Why we Celebrate Teachers Day : ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशभरात ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा करण्यात येतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. पण, तुम्हाला माहीत आहे का? सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिवस का साजरा करण्यात येतो? त्यामागे एक अनोखी गोष्ट आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर’चे प्रकाशन

सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म गरीब तमीळ ब्राह्मण कुटुंबात झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांचे संपूर्ण शिक्षण शिष्यवृत्तीद्वारे पूर्ण केले. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण तत्त्वज्ञान हा विषय घेऊन पूर्ण केले आणि त्यानंतर १९१८ ‘फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर’ हे पुस्तक प्रकाशित केले. शालेय जीवनात ते खूप हुशार विद्यार्थी होते. त्याचबरोबर पुढे त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केले.

१९३१ ते १९३६ पर्यंत ते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि मदन मोहन मालवीय यांच्यानंतर ते बनारस हिंदू विद्यापीठाचे (BHU) कुलगुरू झाले. १९३१ ते १९३९ या आठ वर्षांच्या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले. १९४९ ते १९५२ मध्ये भारत सरकारने रशियातील भारताचा राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती केली. १९५२ मध्ये ते भारतात परत आले आणि त्यानंतर १९५२ ते १९६२ या १० वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी देशाचे उपराष्ट्रपतिपद भूषविले. १४ मे १९६२ रोजी ते भारताचे राष्ट्रपती झाले. त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताबही बहाल करण्यात आला होता.

हेही वाचा : लग्नाची ऑनलाइन अन् ऑफलाइन नोंदणी कशी करायची? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? जाणून घ्या

५ सप्टेंबरला ‘शिक्षक दिन’ का साजरा होतो?

जेव्हा ते राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांचे विद्यार्थी त्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांचा वाढदिवस एक खास दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, अशी इच्छा व्यक्त केली. पण, डॉ. राधाकृष्णन यांनी शिक्षकांच्या समाजातील अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने ५ सप्टेंबर म्हणजेच त्यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याची विनंती केली आणि तेव्हापासून दरवर्षी भारतात ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा केला जातो.
त्यांनी आयुष्यात विविध क्षेत्रांत भरपूर यश मिळवले; पण ते स्वत:ला नेहमी शिक्षक समजायचे. शिक्षक दिन हा त्यांच्या स्मरणार्थ आणि विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील शिक्षकांचे महत्त्व ओळखावे यासाठी साजरा केला जातो.

पंडित जवाहरलाल नेहरू हे डॉ. राधाकृष्णन यांच्याबद्दल एकदा म्हणाले होते, “डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांच्या विविध क्षमतांद्वारे आपल्या देशाची सेवा केली आहे. पण, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते एक महान शिक्षक आहेत; ज्यांच्याकडून आपण बरेच काही शिकलो आणि शिकत राहू. एक महान तत्त्वज्ञानी, उत्तम शिक्षक व एक चांगली व्यक्ती म्हणून त्यांच्यासारखा राष्ट्रपती लाभणे, हे भारताचे सौभाग्य आहे.”

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers day 2024 why we celebrate teachers day know in marathi teachers day history and significance in marathi ndj