मुंबईतल्या अनेक वास्तूंप्रमाणेच रेल्वेस्थानकांच्या नावांमागेही एक रंजक इतिहास आहे. रेल्वेस्थानकांच्या परिसरातील इतिहास पाहता, या स्थानकांच्या नामांतराची मुंबईकरांची मागणी आहे. करी रोड रेल्वेस्थानकाला लालबाग, तर मरीन लाइन्स स्थानकाला मुंबादेवी यांच्यासह एकूण सात रेल्वेस्थानकांचे नामांतर करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील रेल्वेस्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याच्या हालचाली शासनदरबारी सुरू झाल्या आहेत. करी रोड, सँडहर्स्ट रोड, परळ अशा आठ ते दहा स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. तो आज बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार आहे. तर याच पार्श्वभूमीवर आपण आज या लेखातून मुंबईचे रेल्वेस्थानक ‘सँडहर्स्ट रोड’ची गोष्ट जाणून घेणार आहोत. लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना खाकी टूर्सचे संस्थापक ‘भरत गोठोसकर’ यांनी ‘गोष्ट मुंबईची’ सीरिजच्या ६७ व्या भागात मध्य रेल्वेस्थानकांची नावे कशी पडली याची रंजक गोष्ट सांगितली आहे.

मसजिद बंदरनंतरचे रेल्वेस्थानक म्हणजे सँडहर्स्ट रोड. सँडहर्स्ट रोड या स्थानकाचे नाव पूर्वी वेगळे होते. म्हणजेच आधी जिथे सँडहर्स्ट रोड होते त्याच्या पुढे हे स्थानक होते. तिथे जुना एक हँकॉक पूल होता, तो तोडून पुन्हा नवीन बांधला जात होता; जो माझगाव आणि डोंगरी या परिसराला जोडतो. तिथेच माझगाव नावाचे स्थानक होते. कालांतराने जेव्हा पूर्ण परिसराचा पुनर्विकास झाल्यानंतर हार्बर लाइनसुद्धा आली. तेव्हा हार्बर लाइन आणि सँडहर्स्ट रोडजवळचे हे स्थानक एकत्र आले. तुम्ही आतासुद्धा स्थानक पाहिलेत, तर त्याला अपर लेव्हल आणि लोव्हर लेव्हल, असे म्हटले जाते. स्थानकाची अपर लेव्हल हार्बर लाइनवर आणि लोव्हर लेव्हल सेंट्रल रेल्वेवर म्हणजेच मेन लाइनवर आहे.

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
ambulance train in india
भारतीय रेल्वे ट्रॅकवर धावणारी ‘अ‍ॅम्ब्युलन्स ट्रेन’ तुम्हाला माहितेय का? डॉक्टरांपासून ऑपरेशन थिएटरपर्यंत असतात ‘या’ सुविधा
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

हेही वाचा…करी रोड स्टेशनचं नाव ‘आमटी’ वरून ठरलंय? लोकांनी रागाने का पेटवलं होतं रेल्वे स्टेशन, आता नवी ओळख काय?

व्हिडीओ नक्की बघा…

१२५ वर्षांपूर्वी मुंबईमध्ये प्लेगची साथ आली. तेव्हा मुंबईत लॉर्ड सँडहर्स्ट नावाचे एक गव्हर्नर होते. ही साथ आली तेव्हा लॉर्ड सँडहर्स्ट यांनी मुंबईमध्ये अनेक गोष्टी सुधारण्याकरिता प्रयत्न केले. त्यामध्ये अनेक योजना करण्यात आल्या. त्यांच्यानंतर १० वर्षांनी एक रस्ता बांधण्यात आला होता. हा रस्ता चौपाटीपासून ते डोंगरीपर्यंत होता. याच रस्त्याचे नाव होते ‘सँडहर्स्ट रोड’. त्याच्याजवळच हे रेल्वेस्थानक स्थलांतरित करण्यात आले आणि त्याचे सँडहर्स्ट रोड हे नाव या रस्त्यावरूनच देण्यात आले. आपण सगळेच या रस्त्याला सरदार वल्लभभाई पटेल मार्ग म्हणून ओळखतो.

काही वर्षांपूर्वी प्रस्ताव आला होता की, मुंबईतील जी स्थानके आहेत त्यांची नावे ब्रिटिश लोकांवरून आहेत, ती बदलली पाहिजेत. उदाहरणार्थ- एल्फिन्स्टन रोडचे नाव प्रभादेवी करण्यात आले आहे. जर सँडहर्स्ट रोड या स्थानकाचे नामांतर झाले, तर मूळ एरियाचे नाव देऊन डोंगरी करण्यात यावे, असे भरत गोठोसकर यांनी सांगितले होते. आज मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराचा प्रस्ताव मंजूर झाला, तर सँडहर्स्ट रोड रेल्वेस्थानकाचे नाव डोंगरी, असे ठेवण्यात येणार आहे.