“तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की रात्रीच्या वेळी पतंग आणि इतर कीटक रस्त्यावरील दिव्यांकडे (बल्ब किंवा ट्युबलाईटकडे) कसे आकर्षित होतात? हे असे का होते हे बऱ्याच काळापासून एक गूढ रहस्य आहे. कृत्रिम दिवे त्यांची दिशाभूल करत असताना किंवा त्यांचा जीव धोक्यात टाकत असले तरीही इतके कीटक त्याकडे का आकर्षिले जातात? यामागील कारण काय आहे हे जाणून घ्यावे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत कोलकाता येथील वरिष्ठ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियंता शैलेंद्र कुमार सिंग हे द इंडियन एक्स्प्रेसला सांगतात, “कीटक प्रकाशाकडे का आकर्षित होतात हे स्पष्ट करणाऱ्या आघाडीच्या वैज्ञानिक सिद्धांतांपैकी एक म्हणजे फोटोटॅक्सिस (phototaxis), जो प्रकाश स्रोताकडे किंवा त्यापासून दूर असलेल्या जीवांच्या हालचालीचा संदर्भ देतो. बरेच कीटक, विशेषतः रात्रीच्या वेळी हे कीटक सकारात्मक फोटोटॅक्सिस (positive phototaxis) प्रदर्शित करतात, म्हणजे ते नैसर्गिकरित्या प्रकाशाकडे आकर्षित होतात. चंद्र आणि तारे यांसारख्या नैसर्गिक प्रकाश स्रोतांचा वापर करून कीटकांना मार्ग दाखवणे म्हणून हे वर्तन विकसित झाले असावे.”

चंद्रप्रकाशात मार्ग दाखवणे गृहीतक असे सूचित करते की, कीटक उडताना स्वत:ला दिशा देण्यासाठी चंद्राच्या प्रकाशाचा वापर करतात. पण, चंद्र खूप दूर असल्याने त्याचा प्रकाश कीटकांच्या मार्गावर स्थिर असतो, ज्यामुळे त्यांना सरळ रेषेत उडण्यास मदत होते. त्यांना मार्ग दाखवण्याऐवजी रस्त्यावरील दिव्यांसारखे कृत्रिम प्रकाश स्रोत कीटकांना गोंधळात टाकतात. “जेव्हा कीटक प्रकाशाजवळ उडतात तेव्हा ते प्रकाशाशी एक स्थिर कोन ठेवण्याचा प्रयत्न करतात. कीटक प्रकाशाशी एकरूप कोन राखण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांना मार्गक्रमण करण्यास मदत होईल; परंतु यामुळे ते प्रकाशाभोवती वर्तुळात उडतात आणि शेवटी त्या प्रकाशाजवळ अडकतात.”

दुसरा सिद्धांत सर्केडियन लयीकडे (circadian rhythms) निर्देश करतो. सिंग नमूद करतात की, “काही कीटक रात्री अधिक सक्रिय असतात आणि नैसर्गिक प्रकाश चक्रांच्या मागे जातात. कृत्रिम दिवे या चक्रांमध्ये व्यत्यय आणू शकतात, कीटक जेव्हा विश्रांती घेतात किंवा अन्न शोधत असतात, त्याऐवजी त्यांना प्रकाशाकडे आकर्षित करू शकतात.”

वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाश वेगवेगळ्या प्रकारे कीटकांना आकर्षित करतात का? (Do different types of light attract bugs in distinct ways?)

हो, वेगवेगळ्या प्रकाश स्रोतांद्वारे उत्सर्जित होणारे तरंगलांबी (wavelength ) किंवा रंग स्पेक्ट्रम (colour spectrum) कीटकांना दिसतात. कीटक विशेषतः अल्ट्राव्हायोलेट (ultraviolet (UV)) प्रकाशाकडे ते आकर्षित होतात, जे मानवी डोळ्यांना दिसत नाही. परंतु, पतंग आणि डासांसारख्या अनेक प्रजातींच्या कीटकांना ते दिसतात,” असे सिंग स्पष्ट करतात.

जास्त प्रमाणात यूव्ही प्रकाश (UV light) उत्सर्जित करणारे फ्लोरोसेंट दिवे (Fluorescent lights), एलईडी दिव्यांपेक्षा जास्त कीटकांना आकर्षित करतात, जे खूप कमी यूव्ही प्रकाश उत्सर्जित करतात. याउलट उबदार रंगाचे एलईडी दिवे (warm-coloured LED lights ) जे जास्त तरंगलांबी प्रकाश उत्सर्जित करतात (लाल आणि पिवळ्या स्पेक्ट्रममध्ये) कीटकांना कमी आकर्षक असतात, कारण ते कीटकांना दिसणाऱ्या प्रकाशाच्या मर्यादेबाहेर असतात.”

दृश्यमानतेशी तडजोड न करता कीटकांचे आकर्षण कमी करण्यासाठी बाहेरील लाइटिंगमध्ये बदल कसे करावे (How to modify outdoor lighting to reduce its attraction to insects without compromising visibility)

सिंग माहिती देतात की, दृश्यमानतेशी तडजोड न करता घराबाहेर लाईट किंवा दिव्यांकडे होणारे कीटकांचे आकर्षण कमी करण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जाऊ शकतात. “सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक म्हणजे, उबदार रंगाचे तापमान असलेले एलईडी दिवे वापरणे, जसे की पिवळा किंवा अंबर स्पेक्ट्रममध्ये ( yellow or amber spectrum) असलेले दिवे वापरा.”

“याव्यतिरिक्त, सर्व दिशांना प्रकाश पसरू देण्याऐवजी, प्रकाशाचे किरण खालच्या दिशेला निर्देशित करणारे संरक्षित दिवे वापरावे, ज्यामुळे प्रकाशाने प्रभावित क्षेत्र कमी करू शकते आणि कीटकांची दृश्यमानता मर्यादित करू शकते,” असे ते म्हणाले.

दुसरा पर्याय म्हणजे मोशन-अ‍ॅक्टिव्हेटेड लाईट्स (motion-activated lights) बसवणे. सिंग पुढे म्हणतात, जे फक्त गरज पडल्यासच चालू होतात.ज्यामुळे प्रकाश प्रदूषण ( light pollution) कमी होते. बाहेरील दिवे किती वेळ आणि किती तेजस्वीपणे चमकतात यावर मर्यादा घालण्यासाठी त्यावर टायमर किंवा डिमर लावा, ज्यामुळे स्थानिक कीटकांच्या संख्येवर त्याचा परिणाम कमी होतो.