Sukanya Samriddhi Yojana : महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल भारताने उचललं. २०१५ मध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. या धोरणानुसार एक खास योजनाही आणण्यात आली. या योजनेचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना.

योजनेमागचा उद्देश काय?

मुलींचा आर्थिक भार आई-वडीलांच्या किंवा पालकांच्या डोक्यावर पडू नये या उद्देशाने ही योजना आणण्यात आली आहे. मुलींच्या दूरवरच्या भविष्याचा विचार करुन त्यांच्या शिक्षमसाठी आणि लग्नाच्या खर्चाचा विचार करुन सुकन्या समृद्धी ( Sukanya Samriddhi Yojana ) योजना आणण्यात आली आहे.

World heritage site
जागतिक वारसा स्थळे कशी निवडली जातात? घ्या जाणून…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
gross state income maharashtra
महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष; सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला
pollution level of firecrackers
फटाक्यांच्या प्रदूषणाची पातळी कशी मोजली जाते? प्रदूषकांवर कारवाई करण्याचे अधिकार कोणाला असतात?
constitution of india loksatta article
संविधानभान : अनुसूचित जाती जमातींचे प्रतिनिधित्व
What are ‘A, B’ forms & why they are crucial what is ab form why does the ab form matter
विधानसभा निवडणुकीआधी ‘एबी’ फॉर्मची चर्चा; एबी फॉर्म म्हणजे काय? निवडणुकीत या फॉर्मला इतके महत्त्व का?
u win vaccine
गरोदर महिला आणि मुलांसाठी ‘U-WIN Portal’ची सुरुवात; याचा कसा होणार फायदा?
olden Road by William Dalrymple
Indian History: भारताने त्याच्या इतिहासात गुंतवणूक करायला हवी!

योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे?

मुलीच्या जन्मानंतर पहिल्या १० वर्षांत सुकन्या समृद्धी योजनेच्या ( Sukanya Samriddhi Yojana ) अंतर्गत खातं उघडणं बंधनकारक आहे. खातेदार व्यक्ती भारताचा नागरिक असणे यासाठी आवश्यक आहे. तसंच हे खातं मुलीच्या नावानेच उघडलं जाऊ शकतं. पालक मुलीच्या नावे जास्तीत जास्त दोन खाती उघडू शकतात. या योजनेसाठी २५० रुपयांसह खातं उघडावं लागेल. त्यानंतर वर्षाकाठी त्यात जास्त दीड लाखापर्यंतची रक्कम जमा करता येईल. खातं उघडल्यानंतर पुढच्या १५ वर्षांसाठी न चुकता खात्यात पैसे भरणं आवश्यक आहे. खातं उघडल्याच्या तारखेला २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेची मुदत संपेल आणि या योजनेची रक्कम खातेदाराला मिळेल.

पैसे कसे मिळू शकतील?

एखादा खातेदार जर १ हजार रुपये दर महिन्याला याप्रमाणे १५ वर्षे भरतो आहे तर त्याला योजनेची ( Sukanya Samriddhi Yojana ) मुदत संपल्यानंतर साधारण पाच लाख रुपये मिळतील.

जर एखादा खातेदार १२ हजार रुपये दर महिना या प्रमाणे १५ वर्षे भरतो आहे तर त्याला योजनेच्या मॅच्युरिटीच्या वेळी ७० लाखांहून अधिक रक्कम मिळेल.

जर १५ वर्षे एखादा खातेदार ५ हजार रुपये महिन्याचे भरत असेल तर त्याला मॅच्युरिटीच्या वेळी साधारण २८ ते ३० लाख रुपयांची रक्कम मिळेल.

सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत जे खातं उघडायचं आहे ते कुठल्याही पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक बँकेत अथवा व्यावसायिक बँकेत उघडता येईल.

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे काय?

प्राप्तीकर कायद्याच्या ८० सी च्या अंतर्गत या योजनेत ( Sukanya Samriddhi Yojana ) गुंतवणुकीला कर सवलत देण्यात आली आहे.

योजनेमुळे गरीब कुटुंबासह निम्न मध्यमवर्गी, मध्यम वर्गीय आणि इतर सामाजिक पार्श्वभूमी असलेल्यांना फायदा होईल.

सुकन्या समृद्धी योजना ही दीर्घकाळ चालणारी योजना आहे, तसंच या योजनेतील वार्षिक व्याजाची पद्धत ही चक्रवाढ व्याजाची आहे. त्यामुळे मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी रक्कम वाढते.

मुलगी लग्नाच्या कायदेशीर वयाची झाल्यानंतर या योजनेत ठेवलेली रक्कम खर्चासाठी वापरता येईल.

मुलीच्या वयाच्या २१ वर्षापर्यंत डिपॉझिटवर व्याज जमा होत राहिल. त्यात महिन्यात किंवा वर्षभरात कितीही वेळा पैसे भरण्याची सोय

२१ व्या वर्षानंतर पैसे न काढल्यास पैशांवरील व्याज नियोजित दराने वाढणार

मुलीचे आई किंवा वडील इतर ठिकाणी स्थलांतरित झाल्यास सुकन्या समृद्धी योजनेचं खातंही त्या शहरात वळवता येण्याची सोय

सुकन्या समृद्धी योजनेचं खातं कसं उघडायचं?

तुमच्या घराजवळच्या कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेच्या ( Sukanya Samriddhi Yojana ) अंतर्गत खातं उघडता येतं. खातं उघडण्याआधी या योजनेसंदर्भातला फॉर्म तुम्हाला सरकारी वेबसाईटवरुन डाऊनलोड करावा लागतो. या अर्जात महत्त्वाची ती सगळी माहिती भरावी लागते. अर्जात माहिती भरल्यानंतर आवश्यक ती महत्त्वाची कागदपत्रं जोडावी लागतात. मुलीचं आधारकार्ड, जन्मदाखला, पत्त्यासाठीचा पुरावा ही कागदपत्रं जोडून हा फॉर्म पोस्ट ऑफिसकडे द्यावा. त्याच बरोबर खातं उघडण्याची किमान रक्कमही सांगावी लागते. सदर रक्कम रोख, चेक, डीडी या स्वरुपात देऊ शकता. या खात्यात इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही पैसे ट्रान्सफर करता येतात. पोस्ट ऑफिस, खासगी आणि सार्वजनिक बँका यात या योजनेची माहिती उपलब्ध आहे.

Sukanya Samriddhi Yojana
सुकन्या समृद्धी योजना काय आहे ? (फोटो-ANI)

सुकन्या समृद्धी योजनेच्या अटी आणि नियम काय?

सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातली किमान रक्कम २५० रुपये आहे. ती भरली नाही तर डिफॉल्ट अकाऊंट म्हणून ते ग्राह्य धरलं जातं. हे अकाऊंट २५० रुपये भरुन पुन्हा सुरु करता येतं. त्याबरोबर ५० रुपये अधिकचे भरावे लागतात.

ज्या मुलीच्या नावे खातं आहे त्या मुलीचं वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती स्वतः तिचं खातं हाताळू शकते.

१८ वर्षानंतर खातं मुदतपूर्व बंदही करता येतं अशी या खात्याची सोय करण्यात आली आहे.

तातडीचं काही कारण किंवा खूप महत्वाचं कारण असेल तर अकाऊंटमधून आधीही पैसे काढता येतात. यासाठीची नेमकी कारणंच ग्राह्य धरली जातील.

गंभीर आजार किंवा तितकंच गंभीर वैद्यकीय कारण असेल तरच मुदतपूर्व अकाऊंट बंद करता येतं. केंद्र सरकारच्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.