Retirement Planning : भारतात नोकरी केल्यानंतर निवृत्तीचं वय काही कंपन्यांमध्ये वयाची ५८ वर्षे पूर्ण केल्यावर आहे तर काही कंपन्यांमध्ये ही मर्यादा वय वर्षे ६० इतकी आहे. ६० व्या वर्षानंतर म्हणजेच निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य ही बाब अतिशय महत्त्वाची ठरते. त्यामुळे नोकरी करत असतानाच निवृत्ती वेतनाचं नियोजन करणं कधीही श्रेयस्कर. आज आम्ही तुम्हाला अशा सरकारी योजनांबाबत सांगणार आहोत ज्या निवृत्ती वेतनाचा चांगला पर्याय ठरू शकतात. निवृत्त व्यक्तींना आर्थिक स्थैर्य मिळावं म्हणून या योजना सरकारतर्फे राबवण्यात येतात.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

EPF म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना

ईपीएफ ही योजना पगारदार कर्मचाऱ्यासाठी सेवानिवृत्तीसंदर्भातली सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. वेतनाच्या १२ टक्के रक्कम ही पीएफ खात्यात नोकरदारातर्फे आणि तितकाच वाटा कंपनीतर्फे दिला जातो. पीएफ वरील सध्याचा व्याजदर हा ८.२५ टक्के इतका आहे. कर्मचाऱ्याच्या ५८ व्या वर्षी किंवा ६० व्या वर्षी (निवृत्तीची तरतूद असेल त्याप्रमाणे) हा फंड मॅच्युअर्ड होतो आणि सदरची रक्कम व्याजासह निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला एकरकमी मिळते. आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अंशतः या फंडातून पैसे काढता येतात. मात्र ईपीएफ ही एक लोकप्रिय सरकारी योजना आहे यात शंका नाही.

नॅशनल पेन्शन सिस्टीम

नॅशनल पेन्शन सिस्टीम ही देखील एक महत्त्वाची सरकारी सेवानिवृत्ती योजना आहे. ही योजना शेअर बाजाराशी निगडीत सेवा निवृत्ती योजना आहे. ही सरकारद्वारे चालवली जाणारी अंशदायी पण पेन्शन योजना आहे. ही योजना दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. NPS मध्ये केलेल्या गुंतवणुकीसाठी निवृत्तीनंतर एकरकमी मोबदला दिला जातो. याव्यतिरिक्त, तुम्हाला तुमच्या अॅन्युइटीचा आकार आणि त्याचा परफॉर्मन्स या आधारावर मासिक निवृत्ती वेतन मिळू शकते. सरकारसाठी काम करणाऱ्यांसाठी, राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) जानेवारी २००४ मध्ये सुरू करण्यात आली होती. ती २००९ मध्ये सर्व प्रकारच्या लोकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. कोणतीही व्यक्ती त्याच्या कामाच्या कारकिर्दीत पेन्शन खात्यात मासिक योगदान देऊ शकते. फेडरल सरकारी कर्मचारी, राज्य सरकारचे कर्मचारी, खासगी क्षेत्रात काम करणारे नियमित कर्मचारी हे या योजनेत गुंतवणूक करु शकतात.

प्रधानमंत्री वय वंदना योजना

प्रधानमंत्री वय वंदना योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४ मे २०१७ रोजी सुरू केलेली पेन्शन योजना आहे. सदर योजना पेन्शन विमा योजनेसारखीच आहे.ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) द्वारे चालविली जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला नियमित पेन्शन पेमेंट मिळू शकतात. मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक, जे तुमच्यासाठी अनुकूल असेल त्याप्रमाणे नोकरदार या योजनेत गुंतवणूक करु शकतात. PMVVY मधून तुम्हाला जास्तीत जास्त ९ हजार २५० रुपये प्रति महिना पेन्शन लाभ मिळू शकतं. हे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ही योजना ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीची पेन्शन योजना आहे.

अटल पेन्शन योजना

अटल पेन्शन योजना ही भारत सरकारचे पाठबळ असलेली असंघटित क्षेत्रासाठीची एक योजना आहे. २०१५च्या आर्थिक अंदाजपत्रकाच्या भाषणादरम्यान, तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेचा प्रथमतः उल्लेख केला होता. नंतर त्याच वर्षी ९ मे रोजी कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे औपचारिकरीत्या उद्‌घाटन केले.या योजनेने २०१०-११ या वर्षी सुरू केलेल्या स्वावलंबन योजनेची जागा घेतली आहे.ही योजना १८ ते ४० वयोगटातील व्यक्तींसाठीची योजना आहे. मे २०१५ च्या आकडेवारीनुसार भारतात त्यावेळी सुमारे ११% जनता कोणत्या ना कोणत्या पेन्शन योजनेचा लाभ घेत होती. आता हे प्रमाण वाढलं आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retirement planning best schemes for a worry free retirement in india scj