Shortest Rail Route of Indian Railways: रेल्वेने प्रवास करणे सर्वांना आवडते. रेल्वेचा प्रवास सोपा आणि स्वस्त देखील असतो. आजकाल भारतीय रेल्वे आपल्या सुविधा आणि वेगाच्या बाबतीत अनेक नवीन विक्रम करत आहे. त्यामुळे आता विमानात प्रवास करणारे लोकही लांब पल्ल्याचा प्रवास रेल्वेने करणे पसंत करत आहेत. रेल्वेचा सर्वात लहान मार्ग तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. विशेष म्हणजे हा मार्ग अवघ्या ३ किमीचा आहे.
महाराष्ट्रात आहे सर्वात लहान रेल्वे मार्ग
भारतीय रेल्वेचा हा सर्वात लहान रेल्वे मार्ग महाराष्ट्रात आहे. या मार्गावर नागपूर आणि अजनी अशी दोनच रेल्वे स्थानके आहेत. या दोन स्थानकांमधील अंतर ३ किमी आहे. म्हणजेच अवघ्या ३ किमीचा प्रवास करून ट्रेन थांबते. आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या कमी अंतरासाठी मोठ्या संख्येने लोक ट्रेनचा वापर करतात.
( हे ही वाचा: भारतातील ‘या’ नदीला स्पर्श करायलाही लोकं घाबरतात; यामागचे कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क)
६० रुपये आहे तिकीट..
Ixigo या रेल्वेशी संबंधित ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलनुसार, नागपूर ते अजनी दरम्यानचा रेल्वेमार्गे प्रवास अवघ्या ९ मिनिटांत पूर्ण होतो. या प्रवासासाठी सर्वसामान्य वर्गासाठी ६० रुपये द्यावे लागतात. आणि स्लीपर क्लासचे भाडे १७५ रुपये आहे.