स्मार्टफोन वापरणारे बहुतांशी लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. भारतातही या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचे कोट्यवधी वापरकर्ते आहे. तुम्ही या अॅपच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहू शकता. यात तुम्हाला मेसेज, फोटो, व्हिडीओ पाठवण्याची आणि आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा मिळते.

तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर बऱ्याचदा तुमच्या लक्षात आलं असेल की या अ‍ॅपला स्टोरेज खूप लागतं. तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमधील फोटो, व्हिडीओ, ऑडिओ फाइल्स फोनच्या गॅलरीत, फाइल मॅनेजरमध्ये सेव्ह होतात, त्यामुळे फोनचे स्टोरेज फूल होते आणि फोन हँग होऊ लागतो. फोनमध्ये स्पेस नसली की मग काही अ‍ॅप अचानक बंद पडतात. तुम्हाला फोनचे स्टोरेज योग्य पद्धतीने मॅनेज करायचे असेल तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून पाहा.

WhatsApp New Feature for meta AI
WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवीन फीचर पाहिलंत का? मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
z morch tunnel
सामरिक महत्त्व असलेल्या ‘झेड मोढ’ बोगद्याचं पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन; याचे वैशिष्ट्य आणि फायदे काय?
Madhuri Dixit Gauri Khan buy OYO shares
माधुरी दीक्षित व गौरी खानने शेअर मार्केटमध्ये केली गुंतवणूक, कोणत्या कंपनीचे शेअर्स घेतले? वाचा
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…

पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता काय? ऑनलाइन अन् ऑफलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

डिसअपियरिंग मेसेजेस करा टर्न ऑन

  • मेटाने चार वर्षांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी डिअसअपियरिंग मेसेजेस नावाचे एक फीचर आणले. याच्या मदतीने तुम्ही ठराविक टायमर लावून चॅट डिलीट करू शकता. तुम्ही टायमर सेट केलं की ती वेळ संपल्यावर चॅट डिलीट होते. यासंदर्भात सीएनबीसी १८ ने वृत्त दिलं आहे.
  • या फीचरमुळे यूजर्सची प्रायव्हसी वाढते आणि फोनचे स्टोरेज फूल होत नाही. हे फीचर अनेबल कसे करायचे जाणून घ्या.
  • आयफोनमध्ये You वर जा, तिथून स्टोरेज अँड डेटावर जा. किंवा अँड्रॉइडवर सेटिंग्ज आणि नंतर स्टोरेज अँड डेटावर जा. तिथे मॅनेज स्टोरेजवर टॅप करा.
  • तिथे टर्न ऑन डिसअपियरिंग मेसेजेस हा ऑप्शन दिसेल, त्यावर टॅप करा आणि तुम्हाला चॅट किती वेळेनंतर डिलीट झालेली हवी आहे, ती वेळ सेट करण्यासाठी डिफॉल्ट मेसेज टायमर निवडा.
  • एखाद्या ठराविक चॅटसाठी डिसअपियरिंग मेसेजेस फीचर चालू करण्यासाठी अप्लाय टायमर टू चॅट्सवर टॅप करा.

रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे कोणती, फायदे काय? जाणून घ्या

डिसेबल ऑटो डाउनलोड्स

तुमचा फोन वायफायशी कनेक्ट असतो तेव्हा बाय डिफॉल्ट व्हॉट्सअ‍ॅप ऑटोमॅटिक मीडिया फाइल्स डाइनलोड होतात. बऱ्याचदा अनेक ग्रुप्स असतात जे आपण रोज पाहत नाही, तरीही त्यातल्या मीडिया फाइल्स आपोआप डाउनलोड होतात.

ऑटोमॅटिक डाउनलोडमुळे फोनमधील स्टोरेज लवकर भरतं. त्यामुळे फोनमधील स्टोरेजसाठी आयफोन व अँड्रॉइड युजर्सनी काही स्टेप्स फॉलो कराव्यात.

आयफोन यूजर्स

व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि खाली उजव्या कोपऱ्यात You वर टॅप करा. तिथे स्टोरेज अँड डेटा सिलेक्ट करा आणि मीडिया ऑटो डाउनलोड सेक्शनपर्यंत स्क्रोल करा, त्यानंतर इच मीडिया टाइपवर टॅप करून नेव्हर ऑप्शन निवडा.

Video: जगातील सर्वात लहान गाव पाहिलंत का? इथे राहते फक्त एकच वृद्ध महिला, पाहा व्हिडीओ

अँड्रॉइड यूजर्स

  • व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट्सवर टॅप करा.
  • नंतर सेटिंग्जमध्ये स्टोरेज अँड डेटा सिलेक्ट करा आणि नंतर मीडिया ऑटो डाउनलोड सेक्शनवर जा.
  • मोबाइल डेटा व वाय-फायसाठी सर्व मीडिया टाइपचे टॉगल ऑफ करा.
  • ऑटो डाउनलोड डिसेबल केल्याने फोनमध्ये काय सेव्ह करायचे, काय नाही याचा कंट्रोल तुम्हाला मिळतो.

लग्नाची ऑनलाइन अन् ऑफलाइन नोंदणी कशी करायची? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपमधील मीडिया फाइल्स डिलीट करा

  • एकदा ऑटो डाउनलोड बंद केल्यावर सर्वप्रथम फोनमध्ये आधीपासून असलेल्या मीडिया फाइल्स डिलीट करा, कारण त्यामुळे फोनमधील बरेच स्टोरेज भरलेले असते.
  • बिनकामाचे फोटो आणि व्हिडीओ तुम्ही फोनच्या गॅलरीमध्ये किंवा व्हॉट्सअ‍ॅपमधून डिलीट करू शकता. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक इन बिल्ट मीडिया मॅनेजर आहे, ज्यामुळे ही प्रोसेस सोपी होते.
  • व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये स्टोरेज अँड डेटावर जा, तिथे मॅनेज स्टोरेज ऑप्शन निवडा. तिथे तुम्हाला दोन ते पाच एमबीपेक्षा मोठ्या मीडिया फाइल्स ओळखण्यासाठी आणि त्यापैकी गरज नसलेल्या डिलीट करण्यासाठी रिव्ह्यू अँड डिलिट आयटम्स हे ऑप्शन दिसतं, ते सिलेक्ट करा.
  • आता सर्व चॅट्स त्यांच्या स्टोरेज यूजनुसार पाहण्यासाठी चॅट्स अँड चॅनल्स सेक्शनपर्यंत स्कोल करा.
  • चॅट-बाय-चॅट या आधारे तुम्ही काही ठराविक मीडिया फाइल्स डिलीट करण्यासाठी चॅट सिलेक्ट करा.
  • तुम्ही आयफोन वापरत असाल किंवा अँड्रॉइड फोन मॅनेज स्टोरेज पेज तुमच्या फोनच्या स्टोरेजसाठी खूप आवश्यक आहे.

Story img Loader