Shortest Tenure Chief Justice of India: माजी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड नुकतेच निवृत्त झाले. त्यामुळे त्यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळही संपुष्टात आला. भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये नमूद पद्धतीनुसार कलोजियमद्वारे नव्या सरन्यायाधीशांसाठी सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस धनंजय चंद्रचूड यांनी केली व ती मान्य झाली. त्यानुसार ११ नोव्हेंबर २०२४ रोजी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे ५१वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. पण संजीव खन्ना यांना फक्त सहा महिन्यांचाच कार्यकाळ मिळणार आहे. सरन्यायाधीशपदाचा भारतातील सर्वात कमी कार्यकाळ १७ दिवसांचा होता! कधी व कुणाचा माहितीये?

न्यायमूर्ती संजीव खन्ना १२ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्याच दिवशी त्यांचा सरन्यायाधीशपदावर शेवटचा दिवस असेल. त्यामुळे प्रत्यक्षात त्यांना फक्त सहा महिन्यांचाच सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ मिळत असल्याची सध्या चर्चा आहे. पण त्यांच्याही आधी त्यांच्याहीपेक्षा खूप कमी कालावधीसाठी काही न्यायमूर्तींनी देशाचं सरन्यायाधीशपद भूषवलं आहे. त्यामध्ये अगदी १७ दिवसांपासून तीन महिन्यांपर्यंतच्या कालावधींचा समावेश आहे.

AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sanjiv Khanna 51st Chief Justice of India
Sanjiv Khanna: फक्त सहा महिन्यांसाठी संजीव खन्ना सरन्यायाधीश, पुन्हा नव्या न्यायमूर्तींची होणार नियुक्ती!
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…
singles day in china
11/11: याच दिवशी का साजरा केला जातो ‘सिंगल्स डे’?
Natasa Stankovic reacts On Divorce From Hardik Pandya
घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच नताशा हार्दिक पंड्याबाबत म्हणाली, “आम्ही अजूनही…”
Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

सर्वात कमी कालावधीसाठी सरन्यायाधीश राहिलेले माजी न्यायमूर्ती…

देशाच्या सरन्यायाधीशपदी सर्वात कमी म्हणजेच १७ दिवसांसाठी पदभार स्वीकारलेले न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती कमल नरेन सिंग यांच्या नावाची नोंद आहे. कमल नरेन सिंग हे २५ नोव्हेंबर १९९१ रोजी सरन्यायाधीशपदावर आले होते. १२ डिसेंबर १९९१ म्हणजे अवघ्या १७ दिवसांत त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यापाठोपाठ न्यायमूर्ती एस. राजेंद्रबाबू यांनी २ मे २००४ रोजी देशाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली होती. १ जून २००४ म्हणजे फक्त ३० दिवसांत त्यांचा कार्यकाळ संपला. न्यायमूर्ती जे. सी. शाह यांनी १७ डिसेंबर १९७० रोजी सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारला होता २१ जून १९७१ म्हणजे ३५ दिवसांमध्ये त्यांचा कार्यकाळ संपला.

Sanjiv Khanna: फक्त सहा महिन्यांसाठी संजीव खन्ना सरन्यायाधीश, पुन्हा नव्या न्यायमूर्तींची होणार नियुक्ती!

एक वर्षाहून कमी कारकिर्द राहिलेल्या माजी सरन्यायाधीशांची यादी…

न्यायमूर्तींचे नावदिवसकार्यकाळ
कमल नरेन सिंग१७२५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर १९९१
एस. राजेंद्रबाबू३०२ मे ते १ जून २००४
जे. सी. शाह३५१७ डिसेंबर १९७० ते २१ जानेवारी १९७१
जी. बी. पटनायक४०८ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २००२
उदय लळित७३२८ ऑग. ते ९ नोव्हें. २०२२
ललित मोहन शर्मा८५१८ नोव्हेंबर १९९२ ते ११ फेब्रुवारी १९९३
अमल कुमार सरकार१०५१६ मार्च ते २९ जून १९६६
आर. एम. लोढा१५३२७ एप्रिल ते २७ सप्टें. २०१४
ई. एस. वेंकटरामय्या१८११९ जून ते १७ डिसेंबर १९८९
सॅम पिरोज भरुचा१८५१ नोव्हें. २००१ ते ५ मे २००२
जगदीश सिंग खेहार२३५२ जाने. ते २७ ऑग. २०१७
मदन मोहन पंछी२६४१८ जाने. ते ९ ऑक्टो. १९९८
पी. सदाशिवम२८११९ जुलै २०१३ ते २६ एप्रिल २०१४
सब्यसाची मुखर्जी२८११८ डिसेंबर १९८९ ते २५ सप्टें. १९९०
के. सुब्बा राव२८५३० जून १९६६ ते ११ एप्रिल १९६७
अल्तमस कबीर२९२२९ सप्टें. २०१२ ते १८ जुलै २०१३
जे. एस. वर्मा२९८२५ मार्च १९९७ ते १७ जाने. १९९८
कैलास नाथ वांचू३१८१२ एप्रिल १९६७ ते २४ फेब्रु. १९६८
मधुकर कनिया३४०१३ जिसेंबर १९९१ ते १७ नोव्हें. १९९२
मेहरचंद महाजन३५२४ जानेवारी ते २२ डिसें. १९५४

सरन्यायाधीशपदी नियुक्त झालेल्या या न्यायमूर्तींचा कार्यकाळ अल्पावधीत संपुष्टात येण्याची अनेक प्रकारच्या बाबी कारणीभूत ठरल्या. त्यात निवृत्तीचं वय, अंतरिम स्वरूपाची झालेली नियुक्ती किंवा दोन नियुक्त्यांमधल्या काळासाठी आलेला सरन्यायाधीशपदाचा पदभार अशा बाबी प्रामुख्याने नमूद करता येतील. आजतागायत भारताच्या कोणत्याही सरन्यायाधीशांना महाभियोगाचा सामना करावा लागला म्हणून पदावरून पायउतार व्हावं लागलेलं नाही.