Why Is This ‘River of Death’ So Dangerous?: श्योक नदी ही सिंधू नदीची उपनदी आहे, जी भारताच्या उत्तर लडाखमधून आणि पाकिस्तानमधील गिलगिट-बाल्टिस्तानमधून अतिशय खडतर भूप्रदेशांमधून वाहते. सुमारे ५५० किलोमीटर (३४० मैल) लांबीची ही नदी ‘मृत्यूची नदी’ या गूढ नावानेही ओळखली जाते. पण या भीतीदायक नावामागची कहाणी काय आहे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ऐतिहासिक संदर्भ
‘श्योक’ हे नाव तिबेटी शब्द ‘शाग’ (खडी) आणि ‘ग्योग’ (पसरलेले) यांपासून तयार झाले आहे. ज्याचा अर्थ असा आहे की, नदी जेव्हा वाहून जाते तेव्हा वेळोवेळी मोठ्या प्रमाणात खडीचा थर मागे सोडते. परंतु, हीच नदी यारकंदी भाषेत ‘मृत्यूची नदी’ म्हणून ओळखली जाते, कारण ती पार करणे सर्वाधिक धोकादायक आहे. मध्य आशियातील व्यापारी, जे यारकंदहून लेहकडे प्रवास करत असत, त्यांनी कडाक्याच्या हिवाळ्यात श्योक नदीतून अत्यंत जोखमीने प्रवास केला. प्रवाह अनिश्चित आणि गोठवणारा थंड असल्यामुळे, नदी ओलांडताना अनेकांचा मृत्यू झाला, त्यामुळेच या नदीला मृत्यूची नदी हे नाव मिळाले.
अधिक वाचा: ४५०० वर्षांपूर्वी कोणी बांधले इजिप्तमधले पिरॅमिड?
भौगोलिक वैशिष्ट्ये Geography of the Shyok River: Challenges of Survival
सियाचिनच्या हिमनद्यांपैकी एक असलेल्या रिमो हिमनदीपासून उगम पावणारी श्योक नदी लडाखमधील उंचीवरील वाळवंटे आणि पर्वतश्रेणीतून वाहते. या नदीचा प्रवाह आगोदर दक्षिण-पूर्व दिशेने जातो आणि नंतर पूर्वीच्या मार्गाच्या समांतर उत्तर-पश्चिम दिशेला वळतो. या वळणदार मार्गाबरोबर कठोर हवामानामुळे ही नदी ओलांडणे खूप धोकादायक ठरते.
आधुनिक काळातील महत्त्व
धोकादायक असूनही, श्योक नदी ही तिच्या काठावर राहणाऱ्या समुदायांसाठी जीवनावश्यक गोड्या पाण्याचा स्रोत आहे. नदीचे स्वच्छ पाणी आणि मनोहर दृश्ये जगभरातील पर्यटक आणि साहसी व्यक्तींना आकर्षित करतात. श्योक खोरे नुब्रा खोऱ्याच्या जवळ स्थित आहे. आणि हे खोरे ट्रेकिंग तसेच या प्रदेशातील समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. नदीचे महत्त्व फक्त ऐतिहासिक आणि भौगोलिक पैलूंपुरते मर्यादित नसून, ती स्थानिक परिसंस्थेमध्ये आणि तिच्यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या उपजीविकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
अधिक वाचा: विश्लेषण : इजिप्तमधील पिरॅमिड्सचा भारताशी काही संबंध आहे का?
या नदीला ‘मृत्यूची नदी’ का म्हणतात? Why Is the Shyok River Called the ‘River of Death’?
श्योक नदीचे टोपणनाव ‘मृत्यूची नदी’, हे प्राचीन व्यापाऱ्यांनी सामोरे गेलेल्या आव्हानांचे आणि या प्रदेशातील कठोर परिस्थितीचे प्रतीक आहे. हे नाव धोक्याची जाणीव करून देते आणि तरीही ही नदी तिच्या काठांवर राहणाऱ्या लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण आहे. श्योक नदीचा इतिहास आणि भूगोल समजून घेतल्यावर मानवाच्या निसर्गाच्या शक्तींविरुद्ध टिकून राहण्याच्या क्षमतेची जाणीव अधिक प्रभावी वाटते.