स्वीडनमध्ये ८ जूनपासून सहा आठवड्यांची सेक्स चॅम्पियनशिप होणार, या बातमीने गेले काही दिवस इंटरनेटवर धुमाकूळ घातला. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ‘सेक्सला खेळ म्हणून मान्यता देणारा स्वीडन पहिला देश ठरला,’ असा मथळा देऊन चटपटीत बातम्या देण्यात आल्या. स्वीडनमध्ये होत असलेल्या तथाकथित सहा आठवड्यांच्या सेक्स चॅम्पियनशिपची नियमावली, प्रकार सगळे काही बातम्यांमधून वाचायला मिळाले असले तरी त्यात तथ्य किती हा प्रश्न निर्माण होतो. युरोपमध्ये पहिलीवहिली सेक्स चॅम्पियनशिप होत आहे आणि तीही ऑनलाइन सर्वांना पाहायला मिळणार (काही माध्यमांनी याची लिंकही दिली आहे) अशा बातम्या जितक्या रोमांचकारी वाटतात, तेवढी त्यात सत्यता आहे का? ‘फर्स्टपोस्ट’ वेबसाइटने यावर सविस्तर बातमी दिली आहे.

सेक्स स्पर्धेचा प्रस्ताव

सेक्स चॅम्पियनशिप ही केवळ एक कल्पना नाही तर तसा प्रस्ताव वास्तवात देण्यात आला होता. ‘स्वीडिश सेक्स फेडरेशन’च्या मालकाच्या डोक्यातून ही कल्पना निघाली. ड्रॅगन ब्रॅटिक नावाच्या इसमाने ही सदर फेडरेशनची सुरुवात केली होती. सेक्सला अधिकृत क्रीडा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्याचा प्रयत्न सुरू होता. स्वीडनमध्ये अनेक स्ट्रिप क्लब्सची मालकी असलेल्या ड्रॅगनने स्वीडनच्या राष्ट्रीय क्रीडा संघाकडे जानेवारी महिन्यात सेक्स फेडरेशनला सदस्य म्हणून घ्यावे, असा अर्ज सादर केला होता.

हे वाचा >> स्वीडनमध्ये खरंच सेक्स चॅम्पियनशिप आयोजित केली जाणार? जाणून घ्या सत्य

ब्रॅटिकची इच्छा आहे की, लोकांनी लैंगिक संबंधाचे प्रशिक्षण घ्यावे. त्यासाठी त्याने या चॅम्पियनशिपची घोषणा केली. मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सेक्सचा अतिशय अनुकूल परिणाम होतो, अशी माहिती एनडीटीव्हीने स्वीडिश वृत्तसंस्था ‘गोटेरबोर्ग्स पोस्टन’च्या हवाल्याने दिली. “आम्ही नोंदणीकृत संस्था आहोत. त्यामुळे आम्ही लोकांना लैंगिक संबंधाबाबत प्रशिक्षित करू शकतो, सेक्स स्पर्धा आयोजित करू शकतो. त्यामुळे इतर खेळांप्रमाणेच सेक्सकडे पाहिले जाईल,” अशी माहिती ब्रॅटिकने पी४ जॉनकोपिंग या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

swedesh fedration website
स्वीडिश सेक्स फेडरेशनच्या वेबसाईटला भेट दिली असता हा संदेश दाखविण्यात येतो.

मात्र, स्वीडनच्या राष्ट्रीय क्रीडा संघाने ब्रॅटिकचा अर्ज एप्रिल महिन्यातच फेटाळून लावला. क्रीडा संघाचे तेव्हाचे अध्यक्ष ब्योर्न एरिक्सॉन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, सेक्स हा खेळाचा प्रकार असू शकत नाही. “तुमचा अर्ज आमच्या नियमात बसत नाही. त्यामुळे आम्ही तुमचा अर्ज फेटाळून लावत आहोत. आम्हाला इतरही कामे आहेत.”, असे सणसणीत उत्तर एरिक्सॉन यांनी ब्रॅटिक यांच्या अर्जावर दिले.

तथाकथित चॅम्पियनशिपचे स्वरूप काय?

ब्रॅटिक यांचा अर्ज फेटाळण्यात आला असला तरी या चॅम्पियनशिपबद्दल अनेक माध्यमांनी बातम्या दिलेल्या आहेत. तसेच ८ जून, गुरुवारपासून गोटेन्बर्ग शहरात सदर स्पर्धा पार पडणार आहे. स्वीडिश सेक्स फेडरेशनच्या वेबसाइटवर सदर चॅम्पियनशिपचा मजकूर अजूनही पाहायला मिळत आहे. सहा श्रेणीमध्ये ही स्पर्धा होणार आहे. एका कप्पलला ४५ ते ६० मिनिटांचा अवधी दिला असून एका दिवसात एकूण सहा तास ही स्पर्धा चालेल.

आणखी वाचा >> “सेक्स चॅम्पियनशिपला भारताचं रुलबुक..” शारीरिक संबंधांची स्पर्धा जाहीर होताच ‘या’ ट्विट्सची चर्चा, तुम्हाला पटलं का?

स्पर्धेबाबत विविध माध्यमांनी चटपटीत तपशील दिला असला तरी स्वीडिश सरकार किंवा सरकारी यंत्रणेने या स्पर्धेची अधिकृत घोषणा केलेली नाही. तरीही इंटरनेटवर ही स्वीडनची स्पर्धा असल्याची थाप मारली जात आहे.

Story img Loader