सोशल मीडिया आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. आजकाल सोशल मीडिया वापरत नाही असा व्यक्ती विरळाच! मात्र तुम्हाला माहित आहे का, की जगभरात सोशल मीडिया दिवसही साजरा केला जातो. नसेल माहित तर या लेखातून तुम्हाला या दिवसाबद्दलची माहिती नक्की मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मॅशेबल या आंतरराष्ट्रीय वेबसाईटने सोशल मीडियाचा ग्लोबल कम्युनिकेशनवर होणारा परिणाम लक्षात घेऊन २०१० साली आजच्याच दिवशी म्हणजे ३० जून रोजी सोशल मीडिया दिवस साजा केला. सोशल मीडियाने संपूर्ण जगाला एकाच माध्यमातून जोडलं आहे. जगभरातले लोक याच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधू शकतात. सोशल मीडिया फक्त टाईमपास नसून याच्या माध्यमातून अनेकांना रोजगारही मिळाले आहेत. समाजाच्या विकासामध्ये सोशल मीडियाचं योगदान उल्लेखनीय म्हणावं लागेल.

इतिहास काय सांगतो?

सिक्सडिग्रीज हा १९९७ मध्ये आलेला पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म होता. याचे निर्माते होते अँड्र्यू वेईनरिच. फेसबुकप्रमाणेच असलेल्या या प्लॅटफॉर्मवर युजर आपलं प्रोफाईल तयार करु शकत होता. त्याचप्रमाणे आपल्या मित्रयादीत आपले मित्र, परिवारातले लोक यांनाही सहभागी करु शकत होता. हा प्लॅटफॉर्म लाखो लोकांनी वापरला. मात्र २००१मध्ये तो बंद करण्यात आला.

त्यानंतर फ्रेंडस्टर हा प्लॅटफॉर्म २००२ मध्ये सुरु करण्यात आला. त्यानंतर २००३ मध्ये LinkedIn ची निर्मिती झाली. या प्लॅटफॉर्मवरुन आपण आपल्या व्यवसायाची माहिती देऊ शकतो, नोकरीच्या संधी शोधू शकतो, उपलब्ध करुन देऊ शकतो. आणि जगप्रसिद्ध अशा, सर्वांच्या आवडत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची एन्ट्री झाली २००४ साली. हा प्लॅटफॉर्म म्हणजे Facebook. मार्क झुकरबर्गने फेसबुकची निर्मिती केली आहे.

हेही वाचा- Social Media Day: चहा, अश्लील गाणं ते डान्स… रातोरात स्टार झालेले सर्वसामान्य भारतीय

त्यानंतर लगेचच २००५ साली खास व्हिडिओसाठीच्या Youtube ची निर्मिती झाली. तर २००६ साली Twitter जन्माला आलं. २०१० साली जन्माला आलेला लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे Instagram. अवघ्या काही महिन्यांमध्येच Instagram प्रचंड लोकप्रिय झालं. विशेषतः तरुणवर्गाने याला अधिक पसंती दिली.

Instagram ची वाढती लोकप्रियता पाहून २०१२ साली फेसबुकने १ बिलियन डॉलर्स एवढ्या किमतीला Instagram विकत घेतलं.

त्यानंतर अगदी अलीकडे म्हणजे २०१६ साली जनमानसात प्रचंड लोकप्रिय झालेलं TikTok. काही देशांनी सध्या TikTok वर बंदी आणली असली तरी त्याची लोकप्रियता मात्र नाकारता येणार नाही.

सोशल मीडियाच्या निर्मितीवेळी त्याचा हेतू आपल्या मित्रमैत्रिणींशी जोडले जाणं, गप्पा मारणं असा होता. मात्र आता ते अधिक व्यापक झाला आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्यवसाय चालतात. खास सोशल मीडियाच्या वापरासाठी अनेकांना कामावर रुजू केलं जातं. खरेदी, मनोरंजन, बातम्या, ज्ञान, माहिती…सगळं सगळं आता एका क्लिकवर मिळतं या सोशल मीडियामुळेच! त्यामुळे सोशल मीडिया ही मानवी आयुष्यातली एक मोठी क्रांती ठरली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.