केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आंदोलनांअतर्गत सुकन्या समृद्धी योजनेची सुरूवात केली होती. त्या अंतर्गत मुलीच्या शिक्षणाची सोय व तिच्या लग्नासाठी तरतूद करण्यासाठी, पालकांना उपयुक्त योजना सुरू केली. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यास मुलीचं शिक्षण आणि लग्नावेळी मुबलक पैसा उपलबद्ध होईल. सुकन्या समृद्धी योजनेत १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतो. त्यानंतर ६४ लाख रुपये मुलीच्या खात्यावर जमा होतात. यात सरकारकडून काही रक्क देऊ केली जाते.
सरकारने सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठीचे नियम शिथिल केले आहेत. पोस्ट ऑफिसच्या नव्या नियमांनुसार, सुकन्या समृद्धी खाता ३१ जुलै २०२० पर्यंत उघडले जाऊ शकते. ज्या मुलीचं वय २५ मार्च २०२० ते ३० जून २०२० पर्यंत लॉकडाउनमध्ये दहा वर्ष पूर्ण असेल. या योजनेअंतर्गत त्या मुलींच्या पालकांना सूट मिळणार आहे ज्यांना लॉकडाउनमध्ये सुकन्या समृद्धी खातं उघडता आलं नाही. सुकन्या समृद्धी खाते फक्त जन्मापासून दहा वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावाने उघडता येतं.
एका आर्थिक वर्षांत किमान गुंतवणूक रू. २५०/- व कमाल गुंतवणूक रू. १,५०,०००/- पर्यंत करता येते. मात्र दरवर्षी किमान पैसे न भरल्यास दंड आकारला जातो. पालकांना ८० सी कलमाअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर प्राप्तिकरांतून वजावट मिळते. योजनेतून व्याज लाभ करमुक्त आहे. साधारणपणे मुलांचे उत्पन्न वडिलांच्या उत्पन्नात मिळवून त्यावर वडिलांना प्राप्तिकर भरावा लागतो. परंतु या योजनेत गुंतवलेली रक्कम व व्याज वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्याखेरीज मुलीला मिळणार नाही.
सध्या सुकन्या समृद्धी योजनेला ७.६ टक्के व्याज मिळतेय. त्यानुसार, प्रत्येक आर्थिक वर्षात सलग १५ वर्षे एक लाख ५० हजारांची गुंतवणूक केल्यास जमा रक्कम २२ लाख ५० हाजर रुपये होते. यावर एकूण व्याज ४१ लाख ३६ हजार ५४३ रुपये होईल. हे खात २१ वर्षांनंतर मॅच्योर होईल. २१ वर्षांपर्यंत जमा रक्कमेवर व्याज मिळत राहील. २१ वर्षांपर्यंत व्याजाच्या रक्कमेसह एकूण जमा रकम ६४ लाख रुपये होईल.
काय आहे सुकन्या समृद्धी योजना? –
सुकन्या समृद्धी योजनेतील मुलीच्या अठराव्या वर्षी ५०% रक्कम तिच्या शिक्षणासाठी काढता येते व बाकी रक्कम २१ वर्षांनंतर किंवा लग्नाच्या वेळेस (१८ ते २१ वर्षांदरम्यान) काढता येते. मुलीच्या दहाव्या वर्षांपर्यंत खाते उघडता येते फक्त दोन मुलीसाठीच खाते उघडता येते. एका मुलीसाठी कोठेही फक्त एकच खाते उघडता येते. दुसऱ्या जुळ्या मुलींसाठी किंवा तिळ्यांसाठी नियमांत शिथिलता आहे. मुलगी दहा वर्षांची होईपर्यंत खाते उघडता येते. दरवर्षी व्याजाचा दर इतर व्याजदरांप्रमाणे जाहीर केला जाईल. व्याज चक्रवाढ पद्धतीने दिले जाते. पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकाच्या कोणत्याही शाखेत हे खाते उघडता येते.