Why is the camera on the left side of the smartphone?: आजच्या डिजिटल युगात आपण सर्वजण स्मार्टफोनचा (smartphones) मोठ्या प्रमाणात वापर करीत आहोत. स्मार्टफोनमुळे आपल्या जीवनात अनेक बदल दिसून आले. स्मार्टफोनच्या मदतीने काही मिनिटांतच कामे पार पाडली जातात. अत्यावश्यक कामे करण्यासोबतच स्मार्टफोन हे मनोरंजनाचेही साधन बनले आहे. त्यात आपण व्हिडीओ पाहू शकतो आणि कॅमेऱ्याच्या मदतीने आपले अविस्मरणीय क्षण फोटो किंवा व्हिडिओमध्ये टिपू शकतो. पण स्मार्टफोनने फोटो काढताना तुम्ही कधी विचार केला आहे का, मोबाईल फोन्सचा कॅमेरा फक्त डाव्या बाजूला असतो…? उजव्या बाजूला का नसतो, चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर….
सुरुवातीला मध्यभागी होते कॅमेरे
वास्तविक, जे फोन सुरुवातीला यायचे, त्यात कॅमेरा मध्यभागी दिला जायचा. मग हळूहळू सगळ्या कंपन्यांनी मोबाईलच्या डाव्या बाजूला कॅमेरा हलवला. आता प्रश्न येतो की असे का केले गेले? कंपन्या मोबाईलच्या डाव्या बाजूला कॅमेरा का देतात? चला जाणून घेऊया.
(हे ही वाचा: ‘या’ देशात १ जीबी डेटासाठी मोजावे लागतात तब्बल ३,००० रुपये, तर ‘हा’ देश देतोय सर्वात स्वस्त इंटरनेट, भारताचं स्थान… )
स्मार्टफोन दिग्गज आयफोनने सर्वप्रथम डाव्या बाजूला कॅमेरा देण्यास सुरुवात केली. यानंतर, हळूहळू बहुतेक कंपन्यांनी हाच पॅटर्न स्वीकारला आणि कॅमेरा फोनच्या डाव्या बाजूला शिफ्ट केला. कॅमेरा डाव्या बाजूला ठेवणे हे डिझाईन नसून त्यामागे दुसरे काही कारण दिले आहे.
स्मार्टफोनचा कॅमेरा डाव्या बाजूला असण्याचे ‘हे’ आहे खरं कारण
जगातील बहुतेक लोक डाव्या हाताने मोबाईल वापरतात. अशा परिस्थितीत मोबाईलच्या मागच्या आणि डाव्या बाजूला बसवलेल्या कॅमेराने फोटो काढणे किंवा व्हिडिओ शूट करणे सोपे होते. याशिवाय मोबाईल फिरवून लँडस्केप मोडमध्ये फोटो काढावा लागतो, तेव्हाही मोबाईलचा कॅमेरा वरच्या बाजूला राहतो, त्यामुळे लँडस्केप मोडमध्येही फोटो सहज काढता येतो. या कारणांमुळे स्मार्टफोनच्या डाव्या बाजूला कॅमेरा दिला जातो.