How To Verify Gold Purity & Hallmark With App: अगदी एखाद्या प्रतिष्ठित किंवा विश्वासू सोनाराकडून फसवणूक झाल्याचा अनुभव आलेल्यांचे किस्से आपणही ऐकले असतील, कदाचित स्वतःही अनुभवले असतील. सर्वात महत्त्वाची व सहज करता येण्यासारखी गुंतवणूक म्हणून भारतीय सोन्याकडे पाहतात, पण अनेकदा सोन्याच्या गुणवत्तेची पारख कशी करावी याविषयी अनेकांना माहिती नसते. याच सोने खरेदीदारांना मदत करण्यासाठी, भारतीय मानक ब्युरो (BIS) ने सर्व ISI आणि हॉलमार्क-प्रमाणित सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या पडताळणीसाठी ‘BIS केअर अॅप’ नावाचे स्मार्टफोन ऍपलिकेशन तयार केले आहे. यामुळे ग्राहकांना हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीआयएस ही भारताची राष्ट्रीय मानक संस्था आहे जी बीआयएस कायदा २०१६ अंतर्गत वस्तूंचे मानकीकरण, चिन्हांकन आणि गुणवत्ता प्रमाणीकरणाच्या कामांसाठी स्थापन करण्यात आली आहे. BIS ने जून २०२१ मध्ये सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग अनिवार्य केले, तर ३१ मार्च २०२३ नंतर हॉलमार्क केलेले सोन्याचे दागिने आणि HUID शिवाय इतर वस्तूंच्या विक्रीला पाबंदी लावण्याचा निर्णय याच संस्थेने जाहीर केला होता.

HUID म्हणजे काय?

HUID क्रमांक, हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशनसाठी संक्षिप्त, हा ६-अंकी कोड आहे ज्यात संख्या आणि अक्षरे आहेत. दागिन्यांच्या प्रत्येक वस्तूला वेगळे HUID दिले जाते आणि हॉलमार्किंगच्या वेळी लेझरने कोरलेले असते. हा क्रमांक BIS डेटाबेसमध्ये ठेवला जाणार आहे.

BIS केअर ऍप कसे डाउनलोड करावे?

स्टेप 1: BIS केअर अॅप शोधा आणि इन्स्टॉल करा
स्टेप 2: BIS केअर डाउनलोड झाल्यावर उघडा.
स्टेप 3: तुमचे नाव, फोन नंबर आणि ईमेल आयडीसह नोंदणी करा
स्टेप 4: तुमचा फोन नंबर आणि ईमेल सह OTP सह पुष्टी करा.

BIS केअर ऍप वापरून सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता कशी तपासावी?

BIS च्या अधिकृत पोस्टनुसार, BIS केअर अॅपवर ‘व्हेरिफाय HUID’ फीचर वापरून हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता तपासता येईल. अॅप डाउनलोड केल्यानंतर, खरेदीदारांनी ISI-ब्रँडेड उत्पादनांची पडताळणी करण्यासाठी “check licensing details” पेज तपासावे व हॉलमार्क केलेल्या दागिन्यांसाठी “HUID Verify” पेजवर जावे.

BIS केअर ऍपचे फीचर्स व फायदे

HUID चिन्हांकित उत्पादनांची खराब किंवा कमी दर्जाची गुणवत्ता, मूळ व प्राप्त वैशिष्ट्यांमध्ये तफावत अशा बाबींची आपण तक्रार करू शकता.

मालाचा परवाना, नोंदणी किंवा हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्यास, ISI ट्रेडमार्क व हॉलमार्क उल्लंघन, फसव्या जाहिराती आणि इतर BIS-संबंधित समस्यांबाबत तक्रार देखील दाखल करू शकता.

BIS ऍप कोणत्याही वस्तू किंवा उत्पादनावरील ISI, हॉलमार्क आणि CRS नोंदणी चिन्हांची पडताळणी करता येईल

साध्या वापरकर्ता नोंदणीद्वारे किंवा OTP-आधारित लॉगिनद्वारे तुम्हाला नोंदवायची असलेली तक्रार निवडा, तक्रारीचे तपशील भरा (पुराव्यासह) आणि सबमिट करा.

उत्पादकाचे नाव आणि पत्ता, परवाना किंवा नोंदणीची वैधता यासारखी सर्व संबंधित माहिती मिळविण्यासाठी उत्पादना वर आढळलेला परवाना क्रमांक/HUID क्रमांक/नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.

हे ही वाचा<< भारतातील ‘या’ ठिकाणी राहतात ‘गुगल’ अन् ‘कॉफी’ नावाची लोकं; राज्याचे नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

भविष्यातील संदर्भासाठी तुमच्या फोन नंबर आणि ईमेल पत्त्यावर पाठवलेल्या तक्रारीचा क्रमांक व पावती सुद्धा पुरवली जाते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Simple jugaad how to verify gold ornaments purity hallmark is correct or not with bis app by government save money svs
Show comments