MITRA APP SEBI: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) ने MITRA (म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रीव्हल असिस्टंट) नावाचा एक नवा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मचा उद्देश गुंतवणूकदारांना त्यांच्या इनॅक्टिव्ह म्युच्युअल फंड फोलिओचा मागोवा घेण्यास, ते पुन्हा सुरू करण्यास, विसरलेल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीची माहिती घेण्यास आणि त्याचे केवायसी अपडेट करण्यास प्रोत्साहित करणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत माहिती देताना सेबीने एका परिपत्रकात म्हटले आहे की, इनॅक्टिव्ह फोलिओच्या वाढत्या समस्येचे निराकरण करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. जर गुंतवणूकदाराने त्याच्या फोलिओमध्ये १० वर्षांपासून कोणताही व्यवहार केला नसेल परंतु त्या फोलिओमध्ये युनिट्स अजूनही असतील तर फोलिओ इनॅक्टिव्ह मानला जातो.

२००६ पूर्वी, गुंतवणूकदार पॅन कार्डशिवाय म्युच्युअल फंड खाती उघडू शकत होते. यापैकी अनेक खाती तेव्हापासून इनॅक्टिव्ह झाली आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या होल्डिंग्जचा मागोवा घेणे कठीण झाले आहे. आजच्या घडीला वेगवेगळ्या अ‍ॅसेट मॅनेटमेंट कंपन्यांकडे ७.५ दशलक्षाहून अधिक इनॅक्टिव्ह फोलिओ आहेत. मित्र प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूकदारांना त्यांचे विसरलेली गुंतवणूक परत मिळविण्यात मदत होत आहे.

मित्र प्लॅटफॉर्म कसा वापरायचा?

सेबीने मित्र प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी आणि ते चालवण्यासाठी केफिन टेक्नॉलॉजीज आणि सीएएमएस सोबत भागीदारी केली आहे. मित्र प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूकदारांना पॅन, नोंदणीकृत फोन नंबर, ईमेल किंवा बँक खाते क्रमांक, शहर आणि पिन कोड इत्यादी तपशीलांचा वापर करून जुने म्युच्युअल फंड फोलिओ शोधता येतात.

दरम्यान गुंतवणूकदारांना त्यांची विसरलेली गुंतवणूक आणि इनॅक्टिव्ह फोलिओ शोधण्यासाठी प्रति युजर २५ सर्च अटेम्ट्स (शोधण्याची संधी) मिळातात.

२१ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर करण्यात आलेला सेबीचा मित्र प्लॅटफॉर्म हळूहळू सुरू केला जाणार आहे. याचे बीटा व्हर्जन दोन महिन्यांसाठी चालेल, ज्याद्वारे गुंतवणूकदारांना त्याची कार्यक्षमता तपासता येईल आणि सुधारणांसाठी सेबीला सूचना देता येतील.

मित्रा प्लॅटफॉर्मचे फायदे

गुंतवणूकदार बऱ्याचदा कालांतराने त्यांच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबद्दल विसरून जातात किंवा त्यांचे संपर्क तपशील अपडेट केलेले नसल्यामुळे ते त्यांच्या गुंतवणुकीचा मागोवा ठेवू शकत नाहीत. अशा गुंतवणूकदारांसाठी मित्र प्लॅटफॉर्म फायदेशीर ठरणार आहे.

  • गुंतवणूकदारांना त्यांची विसरलेली गुंतवणूक शोधता येईल.
  • केवायसी अपडेट केल्याने फसवणुकीचा धोका कमी होईल.
  • इनॅक्टिव्ह फोलिओ आणि दावा न केलेली रक्कम कमी होईल.