतन टाटा यांचे नाव देण्यात आलं आहे.

> २००७ साली रतन टाटा हे पहिले सामान्य भारतीय ठरले होते ज्यांनी एफ-१६ फाल्कन हे विमान उडवले होते. एका अमेरिकन वैमानिकाबरोबर सहवैमानिक म्हणून रतन टाटांनी ४० मिनिटं हे विमान उडवलं होतं. हा कारनामा त्यांनी अरो इंडिया शोमध्ये केला होता.