Republic Day 2024: दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रत्येक भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात आणि आनंदात साजरा करतो. यंदा भारत ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. १९५०मध्ये याच दिवशी भारत (India) एक सार्वभौम प्रजासत्ताक (Sovereign Republic) राष्ट्र बनले. हा तो दिवस आहे जेव्हा नव्याने स्विकारलेले संविधान लागू करण्यात आले. १९४७ मध्ये भारताला ब्रिटीशांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले पण २६ जानेवारी १९५० पर्यंत राज्यघटना लागू झाली नव्हती.

प्रजासत्ताक दिन 2024: परंपरा आणि उत्सव

भारतीय संविधानाची अंमलबजवणी झाल्यानंतर आपला भारत एक स्वतंत्र आणि सार्वभौम प्रजासत्ताक देश बनला. दरवर्षी २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीत राजपथावर भव्य पथसंचलन पार पडते. राजपथ ज्याला कर्तव्य पथ असेही म्हटले जाते जे देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक दर्शवते आणि लष्करी पराक्रमाचे शक्तिप्रदर्शन करते. या पथसंचलनामध्ये राजपथावर भारतीय सैन्य दल, हवाई दल आणि नौदलाच्या विविध रेजिमेंट्स सहभागी होतात. तसेच विविध राज्यांची संस्कृतीची झलक दाखवणारे चित्ररथांचेही संचलन पार पडते. प्रजासत्ताक दिनाचा हा उत्सव तीन दिवस चालतो आणि २८ जानेवारी रोजी बीटिंग रिट्रीट समारंभाने त्याची समाप्ती होते. भारतात प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय उत्सव म्हणून देशभरात उत्साहात साजरा केला जातो. आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आणि उत्सवाबाबत माहित असल्या पाहिजेत अशा गोष्टीबाबत सांगणार आहोत.

Republic Day 2023 Parade Maharashtra Chitrarath Who makes it what is Theme Which are Sade tin Shaktipith Explained
विश्लेषण: प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ नेमकं कोण घडवतं? महाराष्ट्राची यंदाची थीम नेमकी काय असणार?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
Aishwarya narkar avinash narkar dance on south song netizen comments viral video
“नका करत जाऊ…”, ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकरांच्या ‘या’ व्हिडीओवर नेटकऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला…
‘मनरेगा’च्या मजुरीचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे ; पाच राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी
mgnrega
महाराष्ट्रातील मनरेगा कामगारांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारने विविध राज्यांसाठी मजुरीचे दर वाढवले
Manoj Jarange patil
“ओबीसी नेते नालायक असूनही…”, मनोज जरांगेंचा हल्लाबोल; मराठा तरुणांना आवाहन करत म्हणाले…
mugdha vaishampayan and prathamesh laghate shares video of kirtan
मुग्धाने केलं कीर्तन तर, तबल्याच्या साथीला प्रथमेश! लग्नाला ६ महिने पूर्ण होताच गायिकेने शेअर केला खास व्हिडीओ

Republic Day 2024: कसा पार पडतो प्रजासत्ताक दिनाचा सोहळा?

प्रजासत्ताकदिनी होणारे पथसंचलन हा देशातील महत्त्वपूर्ण कार्यक्रमांपैकी एक मानले जाते. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ध्वजवंदन सोहळा, सशस्त्र दलाचे पथसंचलन आणि विविध राज्यांचे चित्ररथ संचलन पार पडते. देशभरामध्ये विविध भागांमधील शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यातील सर्वात भव्य आणि सर्वात महत्त्वाचा सोहळा राजपथावर पार पडतो.

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज फडकवला जातो कारण राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. राष्ट्रपतींच्या आगमनानंतर इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथावर हे पथसंचलन सुरू होते.

ध्वज फडकवल्यानंतर सामुहिक राष्ट्रगीत गायले जाते आणि २१ तोफांची सलामी दिली जाते. या पथसंचलनामध्ये देशाच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करणारी क्षेपणास्त्रे, टँक आणि इतर शस्त्रास्त्रे पाहता येतात.

विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून संरक्षण मंत्रालयासमोर आपले वैविध्यपूर्ण चित्ररथ प्रस्तुत केले जातात जे आपल्या राज्याची संस्कृतीचे आणि भिन्नतेचे दर्शन घडवितात.

हेही वाचा – Video : ‘राम आएंगे…’; जर्मन गायिकेने गायले श्री रामाचे भजन! पीएम मोदींनी केले कौतुक, म्हणाले,”सुरेल आवाज…

संचलनात दिमाखात मिरवणाऱ्या २० ते ३० चित्ररथांची निवड प्रक्रिया केंद्रीय संरक्षण मंत्रालयाद्वारे केली जाते. देशभरातील प्रसिद्ध चित्रकार, वास्तुविशारद, शिल्पकार, संगीतकार, अभिनेते, अभियंते, नृत्यविशारद असे काही अनुभवी आणि तज्ज्ञ चित्ररथांसाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवतात. त्यानुसार प्रत्येक राज्यातील ऐतिहासिक घटना, वारसा, विकास कार्यक्रम आणि पर्यावरणाचे प्रतिनिधित्व करणारा एक विषय ठरतो आणि त्यानुसार संगीत, नाटय आणि नृत्याचे सादरीकरण केले जाते. प्रत्येक चित्ररथाला ५८ ते ६२ सेकंदाची वेळ मर्यादा ठरवून दिलेली असते. हा सोहळा

त्यानंतर भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्कराची विविध विमाने सहभागी होतात आणि नेत्रदीपक हवाई युद्धाची प्रात्यक्षिक सादर करतात. या पथसंचलनामध्ये इतर देशांतील मान्यवर, भारतीय राजकारणी, तसेच सर्वसामान्य लोक सहभागी होतात.

या दिवशी, भारताचे राष्ट्रपती देशाच्या पात्र नागरिकांना पद्म पुरस्कारांचे वितरण देखील करतात आणि शूर सैनिकांना परमवीर चक्र, अशोक चक्र आणि वीर चक्र दिले जाते.

हेही वाचा – औषधे फक्त ॲल्युमिनियम फॉइलच्या पॅकेटमध्येच का पॅक केली जातात? जाणून घ्या काय आहे खास कारण…. 

प्रजासत्ताक दिनाचा उत्सव दरवर्षी २९ जानेवारी रोजी विजय चौक येथे आयोजित केलेल्या बीटिंग रिट्रीट सोहळ्याने संपतो. या समारंभाचे प्रमुख पाहुणेभारताचे राष्ट्रपती असतात जे ‘राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांनी’ (PBG) आणलेल्या घोडदळाच्या तुकडीसह येतात. लष्करी बँड आणि ड्रम्स बँड, विविध सैन्या दलाचे रेजिमेंट्समधील बगलर आणि ट्रम्पेटर(Buglers and Trumpeters) समारंभात सादरीकरण करतात.