(Tax Saving Tips) आपलं आर्थिक वर्ष 2022-2023 हे 31 मार्चला संपणार आहे. त्याआधी जर तुम्ही ही महत्त्वाची कामं केली नाही तर तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच त्याआधी गुंतवणूकदार, करदात्यांनी आर्थिक मुदतींची पूर्तता करणे गरजेचे आहे. करदात्यांकडे कर वाचवण्याची ही शेवटची संधी असणार आहे. अन्यथा करदात्यांना दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे आर्थिक वर्ष 2022-23 साठी तुम्ही अद्याप कर गुंतवणूक केली नसेल तर ती लवकरात लवकर करा.
कर बचत गुंतवणूक
कर गुंतवणूक करण्यासाठी करदात्यांकडे 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. तुम्ही पीपीएफ (PPF), सुकन्या समृद्धी योजना, पाच वर्षांची एफडी आणि ईएलएसएस (ELSS) मध्ये गुंतवणूक करून कलम 80C कर सूट मिळवू शकता. यासाठी 31 मार्चपर्यंत या योजनेत गुंतवणूक करावी लागेल. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80CCD(1B) अंतर्गत, तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळतो. जर तुम्ही कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा पूर्ण केली असेल तर NPS तुम्हाला अतिरिक्त कर बचत करण्यात मदत करू शकते. या योजनेच्या मुदतपूर्तीवर 60 टक्के रक्कम काढण्यावर कोणताही कर नाही. हे लक्षात ठेवा. सध्या दोन प्रणालींमध्ये कर भरला जातो. पहिली म्हणजे जुनी करप्रणाली आणि दुसरी म्हणजे नवी करप्रणाली. जर कोणी जुन्या कर प्रणालीनुसार कर भरत असेल तर त्याला आयकर विवरणपत्र भरताना काही सूट देखील मिळते. मात्र, या सवलतींचा लाभ घेण्यासाठी ती गुतंवणूक 31 मार्च 2023 पूर्वी करणे आवश्यक आहे.
टॅक्स बचत गुंतवणुकीची अंतिम मुदत
आर्थिक वर्ष 2022-23 साठी टॅक्स बचत गुंतवणुकीची अंतिम मुदत 31 मार्च 2023 आहे. त्यामुळे कर योजनेत तुम्ही कर कमी करु शकता आणि अधिक पैसे वाचवू शकता. जुन्या कर प्रणालीअंतर्गत करसवलतीचा लाघ घ्यायचा असेल तर ती गुंतवणूक 31 मार्च 2023 पर्यंत करावी, असेही सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे कर बचतीसाठी उपलब्ध असलेल्या करबचत पर्यायांचा लाभ घ्या.
मार्च एंडच्या आधी करायच्या गोष्टी
- (Pancard) पॅनला आधार क्रमांकाशी लिंक करा
- कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा
- (Return file) आर्थिक वर्ष 2019-20 साठी अपडेटेड रिटर्न फाइल करा
- आगाऊ कर पेमेंटचा अंतिम हप्ता भरा
हेही वाचा – वंदे भारत एक्सप्रेसचा नवा व्हिडीओ आला समोर, पियुष गोयल यांनी शेअर करत म्हटलं…
तुम्ही ही महत्त्वाची कामं केली नसतील तर ती लवकरात लवकर करा.