Sanitary Pads History : सॅनिटरी पॅड्स म्हटले की आपल्यासमोर महिलांचा चेहरा येतो. मासिक पाळीदरम्यान महिला सॅनिटरी पॅड्सचा वापर करतात. पण, तुम्हाला माहिती आहे का सॅनिटरी पॅड्स पहिल्यांदा महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी बनवले होते. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे. मुलं हे सॅनिटरी पॅड कसे आणि कुठे वापरायचे? याविषयी डॉ. अमित बगथालिया यांनी लिंकडेनवर सविस्तर माहिती दिली.
सॅनिटरी पॅड्स खरंच पुरुषांसाठी बनवले होते?
पहिल्या महायुद्धाच्यावेळी सॅनिटरी पॅड्स बनविण्यात आले होते. त्यावेळी या सॅनिटरी पॅड्सचा वापर पुरुष करायचे. डॉ. अमित बगथालिया सांगतात, पहिल्या महायुद्धात सैनिकांना गोळी लागलेल्या ठिकाणी रक्त थांबवण्यासाठी सॅनिटरी पॅड्सचा वापर केला जायचा. हे सॅनिटरी पॅड्स बेंजमिन फ्रँकलिनने बनवले होते.
महिलांनी सॅनिटरी पॅड्स वापरायला कशी सुरुवात केली?
पहिल्या महायुद्धादरम्यान फ्रान्समध्ये सैनिकांवर उपचार करणाऱ्या काही महिला नर्सना जाणवले की, जर हा सॅनिटरी पॅड सैनिकांच्या शरीरावरचे रक्त थांबवू शकतात, तर महिलांचे मासिक पाळी दरम्यानचे रक्तही थांबवू शकतात आणि येथूनच महिलांनी सॅनिटरी पॅड्सचा वापर करणे सुरू केले.
जेव्हा महिलांनी या सॅनिटरी पॅड्सचा वापर अति प्रमाणात सुरू केला, तेव्हा १९८८ मध्ये कॉटेक्स नावाच्या कंपनीने ‘सॅनिटरी पॅड्स फॉल लेडीज’ नावाचे प्रोडक्ट लॉन्च केले. या प्रोडक्टला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. आज जगभरात अनेक कंपन्या सॅनिटरी पॅड्स बनवतात आणि महिलासुद्धा या सॅनिटरी पॅड्सचा वापर करतात.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)