सध्या देशभरात तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. सध्या सर्वत्र उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्यासारखे वातावरण आहे. सकाळी १० च्या नंतर रस्त्यावर चालताना सुद्धा उन्हाच्या झळा लोकांना बसत आहेत. मात्र अजून खरा उन्हाळा चालू होयचा आहे असे म्हणायला हरकत नाही. मात्र या उन्हाळ्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी अनेक नागरिक घरामध्ये AC , Cooler अशी साधने बसवतात. ज्यापासून तुम्हाला गार वारा मिळतो आणि कडक उन्हापासून दिलासा मिळतो.
भारतात बरेच लोकं AC चा वापर करतात. कडाक्याच्या उन्हाळ्यात आराम मिळण्यासाठी आपण एसीचा वापर करतो. त्यामुळे आपल्या महिन्याच्या वीजबिलामध्ये देखील भर पडते. जर तुम्ही सुद्धा नवीन एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी इन्व्हर्टर आणि नॉन-इनव्हर्टर एसीमधील फरक माहित असणे आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आज आपण इन्व्हर्टर आणि नॉन-इनव्हर्टर एसीमधील फरक आणि कोणता एसी खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेऊयात.
इन्व्हर्टर AC म्हणजे काय ?
इन्व्हर्टर एसीमध्ये इन्व्हर्ट टेक्नॉलॉजी देण्यात आलेली आहे. जे इलेक्ट्रिक व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सी नियंत्रित करण्याचे नॉन-इनव्हर्टर एसीमध्ये, कंप्रेसर एकतर चालू किंवा बंद असतो, ज्यामुळे तापमानात सतत चढ-उतार पाहायला मिळतात. दुसरीकडे, इन्व्हर्टर एसी कूलिंगच्या गरजेनुसार कंप्रेसरला वेगवेगळ्या वेगाने चालू करण्यास परवानगी देतो. जयमाउळें तापमान स्थिर राहते आणि तापमान कमी जास्त होत नाही.
नॉन इन्व्हर्टर AC म्हणजे काय ?
इन्व्हर्टर नसलेल्या एसीमध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी कंप्रेसर चालू किंवा बंद करण्याचा पर्याय असतो. ज्यामुळे तापमानात कमी-जास्तपणा बघायला मिळतो. नॉन इन्व्हर्टर एसी हे एसी इन्व्हर्टर एसीपेक्षा जास्त विजेचा वापर करतात. याचे कारण म्हणजे तापमान नियंत्रित करण्यासाठी त्यांना जास्त मेहनत कारवाई लागते. त्यामुळे हे एसी विजेचा जास्त वापर करतात.