Amitabh Bachchan Name Amitabh Story : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो हिंदी चित्रपट सृष्टीचा (Bollywood) महानायक. ‘सात हिंदुस्थानी’ (Saat Hindusthani) हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा पहिला सिनेमा. १० हून अधिक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र प्रकाश मेहरांचा ‘जंजीर’ आला आणि हिंदी सिनेसृष्टीला मिळाला अँग्री यंग मॅन (Angry Yong Man). पुढची वीस वर्षे या कलावंताने प्रेक्षकांच्या मनावर याच बिरुदासह राज्य केलं.

हे पण वाचा- Video: अमिताभ बच्चन आल्याचे पाहताच…, अनंत-राधिकाच्या लग्नात शाहरुख खानच्या ‘त्या’ कृतीने जिंकली मनं

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
Chandrashekhar Bawankule fb
Chandrashekhar Bawankule : अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रात…”
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”
jyachi tyachi love story review by sabby parera
ज्याची त्याची लव्ह स्टोरी!
Salman Khan And Hema Sharma
“जर तुम्ही सलमान खानला चॅलेंज दिले तर तुमचे करिअर…”, ‘बिग बॉस १८’फेम व्हायरल भाभीचे वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “पण मी असा इतिहास…”
Rahul Vaidya
‘बिग बॉस १४’फेम गायक राहुल वैद्यने घेतले मुंबईत घर; किंमत वाचून व्हाल थक्क

अमिताभ बच्चन ठरले सुपरस्टार ( Superstar Amitabh Bachchan )

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी जंजीर सिनेमानंतर मागे वळून पाहिलंच नाही. अभिमान, शोले, दिवार, अमर, अकबर, अँथनी या आणि अशा अनेक चित्रपटांमधून अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. याच अमिताभ बच्चन यांची चित्रपटसृष्टीतील दुसरी इनिंगही महत्त्वाची ठरली. अमिताभ बच्चन यांचा जन्म १९४२ चा. या वर्षी अमिताभ बच्चन हे ८२ वर्षांचे होऊन ८३ व्या वर्षात पदार्पण करतील.

Amitabh bachchan Jaya Bachchan wedding photos
अमिताभ बच्चन यांची ओळख हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अशी आहे. जया बच्चन या त्यांच्या पत्नी आहेत.

अमिताभ यांची जादू आजही कायम

आजही अमिताभ यांच्या नावाची जादू कायम आहे. कारण त्यांचा अभिनय, त्यांचा आवाज, त्यांची उंची सारं सारं काही आजही कुणालाही भुरळ पाडणारंच आहे. कौन बनेगा करोडपती या सीरियलमध्ये त्यांचं अँकर म्हणून असलेलं रुपही लोकांसमोर आलं. याच कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात अमिताभ यांनी त्यांचं नाव अमिताभ बच्चन कसं पडलं? याचा किस्सा सांगितला. अमिताभ यांचं नाव अमिताभ कसं पडलं हे त्यांनीच उलगडलं. अमिताभ बच्चन यांचे व्हिडीओ असेच व्हायरल होत असतात.

काय म्हणाले अमिताभ बच्चन?

“माझं नाव हे सुरुवातीला इन्कलाब ठेवलं जाणार होतं. नंतर ते अमिताभ असं झालं. यामागे एक छोटीशी गोष्ट आहे. १९४२ मध्ये जे आंदोलन झालं तेव्हा अलाहाबादमध्ये एका चौकात एक मोठा मोर्चा काढण्यात आला. इन्कलाब जिंदाबादचे नारे दिले जात होते. इंग्रजांनो भारत सोडा हे सगळे नारे दिले जात होते. माझी आई आठ महिन्यांची गरोदर होती. मी आईच्या पोटात असताना एक काठी हातात घेऊन आई घोषणा सुरु असलेल्या चौकात पोहचली होती.”

अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, “माझे वडील हरिवंशराय बच्चन आणि त्यांचे काही मित्र आले. त्यांनी विचारलं अरे तेजी बच्चन (अमिताभ बच्चन यांची आई) कुठे गेल्या? माझ्या वडिलांना आणि त्यांच्या मित्रांना समजलं की आई मोर्चात गेली आहे. सगळेजण त्या दिशेने धावले आणि त्यांना घरी आणलं. त्यांना विचारलं तू आठ महिन्यांची गरोदर आहेस मोर्चात कशाला जातेस? त्यावेळी माझ्या वडिलांचे एक मित्र त्यांना म्हणाले की तुम्हाला जर मुलगा झाला तर त्याचं नाव इन्कलाब ठेवा. मात्र जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा महान कवी सुमित्रानंदन पंत यांनी मला पाहिलं आणि ते म्हणाले याचं नाव अमिताभ ठेवा. त्यामुळे माझं नाव अमिताभ झालं.” असं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं. कौन बनेगा करोडपतीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.