आधुनिक टोल नियमांना गती देण्यासाठी फास्टॅगची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे लोकांना ट्रॅफिक आणि इतर समस्यांपासून दिलासा मिळाला होता. मात्र आता याबाबत काही फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत. प्रत्येक टोल प्लाझावर रोखीने टोलचे पैसे घेतले जायचे तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होयची. मात्र फास्टटॅगमुळे हे गर्दीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे.

जर तुम्ही सुद्धा कार चालवता असला तर तुमच्याकडे फास्टटॅग असणे आवश्यक आहे. आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असताना तुमच्या फास्टटॅग मध्ये रिचार्ज असणे आवश्यक आहे. फास्टटॅग रिचार्ज करताना झालेली एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. ज्याचा परिणाम तुम्हाला नंतर भोगावा लागतो. आज आपण फास्टटॅग रिचार्ज करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे पाहणार आहोत.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
paaru serial zee marathi shweta kharat entry
‘पारू’ मालिकेत होणार लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! साकारणार खलनायिका, तुम्ही ओळखलंत का? पाहा प्रोमो
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…

हेही वाचा : FASTag चा रिचार्ज करताय तर सावधान! एका व्यक्तीच्या अकाउंटमधून उडाले १ लाख रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण

बँकेचे नाव योग्य निवडा.

फास्टटॅग रिचार्ज करताना बरेच लोकं बँकेचे चुकीचे नाव सिलेक्ट करतात. ज्यामुळे त्यांना नंतर काही समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीमध्ये रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे कोणत्या बँकेचा फास्टग उपलब्ध आहे याची खात्री करावी. जर तुम्ही रिचार्ज करत असताना चुकीची बँक निवडली तर तुमच्या खात्यामधून पैसे कट होऊ शकतात आणि रिचार्ज देखील मध्येच अडकू शकतो. असे झाले की, लोकं google वर कस्टमर केअर नंबर शोधू लागतात आणि चुकीच्या नंबरवर फोन करून सायबर क्राईमचे देखील बळी होतात.

गाडी नंबरकडेही लक्ष देणे आवश्यक आहे

फास्टटॅग रिचार्ज करताना दुसऱ्या स्टेपमध्ये वाहन कर्मनाक टाकत असताना केवळ बँकेचे नाव नाही तर वाहन क्रमांक देखील योग्य टाकणे आवश्यक आहे. जर रिचार्ज करत असताना चुकीचा नंबर टाकला असे तर तुमच्या बँक खात्यामधून पैसे कट होतील पण तुमचा रिचार्ज होणार नाही. यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Smartphone Cleaning Mistakes: स्मार्टफोन साफ करताना टाळा ‘या’ चुका, अन्यथा बसेल हजारो रुपयांचा फटका

बँकेचे योग्य नाव आणि वाहन क्रमांक योग्य पद्धतीने टाकून झाल्यावर पुढच्या सेटपमध्ये तुम्हाला रिचार्ज करण्यासाठी पेमेंट करावे लागेल. UPI किंवा कार्डद्वारे तुम्ही फास्टटॅगच्या रिचार्जचे पेमेंट करू शकता. मात्र पेमेंट करत असताना कार्ड नंबर आणि UPI पिन टाकणे आवश्यक आहे , अन्यथा तुमचे पेमेंट अडकू शकते व रिचार्ज देखील होणार नाही.