घरात एखादा प्राणी पाळायचा असल्यास मांजर आणि कुत्रा अशा दोन पर्यायांचा बहुतेक जण विचार करत असतात. घराचे रक्षण करणाऱ्या, प्रेमळ श्वानांना अनेक जण पसंती देतात; तर काही मस्तीखोर, चपळ आणि गोंडस मनीमाऊचा विचार करतात. कदाचित, वाघ-सिंहांपासून ते भटक्या मांजरांच्या सर्व सवयी जवळपास सारख्या असल्याने, आपण दिवसभर खाण्यात, खेळण्यात आणि मस्ती करण्यात व्यस्त असणाऱ्या या गोजिरवाण्या मांजरीला वाघाची मावशी म्हणत असू.

प्रत्येक प्रकारच्या मांजरी या एक उत्तम शिकारी असतात. मग ती शिकार लहानशा उंदराची असो वा जंगलातील मोठ्या प्राण्याची. मात्र, तुम्हाला जगातील सर्वात लहान आणि उत्तम शिकारी असणाऱ्या मांजरांबद्दल माहीत आहे का? रस्टी स्पॉटेड कॅट या पूर्ण वाढ झालेल्या मांजरी हाताच्या तळव्यांमध्ये मावण्याइतक्या लहान आकाराच्या असतात. चला जाणून घेऊ जगातील सर्वात लहान रस्टी स्पॉटेड कॅट आणि जगातील सर्वात दुर्मीळ ब्लॅक फुटेड कॅटबद्दल.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
russian spy whale mystery
बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत

हेही वाचा : Earworms songs : ‘आय हाय ओय होय, बदो बदी’, ‘गुलाबी साडी’ अशी गाणी डोक्यात का अडकतात? जाणून घ्या

जगातील सर्वात लहान मांजर

आशिया खंडातील भारत, श्रीलंका आणि नेपाळच्या काही भागांमध्ये आढळणारी रस्टी स्पॉटेड कॅट ही आशिया खंडातील सर्वात लहान आकाराची मांजर आहे. तर दक्षिण आफ्रिका, बॉट्सवाना, नामिबिया आणि झिम्बाब्वे या आफ्रिका खंडामध्ये आढळणारी ब्लॅक फुटेड कॅट ही आफ्रिका खंडामधील सर्वात लहान मांजर आहे. या मांजरीला ‘स्मॉल सॉप्टेड कॅट’ असेदेखील म्हटले जात असून, ही जगातील दुर्मीळ स्पॉटेड मांजर म्हणून ओळखली जाते.

या दोन्ही प्रजातींच्या मांजरी निशाचर असून, उंदीर आणि लहान पक्षी असा त्यांचा आहार असतो. असे असले तरीही ब्लॅक फुटेड मांजरी या त्यांच्या वजनाहून अधिक असणाऱ्या सशांचीदेखील शिकार करण्यात पटाईत असतात.
तर रस्टी स्पॉटेड मांजरीची दृष्टी ही आपल्या दृष्टीपेक्षा सहापट अधिक असते, त्यामुळे कोणतीही हालचाल क्षणात टिपण्यात या मांजरी तरबेज असतात.

नुकतेच अलिबाग तालुक्यातील कणकेश्वर मंदिराजवळ असलेल्या जंगल परिसरात या दुर्मीळ रस्टी स्पॉटेड मांजरांना पाहण्यात आले असल्याचेदेखील समोर आले आहे. ओल्या दमट पानगळीच्या जंगलात वास्तव्य करणाऱ्या या मांजरीचे अस्तित्व ताडोबा आणि पश्चिम घाट परिसरात आढळून आले असल्याने, या भागातील निसर्ग आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे, असे लोकसत्ताच्या एका लेखावरून समजते.

हेही वाचा : अलिबाग परीसरात दुर्मिळ रस्टी स्पॉटेड मांजरीचे प्रथम दर्शन..!

मांजरींमधील सर्वोत्तम शिकारी प्रजाती

ब्लॅक फुटेड मांजरींच्या तब्ब्ल ६० टक्के शिकारी यशस्वी होतात, त्यामुळे मांजर प्रजातींमधील सर्वोत्तम शिकारी आणि सस्तन प्राण्यांमध्ये शिकार करण्यात त्यांचा दुसरा क्रमांक असतो. यात आफ्रिकन जंगली कुत्रे हे शिकारीत ८५ टक्के यशस्वी होतात, म्हणून ते पहिल्या स्थानावर आहेत.

ब्लॅक फुटेड मांजरांवर सध्या सुरू असणाऱ्या अभ्यासामध्ये असे समोर आले आहे की, या मांजरी जवळपास ४० विविध प्राण्यांना खातात. या मांजरी दररोज रात्री प्रत्येकी १४ लहान प्राण्यांची / कीटकांची शिकार करतात. इतकेच नाही तर तब्ब्ल १.४ मीटर्स म्हणजेच साधारण ४ फुटांहून अधिक उंच उडी मारून, पक्षांचीदेखील शिकार करू शकतात.

या मांजरीला जरी ब्लॅक फूट हे नाव देण्यात आले असले, तरीही त्यांचे केवळ तळवे काळ्या किंवा गडद चॉकलेटी रंगाचे असतात.

हेही वाचा : पांडवांनीही दिली होती पुण्यातील ‘पाताळेश्वर लेणी’ला भेट! काय आहे या लेणीचा इतिहास जाणून घ्या…

मादी मांजरी आणि पिलांचा अपवाद वगळता ब्लॅक फुटेड मांजरांना एकटे राहणे पसंत असते. मात्र, रस्टी स्पॉटेड मांजरांच्या स्वभावाबद्दल अद्याप फार माहिती नाही.

या दोन्ही मांजरी दिसायला अतिशय गोंडस असल्या तरीही त्यांची संख्या फारशी समाधानकारक नसल्याचे दिसते. कारण ब्लॅक फुटेड मांजरींना IUCN च्या रेड लिस्टमध्ये धोकादायक / असुरक्षित म्हणून नोंदवण्यात आले आहे; तर रस्टी स्पॉटेड मांजरांना नियर थ्रेटन्ड म्हणजेच धोक्यात असणाऱ्या प्रजातींमध्ये सूचिबद्ध केले आहे, अशी माहिती बीबीसीच्या डिस्कव्हर वाईल्डलाईफच्या एका लेखावरून समजते.