IPL 2025 New Rules Updates : इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL २०२५ सुरु झालं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलमध्ये काही धोरणात्मक नियम लागू करण्यात आले आहेत. या सिझनचीही एक खासियत आहे ती म्हणजे सेकंड बॉलचा नवा रुल. हा नियम दुपारी होणाऱ्या सामन्यांमध्ये लागू नसेल. आपण या नव्या नियमाबाबत जाणून घेऊ.

सेकंड बॉल रुल रात्री होणाऱ्या सामन्यांसाठी

IPL २०२५ मध्ये सेकंड बॉल रुल हा रात्री होणाऱ्या सामन्यांसाठी आणण्यात आला आहे. रात्र झाल्यानंतर चेंडूवर दवबिंदूचा परिणाम होतो. त्यामुळे हा चेंडू पकडण्यातल गोलंदाजांना त्रास होतो. तर फलंदाजांना याचा फायदा होतो. धावसंख्येचा पाठलाग करताना फलंदाजांना दवबिंदूचा समावेश झालेल्या चेंडूमुळे फायदा होतो असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आणि त्यानंतर सेकंड बॉलचा नियम लागू करण्यात आला आहे.

काय आहे सेकंड बॉल रुल?

सेकंड बॉल रुलच्या अंतर्गत ऑन फिल्ड पंच अर्थात ऑन फिल्ड अंपायर ११ व्या ओव्हरनंतर चेंडूची स्थिती काय आहे? याचा अंदाज घेतली. जर चेंडूवर दवबिंदू जास्त प्रमाणात असतील तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला नवा चेंडू वापरण्याची मुभा दिली जाईल. ११ व्या षटकानंतर जर चेंडूवर दवबिंदू जास्त प्रमाणात जमा झाले असतील त्या चेंडूच्या निरीक्षणात तसं आढळून आलं तर चेंडू बदलण्याचा निर्णय अंपायर घेतील. या नव्या नियमालाच आयपीएल २०२५ च्या स्पर्धेत सेकंड बॉल रुल असं म्हटलं गेलं आहे.

सेकंड बॉल रुल नेमका का आणण्यात आला आहे?

टी २० स्पर्धेत दवबिंदूचा मुद्दा हा महत्त्वाचा असतो. सूर्य मावळल्यानंतर तापमानात काही प्रमाणात घट होते. त्यामुळे दवबिंदूचा परिणाम चेंडूवर झालेला पाहण्यास मिळतो. गोलंदाज जेव्हा दवबिंदूचा समावेश झालेला चेंडू घेऊन गोलंदाजी करतो तेव्हा झेल घेण्यास आणि तो चेंडू पकडण्यात अनेकदा कसोशीचे प्रयत्न करावे लागतात. तसंच गोलंदाजी करताना चेंडू स्पिन करण्यासाठीही प्रयत्न करावे लागतात. भारताचा माजी कर्णधार एम. एस. धोनीसह इतर कर्णधारांनीही ओलसर होणाऱ्या चेंडूचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे आता सेकंड बॉल रुल आणण्यात आला आहे.

सेकंड बॉल रुलचे निकष काय?

सेकंड बॉल रुल रात्री होणाऱ्या सामन्यांसाठी आणण्यात आला आहे.

दवबिंदूचा लक्षणीय परिणाम झाला असेल तरच दुसरा चेंडू वापरण्याची मुभा असणार आहे.

मैदानावर उपस्थित असणारे अंपायर हे सेकंड बॉल रुल संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील.

सेकंड बॉल हा नवा चेंडू नसेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

गोलंदाजांना किंवा फलंदाजांना कुणालाही अधिक फायदा किंवा नुकसान होणार नाही याचा विचार करुनच दुसरा चेंडू दिला जाईल.

चेंडूला लाळ न लावण्याचं बंधनही हटवलं

या आयपीएल स्पर्धेत चेंडूला लाळ न लावण्यात येण्याचा जो नियम होता तो देखील शिथील करण्यात आला आहे. करोना काळात हा नियम लागू करण्यात आला होता. मात्र त्यानंतर शनिवारी या संदर्भात मुंबईत आयपीएलच्या कप्तानांची बैठक पार पडली. त्यामध्ये लाळेचा वापर करण्यावरची बंदी हटवण्यात आल्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

Story img Loader