आपण रोज भरपूर वेळ स्मार्टफोनवर अ‍ॅक्टिव्ह असतो. ऑफिसचे काम असेल नाहीतर इतर वेळी आपण सोशल मीडिया वापरण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करत असतो. स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे. यावर फेसबुक,इंस्टाग्राम, ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपण एकमेकांशी संवाद साधतो. फोनमुळे आपण एकमेकांना कुठेही ऑनलाईन स्वरूपात पैसे पाठवू शकतो. स्मार्टफोनमुळे खूप गोष्टी या सोप्या झाल्या आहेत. मात्र हा स्मार्टफोन वापरताना काही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्मार्टफोन वापरत असताना आपण अनेक जणांकडून किंवा तज्ज्ञांकडून आपण ऐकले असेल की, स्मार्टफोन हा डोळ्यांसाठी धोकादायक आहे. मात्र यामुळे त्याच्या असणाऱ्या उपयोगाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की, किती ब्राईटनेस आपल्या डोळ्यांना योग्य असू शकतो. आणखी यामध्ये महत्वाचे म्हणजे ब्राईटनेस अधिक असला तर तो डोळ्यांबरोबरच मेंदूवर देखील वाईट परिणाम करतो. त्यामुळे स्मार्टफोनचा ब्राईटनेस योग्य असणे आवश्यक आहे. आज आपण ब्राईटनेसचा तुमच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर किती वाईट परिणाम करतो हे जाणून घेऊयात.

हेही वाचा : Passport काढताय? ‘या’ बनावट वेबसाइट्सपासून राहा दूर, केंद्र सरकारने नागरिकांना केले सतर्क

जर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्मार्टफोन वापरत असल्यास तुमच्या Android किंवा iOS मोबाइल फोनवर ३० टक्के एवढा ब्राईटनेस सेट करा. मात्र जर तुम्ही बाहेर असाल उन्हामध्ये तर तुमच्या स्मार्टफोनचा ब्राईटनेस हा ५० टक्के एवढा सेट करा. तुम्ही डॅप्टिव्ह स्क्रीन ब्राइटनेस मोड वापरल्यास ते अधिक चांगले होणार आहे. यामुळे फोनचा ब्राईटनेस बाहेरील प्रकाशानुसार सेट होतो.

मेंदूवर होतो परिणाम

बऱ्याच जणांना असे वाटत असते की स्क्रीनचा ब्राईटनेस मिडीयम किंवा थोडा जास्त प्रमाणात सेट करतात आणि बराच वेळ स्मार्टफोन वापरतात तेव्हा यामुळे त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. यामुळे अनेकांना सौम्य चक्कर येण्याची शक्यता असते. अनेक स्मार्टफोनमध्ये सेटिंग ऑप्शनमध्ये ब्राईटनेस सेटअप हा पर्याय असतो. तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन डिस्प्ले ऑप्शनवर जाऊन फोनचा ब्राईटनेस सेट करू शकतात.

हेही वाचा : Delhi Mumbai Expressway: ४५ शहरांना एकमेकांशी जोडणाऱ्या भारतातील सर्वात लांब दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे बद्दल जाणून घ्या ‘या’ पाच गोष्टी

१. असे अनेक मार्ग आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे डोळे मोबाइलपासून वाचवू शकता. यामध्ये नाईट मोड, ब्ल्यू फिल्टरचा वापर करणे आणि फोनचा ब्राईटनेस कमी करणे हे उपाय आहेत.

२. नाईट मोडमुळे फोनचा ब्राईटनेस हा योग्य पातळीवर सेट होतो. ज्यामुळे त्याचा डोळ्यांना फारसा त्रास होत नाही.

३. ब्ल्यू लाईट फिल्टर डोळ्यांसाठी चांगला आहे. विशेषतः जेव्हा तुमच्या स्क्रीनचा ब्राईटनेस कमी होतो तेव्हा हे फार उपयोगी पडते.

४. ब्ल्यू लाईट फिल्टर आता सर्व स्मार्टफोनवर उपलब्ध असला तरी जर हे फिचर तुमच्या फोनमध्ये नसेल तर तुम्ही ब्ल्यू लाईट फिल्टर डाउनलोड करून इंस्टाल करू शकता.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smartphone display brightness harmful for eyes and head easy tmb 01