Snake are not found here: सापांना अनेकजण घाबरतात. कारण हा पृथ्वीवरील सर्वात धोकादायक आणि विषारी प्राणी मानला जातो. जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आहेत. फक्त ब्राझीलमध्ये इतके साप आढळतात की ब्राझील हा सापांचा देश म्हणून ओळखला जातो. दुसरीकडे, जगात असाही एक देश आहे जिथे एकही साप नाही. होय, तो देश म्हणजे आयर्लंड, जिथे एकही साप नाही आहे. कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु जर तुम्ही यामागील कारण जाणून घ्याल तर तुम्ही थक्क व्हाल. आयर्लंडमध्ये एकही साप नसण्यामागे एक अतिशय मनोरंजक कारण आहे. चला जाणून घेऊया…
आयर्लंडमध्ये साप का आढळत नाहीत?
आयर्लंडमध्ये साप नसण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. असे म्हणतात की आयर्लंडमध्ये ख्रिश्चन धर्माच्या रक्षणासाठी सेंट पॅट्रिक नावाच्या एका संताने संपूर्ण देशातील सापांना एकत्र घेरले आणि नंतर त्यांना आयर्लंड या बेटावरून काढून समुद्रात फेकून दिले. हे काम त्यांनी ४० दिवस उपाशी राहून केले होते.
( हे ही वाचा: भारतातील ३ शहरात राहतात सर्वाधिक कोट्याधीश; महाराष्ट्रातील ‘हे’ शहर आहे पहिल्या क्रमांकावर)
‘हे’ आहे वैज्ञानिक कारण
शास्त्रज्ञ म्हणतात की या देशात कधीच साप नव्हते. जीवाश्म अभिलेख विभागामध्ये आयर्लंड देशात साप असण्याची कोणतीही नोंद नाही. आयर्लंडमध्ये साप नसल्याबद्दल एक कथा अशीही प्रचलित आहे की पूर्वी येथे साप अस्तित्वात होते, परंतु प्रचंड थंडीमुळे ते नामशेष झाले. तेव्हापासून असे मानले जात होते की प्रचंड थंडीमुळे येथे साप आढळत नाहीत.