Selection Process Of State Election Commissioner : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य निवडणूक आयुक्त पदाच्या उमेदवाराची शिफारस करण्याचे सर्वाधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी, राज्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाला राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी मुख्यमंत्र्यांकडे नावाची शिफारस करण्याचे अधिकार होते, त्यानंतर मुख्यमंत्री ते नाव राज्यपालांकडे पाठवायचे. पण मुख्य निवडणूक आयुक्ताच्या नावाची शिफारस करण्याचे सर्वाधिकार मंत्रिमंडळाने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याने यावा वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. कारण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. या निवडणुका येत्या काही महिन्यांत होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेण्यात येतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा