Smart Phone : स्मार्टफोन ( Smart Phone ) ही आता काळाची गरज झाली आहे. देशभरात किंवा जगभरात संवाद साधण्यासाठीचं ते एक महत्त्वाचं माध्यम आहे. या फोनमध्ये दोन प्रकार पडतात एक आहे Apple चा iPhone आणि दुसरा प्रकार आहे अँड्रॉईड फोन. अँड्रॉईड फोनची निर्मिती सॅमसंग, नोकिया, शाओमी, मोटरोला, सोनी या आणि अनेक कंपन्या करतात. या कंपन्यांनी त्यांचे विविध फोन बाजारात आणले आहेत. ज्यांची किंमत १० ते १२ हजारांपासून अगदी १ ते दीड लाखांपर्यंतही आहे. आयफोनचं मात्र तसं नाही आयफोन महाग असतात. तसंच त्यांची किमान किंमत ही ५० हजारांपासून सुरु होते.
अँड्रॉईड फोन घ्यावा की iPhone ?
स्मार्ट फोन घेताना आपण अँड्रॉईड फोन घ्यावा की iPhone असा प्रश्न अनेकांना पडतो. अँड्रॉईड आणि iPhone या दोन्ही मोबाइल्सना प्रचंड मागणी असते. यामधला चांगला पर्याय काय असू शकतो? चला जाणून घ्या.
आयफोनमध्ये खास काय?
अमेरिकेतली अॅपल ही कंपनी आयफोनची निर्मिती करते. या कंपनीत एलिट उत्पादन तयार केलं जातं. आयफोन हा जगातला सर्वात महाग फोन आहे. तसंच जगभरात आयफोनचा वेगळा चाहता वर्ग आहे. आयफोनची सर्वात मोठी खासियत आहे त्यातील सुरक्षा. आयफोन अॅपल कंपनीचं डिझाईन आणि सॉफ्टवेअर यामध्ये वापरण्यात येतं. त्यामुळे आयफोन हा इतर स्मार्टफोन्सच्या तुलनेत उत्तम आहे. कंपनीला हे माहीत असतं की फोनमध्ये काय पार्ट आणि फिचर्स आहेत. अॅपलच्या आयफोन सॉफ्टवेअरमध्ये काही समस्या आली तर ती अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्येच ठीक केली जाते. आयफोनचे निवडक मॉडेल्सच उपलब्ध आहे.
हे पण वाचा- दीड लाखांचा iPhone ऑनलाईन मागवला, डिलिव्हरी मॅन येताच पैसे देण्याऐवजी त्याचाच जीव घेतला
आयफोनमध्ये अँड्रॉईड फोन प्रमाणे मोठ्या प्रमाणावर अॅप्लिकेशन्स नसतात. जे अॅप्लिकेशन्स असतात त्यांचा दर्जा सांभाळण्यात आलेला असतो. तसंच लेटेस्ट टेक्नॉलॉजीद्वारे आयफोन अपडेटही होतो. आयफोन अँड्रॉईडच्या तुलनेत महाग असतो यात काही शंकाच नाही. आयफोनची किंमत ५० हजारांपासून पुढे सुरु होते. आयफोनची खासियत आहे ती म्हणजे गोपनियता किंवा प्रायव्हसी. प्रायव्हसी इज द किंग या तत्त्वावर त्यांचं काम चालतं.
अँड्रॉईडची खासियत काय?
अँड्रॉईडचा फोन म्हणजे ज्यांची ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉईड असते. अनेक स्मार्ट फोनमध्ये सर्रास ही सिस्टीम वापरली जाते. अँड्रॉईड हे गूगलचं सॉफ्टवेअर आहे. हे एक प्रकारचं ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. अँड्रॉईडचे फिचर्स वेगवेगळे असते. अँड्रॉईडमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे अँड्रॉईड असलेला स्मार्ट फोन ग्राहक १० ते १५ हजारांपासून खरेदी करु शकतात. अँड्रॉईडमध्ये अनेक अॅप्स असतात.